शब्द !!!
शब्द !!!
शब्द कळतात मला, आणि म्हणूनच छळतात मला
म्हणजे, त्रास नाही हा देत, मनात घोटाळत राहतात
कधी एकदाचे, मनाच्या कोऱ्या पाटीवरून, अलगद उतरून
एक अर्थपूर्ण गोफ गुंफतात , असे होवून जाते
कधी ,कधी अगदीच निरर्थक पणे
बाहेर पडायला धडपडत असतात
सांगितले तरी ऐकतच नाहीत
मग काय, वायफळ गप्पा होतात
त्यांचाशी माझ्या, अगदी शिळोप्याच्या
कधी कधी, हवे असतात न
चपखल बसणारे शब्द, तेव्हा मात्र
दडी मारून बसतात, जणू
लपाछपिचा खेळ खेळतात
कधी कधी न असे वाटते कि रुसून बसलेत
काही काही शब्द,
काय करणार बिचारे, आपण सतत
दुसऱ्या भाषेच्या प्रेमात, आणि
ते जणू पोटमाळ्यावर अडगळीत किंवा
वृद्धाश्रमात, जर्जर आणि
मिसळपाव
"आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत.
“अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात.
“अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे.
"बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे.
"अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा