Skip to main content

सद्गुरू २

लेखक विश्वव्यापी यांनी शनिवार, 28/11/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा ब्राह्मदेवाचे मानस पुत्र नारद मुनी , दुखी: व कष्टी होवून गप्प बसले होते . ब्रह्मदेवांनी त्यांना विचारले 'पुत्रा तू इतका कष्टी का दिसतोस ?' नारद म्हणाले ' पिताश्री मी सद्गुरूंच्या शोधात आहे ,पण मी जाणत नाही कि सद्गुरु कसे असतात त्या मुले मी दुखी: व कष्टी झालो आहे . मी सर्व वेदांत , १८ पुराणांत , ६४ कलांत पारंगत असा आहे तरी हि मी सद्गुरु कसे असतात हे जाणत नाही !ब्रह्मदेव म्हणाले ' बस इतकेच न ? फार सोपे आहे ते . तू असे कर पृथ्वीतलावर जा . तिथे सहस्त्रगुण राजाच्या महालात एक कोळी आपे जाले विनात आहे .तो तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला देयील . नारद मुनी आनंदानी त्या कोळ्या पाशी जाऊन पोचले .

दमामिने माझी कविता पळवली

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 28/11/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
दमामिने माझी कविता पळवली तेव्हा आत्मा जिलबीच्या घाण्यावर झाऱ्या काढून ऊभा होता मी बॅट्याला म्हटलं प्याऱ्या कुठाय? त्यावर ढगात नजर लावून तो म्हणाला सगळंच हुकलंय अगदी 'पातेल्या'चीही राख झालीय आता परा बिका मुविच्या भाऊगर्दीत टाऱ्याला शोधतोय. घावलीच एखादी जिलबी तर त्यावर मीठ टाकुन खातोय. मात्रं टेंपोत बसलेला राकु म्हणाला फुसकीच्या, कधीपासून 'कळ' बडवतोय? घे की आवरतं.

लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या

लेखक माहितगार यांनी शनिवार, 28/11/2015 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर. लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा यातनांची ती राख तुझ्या पंचप्राणांनी का वाहिली ? आहुती देऊनीही तुझे येथे काही ना राहील

तथास्तु

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 28/11/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक दिवस या ना हेतूनं रेंगाळलेलं आमचं रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल अखेर सर्व संमत झालं .

साज़

लेखक मारवा यांनी शनिवार, 28/11/2015 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वात अगोदर एक म्हणजे मी संगीताचा कुठल्याही प्रकारचा जाणकार नाही. दुसरं सर्व लेख आठवणींवर आधारीत त्यामुळे डळमळीत. थोडी कुठे कुठे गल्ली चुकण्याचीही शक्यता आहेच.. तर आपल्या हीन्दी सिनेमांची गाणी म्हणजे अनेक प्रतिभाशाली संगीतकारांनी योगदान दिलेला आनंद खजिना आहे. कधीही जा दार उघडा दोन चार गाणी घ्या और गम भुला दो सारे संसारके. हा आपला सर्वांचाच अनुभव. तर या विवीध गाण्यांत विवीध संगीतकारांनी अत्यंत कलात्मकतेने व कुशलतेने अनेक वाद्यांचा वापर केलेला आहे. या धाग्याचा विषय हा वाद्यांचा जिथे अप्रतिम वापर झालेला आहे त्या गाण्यांविषयी बोलणं हा.

करवाचौथ

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 28/11/2015 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी, तू कशी दिसत होतीस गं , अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ??? डी.डी.एल.जे मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही... आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा. कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा. आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो, आणि माझा 'संकष्टी चतुर्थी' चा. जिप्सी

उत्सर्जन

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शनिवार, 28/11/2015 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलाटा शरीरास धडका देत असताना गलितगात्र शरीर वासनेचे किनारे शोधायला लागते वादळात भरकटल्या नौकेसारखे. वाळू चिकटलेले सारे पाउलठसे मग सारा किनारा रिता करून रस्ते वालुकामय करतात अन् गर्भगळीत समुद्र बेवारशी खडकांना धडका द्यायला लागतो. जमीनीचा स्पर्श होताच मस्यपुरुषाला पाय फुटतात अन् काचवाटा तुडवत काळे रस्ते लाल करत तो प्राक्तनाच्या ढगाआड लपल्या वासनाचंद्राचे माग काढायला लागतो. उफाळलेल्या समुद्राची गाज रस्त्यारस्त्यावर आक्रोश मांडून काळोखथिजल्या हृदयाचा थरकाप उडवत विसर्जनाची तयारी सुरु करते.

शिकार (गझल)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी शनिवार, 28/11/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
ना कुठला पापी होतो ना व्यसनी टुकार होतो नियतीच्या खेळामध्ये मी दुबळी शिकार होतो दुःखात माखला जन्म त्या जखमा पदोपदीच्या अनिवार यातना ज्यांचा मी मुकाच हुंकार होतो सन्मार्ग चाललो तरीही हे दारात उभे दुर्भाग्य नजरेत जणु दैवाच्या मी अगदी भिकार होतो त्या बेफाम सागरामध्ये मी क्षुद्र जणु नावाडी प्रलयास द्यावया झुंज मी कुठे चमत्कार होतो अविरत जरीही लढलो सुखशिल्प नवे कोराया परि स्वर्ग निर्मिण्या येथे मी खुजा शिल्पकार होतो ही गुढ भासली दुनिया स्वार्थाच्या जंजाळातील पण गुढ उकलण्याजोगा मी कुठे जाणकार होतो हे अंगण फितुर झाले त्या स्वप्नांच्या पर्णकुटीचे अन् इतका असुन द्रोह मी कसा निर्विकार होतो त्या फ
काव्यरस

सुटका (कथा)

लेखक आतिवास यांनी शनिवार, 28/11/2015 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी आश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही. रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती, तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो? पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका आश्विनच्या मनात आली – तो जागा आहे? की स्वप्नात आहे? पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही. दु:खाचे ते सगळे क्षण आश्विनला आठवतात. तो मुकाट्याने उठतो. सवयीने आंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्याप्रमाणे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात. “कपभर दूध घे बेटा. दोन बिस्कीटं पण खाऊन घे. कालपासून पोटात काही नाही तुझ्या, उपाशीच आहेस तू.

मैदानी खेळ

लेखक कविता१९७८ यांनी शनिवार, 28/11/2015 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना मैदानी बरेच खेळ खेळले जायचे, कमी उंची असल्याने लांब उडी , उंच उडी असे जमायचे नाही पण लंगडी, कबड्डी खेळायला आवडायचे. पकडा पकडी , लगोरी खेळायचे पण धावण्याच्या शर्यतीतही कधीच जास्त टीकाव लागला नाही कधी. क्रीकेट सर्वान्चाच आवडता खेळ पण क्रीकेट सोडुन बाकी कुठले मैदानी खेळ तुम्हाला आवडायचे ??