लकेरी
अंत कवटाळला फिरस्ता
चिरे वाकडी वाट
फुटल्या दिव्यांच्या काचा
कापती अंधाराची लाट ||
गच्च झुडपात वाजे
झिंगल्या रातकिड्याचां झांज
अस्ताला गेली दूर
वाट सांडली सांज ||
कुणी चुकला छायाचित्रकार
टिपे प्रकाशाचे कवडसे
वाहत्या वा-यासवे धुळीत
हरवले गेले ठसे ||
आणे उधाण वारा
शरीर भरल्या प्रणयास
वाढत्या जवळकीने घुमती
मोकाट सुटले श्वास ||
घुमे वा-याची शीळ
उघड्या तलावाच्या शिरी
दर्ग्यातुनी अलगद येती
प्रार्थनेच्या सुरेल लकेरी ||
विजयकुमार........
०४.११.२००९, महाबळेश्वर
मिसळपाव
या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही...
...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल?
ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे.
Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य