Skip to main content

अंजिराचा चिक आणि औषधोपचार

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 27/03/2015 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आवारात अंजिराचं झाड आहे. ते अगदी फाटकाला लागून आहे. त्याचा वाढायचा वेग आणि पसारा प्रचंड आहे. त्यामुळे आम्हाला ते सारखं छाटत राहावं लागतं. नाहीतर ते फाटकातून यायला जायला अडथळा करू लागतं आणि वर त्या झाडाच्या अगदी डोक्यावर विजेच्या तारा आहेत. त्यामुळे ते सरळही वाढू देऊ शकत नाही आणि आडवंही. त्याला भरपूर पाने येतात आणि कसली तरी पांढरी चिलटं भरमसाठ प्रमाणात पानांच्या खालच्या बाजूला गर्दी करतात. जणू उलट्या बाजूने बर्फवृष्टी झाली असावी सगळ्या झाडावर. ती चिलटं संध्याकाळ झाली की घरात घुसायला बघतात. ती चिलटं खूप बारीक आणि पीठासारखी अंगाला चिकटून बसणारी.

किन्नर - बृहन्नडा

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 26/03/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
किन्नर बृहन्नडा किंवा मुंबईच्या भाषेत हिजडे किंवा छक्के ... अलीकडे ह्यांचा वावर ठाण्यातील विशिष्ट भागांमध्ये फारच वाढला आहे (किंवा निदांन मला तसे वाटते आहे)... त्यांच्या बीभत्स दर्शनापलीकडे त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा आहे आणि म्हणून हा धागा ... १. हे लोक काही पुरुषी स्त्रिया आणि बायकी पुरुष ह्यांच्यापेक्षा किंवा सामान्य स्त्री किंवा पुरुषांपेक्षा नेमके काय वेगळे असतात ... २. ज्या स्वरुपात ते सतत लोकांसमोर येतात ते तसे का ? ३. भारता बाहेर हे लोक्स दिसत नाहीत हे कसे ? कुणी ह्यावर गंभीरपणे सत्य सांगू शकेल का ?

कालबाह्य बी.बी.रॉय आणि त्याची बायको!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 26/03/2015 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे जेव्हा आम्ही अकरावीला इलेक्ट्रोनिक्स शाखेत प्रवेश घेतला तेव्हाची. तीस वर्षे होऊन गेली . अख्ख्या होल पश्चिम महाराष्ट्रात दोनच ठिकाणी अकरावीला इलेक्ट्रोनिक्स सुरु झालं होतं. इलेक्ट्रोनिक्स म्हणजे काय ते कुणालाच माहीत नव्हतं पण काय तरी हुच्च आहे इतकंच कळत होतं. मग काय, मिळतोय प्रवेश म्हटल्यावर घेऊन टाकला! अगदी सुरुवातीला एक आठवडा भौतिक शास्त्राची उजळणी झाली अन मग मुख्य विषय सुरु झाला. सुरुवातीलाच काम्पोनंटस ची ओळख वगैरे झाली. मग सरांनी शिकवले रेझिस्टन्स (रोधक) आणि त्याचे कलर कोड्स! हा भाग फारच मनोरंजक होता. आधी रंग ओळीने लिहायला सांगत.

अगर

लेखक नेताजी बोराडे यांनी गुरुवार, 26/03/2015 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
अगर तुम साथ देते तो आशियाँ हम सजा देते, यूँ बिखरी सी ज़िन्दगी को हम जीने की वजह देते. समज़ ये हम को भी है की हमारे तुम नहीं लेकिन, समज़ दिल को भी होती तो, हमसफर गम नही होते. - नेता

माझी काझिरन्गा सफर - भाग २

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 26/03/2015 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मागचा भाग : माझी काझिरन्गा सफर मागिल भाग थोडा जास्तच त्रोटक झाला. या भागाचा उद्देश ही सहल कशी करावी याची माहिती देणे आहे. काझिरंगाला पोहोचायचे तर सुरुवात गुवाहाटीपासुन करुयात. गुवाहाटी हे आसामचे सर्वात मोठे शहर. प्रशासकिय राजधानी दिसपुर ही गुवाहाटीचाच एक भाग आहे. मला गुवाहाटी कोणत्याही शहरासारखे वाटले. भरपुर गर्दी आणि महागड्या रिक्शा. ब्रम्हपुत्रेचे बरेच घाट शहरात आहेत. फॅन्सी बाजार/ पलटन बाजार भागात बरीच होटेल्स आहेत. तिथे रहाता येउ शकते.

