चिमणी आणि कारटं (लघुत्तम कथा)
भुरभुर चिमणी बाळाच्या हातावर जाऊन बसली.
बाळराजे खुश झाले. भुरभुर चिमणीला टकामका बघत राहीले.तान्हुला हात पुढे करून तिला पकडायला लागले. चिमणी भुर्रकन आकाशी ऊडाली. बाळराजे बघतच राहीले.बोबडया बोलांनी च्युव च्युव करत तिला परत बोलवु लागले. चिमणी झाडाच्या फांदीवर बसली. तिथुनच बाळराजेंना न्याहाळु लागली. मधुनच उडायची, वळचणीला फिरायची. बाळराजे दुडुदुडु धावले. चिमणीला पकडायचा पण करून राहिले. चविष्ट अमिषं दाखवुन तिला फशी पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण चिमणी बधली नाही. बाळराजेंच्या कचाट्यात सापडली नाही.
बाळराजे उदास झाले. तोंड पाडून गपगार बसले. चविष्ट खाऊकडं बघेनासे झाले.
मिसळपाव