पुणे कट्टा वृत्तांत - २० मार्च २०१६ पाताळेश्वर मंदीर, पुणे
एक मस्त स्नेहसंमेलन झाले आज पुणॆ कट्ट्याच्या निमित्ताने .
ठरलेल्या वेळात म्हणजे दुपारी ४.२० ला मी जंगली महाराज मंदिरात पोहोचलो. सुरुवातीला मी जंगली महाराज आणि पाताळेश्वर मंदिरात दर्शन घेतले व नम्दिमण्डपाजवळ बसलो. लगेचच मागेच बसलेल्या प्रसाद को यांनी मला
फोन केला आणि आम्ही गप्पांना सुरुवात केली. पाककृती वाचता वाचता ते कसे
आपल्या उत्कृष्ठ मिपा कडे वळले याबद्दल सांगितले. मिपावरील अनेक पाक कृतींची त्यांनी मुक्तकण्ठे प्रशंसा केली . खरेच मीही अशीच एक पाककृती वाचून मिपाचा वाचक झालो आणि नंतर रीतसर सभासद झालो हे मी नमूद केले.
मिसळपाव