Skip to main content

सरकार...- मलाबी दयाना

लेखक Dinesh Satpute यांनी सोमवार, 21/03/2016 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या मित्रा सोबत गप्पा सुरु होत्या. मित्राने सुरुवात केली. सरकारनं मल्ल्यांची मालमत्ता जप्त केली तरी त्याने बुडविलेल्या अशा किती कर्जाची वसुली होईल. मी म्हटलं ..जेवढे वसूल होईल तेवढे होईल ..पण सरकारनं ठरवलं तर त्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सरकारला गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणता येतील....पैसा हि कमवता येईल. हे काय नवीन..मित्राने मधेच प्रश्न केला. मी सुद्धा मग योजना काय असू शकते हे सांगण्यास सुरुवात केली... आता हे बघ..जप्त केलेली मालमत्ता विकून आलेल्या पैशात "तुला बी घेना"सारखी कर्ज योजना आणता येईल. कर्ज घेणा-यासाठी अट एकच...

पाणी बचत काळाची गरज

लेखक वैभव दर्शनराव देसाई यांनी सोमवार, 21/03/2016 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी बचत हा कळीचा मुद्दा बनलाय.सर्वत्र पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खेड्यातील असो वा शहरातील प्रत्येक बायकांना या समस्येला सामोरे जाव लागत आहे.तास् न तास् टँकरची वाट पाहत लांबलचक रांगेत तीव्र उन्हात उभ टाकाव लागत आहे.या सर्व परीस्थीतीने सामान्य माणुस हातबल झालाय. त्या मुळे या परीस्थीतिशी सामना करण्यासाठी पाण्याचे कटाक्षाने नियोजन करणे अत्यंत गरजेते आहे.''पाण्याची बचत करा''.हे एेकुन किंवा बोलुन चालत नाही तर ते प्रत्यक्षात आनाव लागेल.प्रत्येकाला पाणी बचत ही सवय बनवावी लागेल तरच हे शक्य आहेे. गावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत .

कमा आणि कमळू

लेखक हकु यांनी सोमवार, 21/03/2016 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवसांपासून बाळगून ठेवलेली उत्सुकता दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ ला रात्री शिगेला पोहोचली होती. सर्वांनीच उराशी जपून ठेवलेलं एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. आम्ही साक्षात अलंग-मदन-कुलंग ट्रेक करायला जात होतो. अंगात उत्साह सळसळत होताच. अनेक दिवस (?) पूर्वीपासून एकमेकांना प्रोत्साहन देत शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न झाला होता आणि त्या तंदुरुस्तीच्या, उत्साहाच्या आणि एकमेकांवर असलेल्या विश्वासाच्या आणि तितक्याच श्रद्धेच्या जोरावर आपण सर्व जण आपलं 'लक्ष्य' गाठणार हा विश्वास प्रत्येकाला वाटत होता. हा विश्वास नि:संशय रास्त होताच.

कन्या मानव्याची

लेखक gsjendra यांनी सोमवार, 21/03/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी अधीर मी बधीर मी रूधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसार्‍याची मी सौदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण मी जगत मी अप्रगत मी स्वगत आतापर्यंतच्या आकांताचे मी पूष्पवेली मी मूरगळली मी रडवेली कन्या मानव्याची मी पंख फैलवावे मी बंध सैलवावे मी दीप पेटवावे वंशाचे बापाच्या मी चिंब व्हावे मी वार्‍यात न्हावे मी घूंगट झूगारावे कारण मी अनंत कारण मी स्वतंत्र क्रांतीचा महामंत्र आत्मशोध (काव्यसंग्रह)
काव्यरस

चटपटा हांडवो- अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा उपविजेती पाककृती

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 21/03/2016 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
महिला दिनानिमित्त अनाहितामध्ये वन डिश मिल या संकल्पनेवर आधारित "अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा "आयोजित करण्यात आली होती.

इतक्या सहज नसतं शक्य...

लेखक वटवट यांनी सोमवार, 21/03/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्या सहज नसतं शक्य, तोडणं आपल्या श्वासाची लय… आणि आपल्या रात्रीला लागलेली, तिच्या स्वप्नांची सवय… तसं काहीच नसायचं सोप्पं.. ती असताना आणि नसतानाही… हातही थरथरतो हल्ली, करताना तिच्या कवितेखाली सही… प्रश्न पडतो कसं सांभाळायचो, आपण स्वतःला तिच्यासोबत… प्रत्येक गोष्टीला अफाट मुल्य.. तसं काहीच नसायचं मोफत… म्हणजे चंद्राला अश्रू.. रात्रीला स्वप्न.. आणि तिच्या आठवणींना कविता द्याव्याच लागायच्या… नाहीतर कळ्याही फुलायच्या नाहीत… तश्याच रात्रभर जागायच्या… मग त्यांना पहाटे फुलवता फुलवता, माझ्या नाकी यायचे नऊ.. मग त्याच मला म्हणायच्या, "नकोस ना रे, असा वागत जाऊ..

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/03/2016 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू वाटही पाहून झाली काळ तो सरला किती ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी का कधी शंका न आली मारली मज थाप तू प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू .. .

पहिल्या प्रेमी गुंतत गेलो

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/03/2016 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या प्रेमी गुंतत गेलो सुटणे गुंता विसरत गेलो होती काळी शेजारी ती पण गोरा मी मिरवत गेलो येता जाता हसतच होती सुचता थापा मारत गेलो जुळले सूतहि प्रेमहि जमले प्रेमी तिचिया डुंबत गेलो गडबडलो मी प्रेमात तरी आनंदाला उधळत गेलो .. .

गाव बदललाय!

लेखक निशांत_खाडे यांनी सोमवार, 21/03/2016 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी जाउन आलो, सगळं बदललय! हल्ली फाट्यावरून तासभर डोंगर वाट तुडवत जावं लागत नाही, सगळ्यांकडे गाड्या आहेत. सुर्य मावळल्यावर वेशीतल्या पिंपळाच्या पारावरही गर्दी होत नाही, घराघरात टीवी आलेयत. पहिल्यासारखा पहाटे चंद्राच्या प्रकाशात गाव उजळून निघत नाही, सगळीकडे बल्ब लागलेयत. शाळा सुटल्यावर मुले पटांगणात गोट्या आणि विटी दांडू खेळत नाहीत, शिकवण्या असतात. मारुतीच्या देवळापुढे शेकोट्या करून तरुण गप्पा मारत बसत नाहीत, स्मार्टफोन आलेयत. लहान मुले गुरव काकांकडे पेटी, बासरी, तबला शिकायला येत नाहीत, कराटे आणि स्पोकन इंग्लिश आलंय. मामाच्या घरी जेवताना पहिल्यासारख्या गप्पा, हसणं -खिदळणं होत नाही, खंडोबाची मालिका असते.
काव्यरस

सिंधुदुर्ग

लेखक हकु यांनी सोमवार, 21/03/2016 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमाराची राजधानी. संपूर्णपणे महाराजांनीच बांधून घेतलेल्या काही किल्ल्यांपैकी एक. "८४ बंदरांत असा जागा मिळणार नाही!असं म्हणून मालवणच्या 'कुरटे' बेटावर महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला. सुमारे २ वर्ष या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. साधारण ५००० मावळे त्यासाठी खपत होते. यातले बहुतांश मावळे कोळी, भंडारी आणि आगरी होते.