बोलाचीच बिर्याणी!
कसाबविरुद्ध खटला लढवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम ह्यांनी असे विधान केले आहे की कसाबला बिर्याणी खिलवण्यात येते अशी वदंता त्यांनीच पसरवली होती. कसाबबद्दल सहानुभूती वाटू नये म्हणून त्यांनी हे खोटे पसरवले.
इतके क्रूर कृत्य केलेल्या आरोपीबद्दल लोकांना सहानुभूती वाटेल असे निकमांना का वाटावे हे एक कोडेच आहे.
त्याने जे केले त्याला पुरेशी प्रसिद्धी दिली असती तर ते पुरले असते. त्याला खोट्या बिर्याणीची फोडणी द्यायची काय गरज आहे? मला वाटते असा खोटारडेपणा करणे अगदी कसाबबद्दल असले तरी खोडसाळपणाचे आहे. ह्या बिर्याणीमुळे त्या वेळच्या सरकारच्या अब्रूचा फालुदा झाला त्याला जबाबदार कोण?
संस्कृत सुभाषिते
आजपासून काही संस्कृत सुभाषितांचा परिचय करून देण्याचा विचार आहे. घाबरू नका. ही शाळेत शिकलात तशी "नीतीशतका"तील उपदेशात्मक नसतील. आपले मनोरंजन नक्कीच करतील याचा भरोसा देतो.
मागे आपण आदीमाता व शिवशंभू यातील संवाद पाहिला होता (आठवत नाही ? ह्ररकत नाही. ही लिन्क http://www.misalpav.com/node/24338) त्यांच्याच संसारातील एक पर्व. शंकराने हालाहल कां प्राशन केले ?
पुस्तक परिचय - आग्र्याहून सुटका भाग अंतिम ४
आग्र्याहून सुटका भाग अंतिम ४
समापन
या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो. लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान 9) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो. 1. कोणताही पुर्वाग्रह नको. 2.देखा एक ख्वाब तो
"का कुणास ठाऊक पण ऑफिसमधून आज दुपारी ३ लाच बाहेर पडलो. कोणालाच न सांगता . खाली पार्किंग मध्ये पहातो तर काय बाइक गायब. अरे बाप रे ! डायरेक्ट पोलिस स्टेशनला जायला हवे म्हणून निघालो तर गेटवरच बस हजर. अगदी पोलिस स्टेशन च्या पाटीसहीत. याआधी अशा पाटीची बस कधी पाहिली नव्हती . बर बस मध्ये बसलो तर मी सोडून कोणीच नव्हते. अगदी कंडक्टरसुद्धा . बस सुरु झाली आणि भरधाव वेगाने निघाली कि खिडकीबाहेरचे काहीच दिसत नव्हते. ती थांबल्यावर उतरलो नि पहातो तर समोर आफ्रिकेचे जंगल . तसाच जंगलातून चालू लागलो. समोर कॅलेंडरवर दिवसामागून दिवस उलटत होते . शेवटी जंगल संपले नि पुढे सहारा वाळवंट पसरले होते.
खग्रास सूर्यग्रहण
आज (२० मार्च २०१५) खग्रास सूर्यग्रहण झाले.
जगात अनेक ठिकाणी या घटनेला बरेच बरेवाईट (जास्त करून वाईट) संदर्भ असले तरी शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही एक दुर्मिळ पर्वणी असते. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या मानाने खग्रास सूर्यग्रहण कमी वेळा होते. या प्रकारात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकत असल्याने खंडग्रास सूर्यग्रहणात शक्य नसलेले अनेक शास्त्रीय प्रयोग या काही मिनिटांच्या काळात आटपण्यासाठी त्यांची लगबग चाललेली असते. त्याशिवाय, सूर्याचे अनेक अवस्थेतली प्रकाशचित्रे काढण्यासाठी त्या विषयातल्या तज्ज्ञ आणि हौशी लोकांनाही ही पर्वणीच वाटते.
अंदमानी सहल
अंदमान द्विपसमूह भारताचे अविभाज्य अंग आहे. ही आपल्याकरता खरेच आनंदाची गोष्ट आहे. हिंदी महासागरास मिळालेले, हिंदी हे नामाभिधानही कदाचित, ह्याच आपल्या अस्तित्वाचे द्योतक असावे. मात्र, महासागरातील त्याच्या स्थानामुळे, अंदमान आणि निकोबार राज्यात, वर्षाचे बहुतांशी दिवस हवामान ढगाळ, वादळी आणि पावसाळी राहते. धूसर राहते. तापमान जरी मुंबईसारखेच असले तरी, हवामानातील महासमुद्री बेभरवसा, तिथे पुरेपूर भरून राहिलेला आहे. वर्षातले काही दिवसच तिथे वातावरण समेवर येते.
वसंत
वार्यावर मंद निनादे
ती श्रीकृष्णाची मुरली
त्या अवखळ स्वरलहरींना
अवखळशी कविता स्फुरली...
ल्याइली आज धरणीने
का गर्भरेशमी शाल
किरणांनी आकाशात
उधळला कशास गुलाल
पसरला रोमरोमी का
अवखळसा एक शहारा
का कसा कुणास्तव आज
हा निसर्ग नटला सारा
पसरली सुखाची चर्या
अन् उडून गेली खंत
अवतरे आज धरणीवर
तो ऋतुराज वसंत
अदिती जोशी
रसज्ञ नरभक्षक
कां उगीच घाबरतोय आम्ही?
कां उगीच गळा काढून रडतोय?
कां उगीच त्यांचा वारसा सांगतोय?
तो नरभक्षक चटावलाय
आपला क्रुस
आपल्याच खांद्यावरून वाहणार्या
महात्म्यांच्या रक्ताला
तो क्रुस खांद्यावरून वाहण्यासाठी
खांदे मजबूत लागतात
ख्रिस्तासारखे
गांधीबाबासारखे
दाभोलकरांसारखे
पानसरेंसारखे
आजन्म व्रतस्थ जनसेवेतून
बहूमताच्याही विरोधात सत्यच सांगेन
अशा निर्धारी आचारातून
ऋशींनाही लाजवेल
अशा निर्मोही चारित्र्यातून
मजबूत होतात असे खांदे
आमची जनसेवा
सोयीची आणि सवडीची
थोडेसे दमल्यावर
कुणी लालूच दाखवल्यावर
कुणी धमकावल्यावर
क्रुस टाकून पळून जाणारे भेकड आम्ही
आमचे रक्त चालत नाही त्याला
भुकेला तरी
चवीचा रस
मिसळपाव