Skip to main content

एका बापाची व्यथा .......

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 31/03/2015 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
पाटी पुसून कोरडी करणं इतकं सोपं नसतं गं मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं फोडासारखं जपलं तुला, मनासारखं फुलू दिले रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं सतरा हे काय वय का गं असा निर्णय घेण्याचं अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर 'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं शेवटच्या त्या क्षणी पिल्ला, तुला खूप दुखलं का ? कणभर का होईना , आमची आठवण आली का ? सतत प्रश्न घेऊन जगणं इतकं सोपं नसतं गं
काव्यरस

घुंघट...........आदरांजली -३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 31/03/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
घुंघट लेखिका : इस्मताआपा चुगताई खालील अनुवाद : जयंत कुलकर्णी. त्या दिवाणावार पांढरीशुभ्र चादर टाकली होती. त्यावर माझी दादी बसलीए. दादीचे केस पाहिले की मला पिसे विस्कटलेल्या बगळ्याची आठवण येते आणि तिच्याकडे पाहिल्यावर एखाद्या अर्धवट घडवलेल्या संगमरवरी पुतळ्याची. ती इतकी गोरी होती की तिच्या अंगात रक्त आहे की नाही अशी शंका कोणालाही यावी. तिच्या पापण्याआड लपलेले तिचे पिंगट रंगाचे डोळे बघताना जाड पडद्याआड लपलेल्या खिडक्यांच्या तावदानांची हमखास आठवण येतेच. ती त्या दिवाणावर एखाद्या पिंजलेल्या चांदीच्या ढिगाप्रमाणे भासत असे.

युद्ध....... खलिल जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 30/03/2015 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
राजवाड्यात जंगी मेजवानी चालू होती, तेव्हा एक माणूस तिथे घाईघाईने आला आणि त्याने राजपुत्राला लवून मुजरा केला. सगळे पाहुणे त्याच्याकडे टकामका पाहू लागले कारण त्याचा एक डोळा निखळला होता, रिकाम्या खोबणीतून रक्त ठिबकत होते. राजपुत्राने त्याला विचारले, ‘ही आपत्ती तुझ्यावर कशी काय कोसळली?’ त्यावर तो सांगू लागला, ‘ हे राजपुत्रा, मी व्यवसायाने चोर आहे. आज अमावस्या! आकाशात चंद्र नव्हता म्हणून मी चोरी करण्यासाठी एका दलालाच्या घरात घुसायचे ठरवले. पण अंधारात चूक झाली. दलालाच्या घराऐवजी मी विणकराच्या घरात शिरलो. अंधारात उडी मारताना तिथल्या हातमागाला माझा धक्का लागला आणि माझा डोळा निखळून पडला.

कॉपीराईटचे अर्थकारण आणि माझी (स्वतःची) दुटप्पी भूमीका !

लेखक माहितगार यांनी सोमवार, 30/03/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईट्स आणि कॉपीराइट कायद्यांचा उद्देशच हा आहे की, सर्जनशीलतेस निव्वळ दाद नको तर त्या आधारावर आर्थीक उत्पन्नाच्या शक्यता सुद्धा असाव्यात ज्यामुळे नवीन संशोधन आणि सर्जक विचारांची समाजात जोपासना आणि वृद्धी व्हावी. विकिपीडियावर सुद्धा प्रताधिकारांची नवागत संपादकांनी बुजराखावी म्हणून कन्व्हिंसींग साठी बर्‍या पैकी आटापिटा चालू असतो. खास करून विवीध विभूतीभक्त आणि विशीष्ट विचारांनी (चष्म्यांनी) प्रेरीत प्रचारकांना समजावणे सर्वात कठीण असल्याचा सर्व साधारण अनुभव असतो.

कर्तृत्व

लेखक टीपीके यांनी सोमवार, 30/03/2015 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी ११ वर्षांची आहे, काल तिच्याशी बोलताना सहज काही विषय निघाला आणि तिला मी २-३ मिनिटात एक एक करून जयदेव पायेंग , बाबा आमटे, प्रकाश आमटे, बंकर रॉय, पोपटराव पवार यांच्या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी काय काम केले, कशा परिस्थितीत केले, त्याने कोणाला काय फायदा झाला इत्यादी इत्यादी. हेतू हा की तिला सध्या वेगळे काम करणाऱ्या लोकांची ओळख व्हावी आणि थोडे इन्स्पीरेशन मिळावे. या गोष्टी मी मला त्यांचे काम जसे आठवेल तसे सांगितले,त्यातील काही बरोबर,काही चूक तर काही अर्धवट असेल,पण तिला या गोष्टी आवडल्या. टेड वरचा बेअरफुट कॉलेजचा व्हिडिओ पण दाखवला.

रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष.

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 30/03/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात.

गवसणी.(चारोळ्या)

लेखक प्रल्हाद दुधाळ. यांनी शुक्रवार, 27/03/2015 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
गवसणी.(चारोळ्या) शिकविलेस स्वाभिमानी जगणे, माणुसकीने जिंकण्याचा ध्यास... संकटातही आई शोधेन संधी, घालेन गवसणी मी गगनास..!! प्रीती तुझी ही संजीवनी मजला, अर्थ नव्याने आला या जगण्यास.... साथीने या जीवन मंगल गाणे, घालेन गवसणी मी गगनास..!! मांडला डाव वारंवार मोडला हिरावला आलेला तोंडाशी घास... लढाई जगण्याची पुन्हा नव्याने घालेन गवसणी मी गगनास..!! माणसांना अनुभवले इतके, समृद्ध समर्थ केले जीवनास.... साथीत जगतो समरसतेने, घालेन गवसणी मी गगनास..!! ......प्रल्हाद दुधाळ

संस्कृत सुभाषिते -२

लेखक शरद यांनी शुक्रवार, 27/03/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत कवी पंडित होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान, काव्यशास्त्र इ. चे चांगले ज्ञान होते. पण हल्लीच्या विद्वानांप्रमाणे ते हस्तिदंती मनोर्‍यात रहात नव्हते. सामान्य माणसाबद्दल त्यांना कणव होती. वाटसरू उगीचच लुटला जाऊं नये म्हणून एकाने दिलेली धोक्याची सुचना पहा कामिनीकायकान्तारे स्तनपर्वतदुर्गमे ! मा सन्चर मन:पान्थ ! तत्रास्ते स्मरतस्कर: !! (कांतार ...अरण्य, पान्थ ....वाटसरू, स्मरतस्कर ....मदन नावाचा चोर) असे त्यांचे (मदतनीसाचे) सल्ले आपण पुढेही पहाणार आहोतच. आज एक नवीन दिशा दाखवावयाची आहे. संस्कृत कवी व उर्दु शायर यांच्यामध्ये काही शतकांचे अंतर. पण दोघांचेही एका बाबतीत एकमत दिसून येते.

एक जिलबी पाडायचीच

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 27/03/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं... आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं... यमक जुळतं का बघावं म्हटलं... तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी a सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच होईल बहुदा पानिपत,

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 27/03/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे. जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते?