आजकाल नवीन पदार्थ करायचा म्हटलं की आपण लगेच वेगवेगळी पुस्तके,फूडब्लॉग्स, खादयपदार्थांच्या वेबसाईट्स, मासिके शोधायला जातो,चाळत रहातो.
त्यात मनासारखी पाककृती किंवा असंही म्हणा तोंडाला पाणी सुटणारा एखादा फोटो दिसला की, ती पाककृती करायला आपण मानसिकरीत्या तयार होतो आणि मग लवकरच तो पदार्थ आपल्या घरी बनवला जातो.
इथे मी तुम्हाला आंतरजालावर असणार्या अशाच काही फूडब्लॉग्स आणि फूडसाईट्स बद्दल थोडीशी माहिती देणार आहे.