लेखकज्योति अळवणीयांनी शनिवार, 12/09/2015 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
अग, हसतेस काय? खरच सांगतो आहे मी. राजन म्हणाला मला की तू गिताशी बोलू नाकोस. ती काही ना काही कारणाने तुला आमच्यापासून तोडेल." विक्रांत गंभीरपणे गिताला सांगत होता आणि गिता हसत होती. " कमाल करतेस ह गिता. मी काहीतरी सिरीयसली सांगतो आहे. बर हे फक्त राजानच मत नाही; प्रकाश आणि हरीच सुद्धा हेच मत आहे." आता मात्र गिताला थोडा राग आला. "विकी मी का तोडेन तुला तुझ्या मित्रांपासून? आपण फक्त गेले काही दिवस झाले भेटायला लागलो आहोत. तेही कामाच्या संदर्भात. बर, आपली ओळख आत्ताची आहे आणि तुझे मित्र तर तुझ्याबरोबर लहानपणापासून आहेत ना? मग ते तुला ओळखत नाहीत का?
लेखकबोका-ए-आझमयांनी शनिवार, 12/09/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केेअरक्रो भाग २४
द स्केअरक्रो भाग २५ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
रॅशेलने फोन केल्यापासून अर्ध्या तासाच्या आत एफ.बी.आय.च्या एजंट्सनी फ्रेडी स्टोन जिथे राहात होता ती नुसती इमारत नाही, तर ती संपूर्ण गल्ली आपल्या ताब्यात घेतली. आम्हाला दोघांना अलग करून प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी बाहेरून मोठाल्या बसेससारख्या दिसणाऱ्या मोबाईल इंटरॉगेशन रूम्स आणल्या होत्या. अर्थात, एफ.बी.आय. त्यांच्याबाबतीत कधीच असा शब्दप्रयोग करत नसे.
लेखकमाहितगारयांनी शनिवार, 12/09/2015 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली
काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला
न पळी राहिलीए ना पंचपात्र
किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे
रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच
त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे
संपत आलेल्या किणकीणाटाला
खणखणाट समजून अथवा भासवून
उगाच खडे फोडतात कधी कधी
शिळ्याकढीला ऊत आणून
कधी सत्तेच्या आशेने
कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या
मृगजळी स्वप्नाने
कधी कामधेनू आपल्याही
गोठ्यातून निघून गेली या दु:खाने
त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष
जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस
अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो
पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो.
ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो
पण
लेखकजव्हेरगंजयांनी शुक्रवार, 11/09/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
यल्लमाच्या पायऱ्यावर सुनी संध्याकाळपर्यंत बसुन होती.
दिवसभर देवळात भक्तांची रेलचेल होती.
त्यांनी देवीपुढं ठेवलेले पुरणपोळी, शिकरण, नैवैद्य तिनं एका आडबाजुला साठवले होते.
आज दिवसभरं ती तेच खात होती.
अंधारायला आल्यावर सगळा प्रसाद फडक्यात बांधुन घराकडे चालु लागली.
यलम्माच देऊळ अगदीच लहान, एकाच खोलीचं.
पण इथे गुरव नव्हता म्हणुन सुनीनं बस्तानं बसवलेलं.
गुरवं सगळी तिकडे मोठ्या देवळाकडं, तिकडं ती कधीच जायची नाही.
नैवैद्य चोरणाऱ्या गावातल्या पोराठोरांना गुरवं हुसकावुन लावायची.
पण या 'मोठया' देवळाकडं जाणारा प्रत्येक भक्त यल्लम्माकडं यायचाच, एखादातरी नैवैद्य आणि थोडीफार चिल्लर देवीला ओवाळायचा.
देवीची ह
लेखकसत्य धर्मयांनी शुक्रवार, 11/09/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
बजाची पावल आज झपाझप चालली हुती , हातात कुर्हाड, खांद्यावर पोत आन दाव घेऊन त्यो सुसाट चालला हुत्ता.घरी आई आन बायकुची कटकट ऐकुन त्यो रागातच बहिर पडला आणि पांदी वलांडून कवा डोंगराच्या रस्त्याला लागला तेला बिगीर ते कळाल नव्हत.
मनातंन त्यो म्हणत हुत , "भूत, खेत कूट असत्यात व्हय ?, च्या मारी या बायकांच्या घरी लाकूड तुकडा नाय आन सकाळ सकाळ लागले बोम्ब्लाया जाऊ नग रानात आज आवस हाय ".आज दावतोच ह्यांना म्हणत राग डोक्यात कालवून त्यो अजून जोरात त्या दगड धोंड्यातन वाट काढत चालू लागला.
लेखकशिव कन्यायांनी शुक्रवार, 11/09/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
किती गंडलो आम्ही!
मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही,
'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले!
उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक!
नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच,
छातीठोकपणे सांगावेच कुणी!
आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या...
नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत,
असे पाय दाखवावेतच कुणी!
प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत?
'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत
अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही
असा त्रिशंकू भेटावाच कधी!
किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!