जर्मनविंग्ज 4U 9525.. लॉक्ड इन ?!

लेखक गवि यांनी गुरुवार, 26/03/2015 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनविंग्ज फ्लाईट नंबर फोर-यू-नाईनर फाय टू फाय या उड्डाणाच्या आल्प्समधे झालेल्या क्रॅशला फॉलो करण्यासाठी ही जागा आहे. अपडेट्स वेगाने येताहेत. काही ऑब्सोलीट होताहेत आणि काही वेगळ्याच दिशेला नेताहेत. संकलनाचा हेतू आहे. लुफ्तांझा कंपनीची चाईल्ड कंपनी असलेली जर्मनविंग्ज १९९७ मधे सुरु झाली होती. आजरोजी कंपनीकडे जवळजवळ ऐंशी विमानं आहेत. त्यापैकी निम्मी एअरबस ए ३१९-१०० सीरीजची आहेत. उर्वरितांमधे निम्मी एअरबस ३२०-२०० सीरीज आणि निम्मी बंबार्डियर जातीची विमानं आहेत. अपघातग्रस्त विमानाची जात: एअरबस ३२०-२११.

गनिमी कावा

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/03/2015 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
विचारत इकडे तिकडे आले आज पाहुणे घरात आले अहाहा सदन धन्य झाले .. निवांत खुर्चीवर ते बसले मान डोलवत जरासे हसले रुमालाने तोंडही पुसले .. 'कसे काय तुम्ही वाट चुकला आठव आमचा कसा जाहला ?' - गूळपाणी देत प्रश्न विचारला .. ओशाळवाणे पाहुणे हसले हळूच इकडे तिकडे पाहिले प्रश्नाचे उत्तर देणे टाळले .. पिशवीतून मोबाईल काढला रुमालाने स्वच्छही पुसला माझ्या हाती तो सोपवला .. "गनिमी कावा" त्याचा ध्यानी आला माझ्या त्याच क्षणी मुकाट उठलो हाती धरुनी .. जर्जर जीव त्या पाहुण्याचा "चार्जर" विसरला मोबाईलचा शोधला पत्ता माझ्या घरचा .. ! .

डोळे आमचे आहेत म्हणुनी

लेखक विदेश यांनी बुधवार, 25/03/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस टाकू कटाक्ष तिरपा मोहकसा ग पुन्हा पुन्हा - नकोस करू गर्व रुपाचा ठुमकत मिरवत पुन्हा पुन्हा - घमेंड तुजला रूपगर्विते दाखवी आरसा पुन्हा पुन्हा - नित्य आवडे आत्मस्तुती मनास कशी पुन्हा पुन्हा - डोळे अमुचे आहेत म्हणुनी रुपडे बघतो पुन्हा पुन्हा - आम्ही नसतो डोळेही नसते विचार कर ग पुन्हा पुन्हा .. !

असह्य हा उकाडा...

लेखक बाप्पू यांनी बुधवार, 25/03/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या उकाड्यामुळे खूप हैराण झालो आहे. आणि माझे घर अश्या ठिकाणी आहे जिथे बाहेरून भरपूर हवा येण्यासाठी विशेष अशी योजना नाहीये. खिडकी आणि दरवाजे १५ ते २० मिनिटे जरी लावून घेतले तर आतील तापमान आणि बाहेरील तापमान यामध्ये जवळपास ८-१० सेल्सिअस चा फरक पडतो. कित्येकदा घराला लॉक करून थोडा वेळ बाहेर गेलो आणि आल्यावर दरवाजा उघडला कि जणू काही भट्टी मध्ये शिरलोय असे वाटते... या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास रात्री झोपताना होतोय. रात्रभर इतके उकडते कि झोप च येत नाही.. फ्रीज खोलून आतमध्ये स्वताला कोंडून घ्यावे असे वाटते.. ( एकदा असा प्रकार चक्क केला देखील) .