Skip to main content

ऋतु आला ऋतु गेला

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 24/03/2015 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
शिरशिर गारव्याचा ऋतु आला ऋतु गेला पानगळीने सकाळी सडा पिवळा पडला सूर छेडिले नभांत नाद घुमे काळजात श्वेत मेघांचे हे गाणे गाती निळ्या अंबरात हुरहुर काहीलीचा ऋतु आला ऋतु गेला शालू हिरव्या पाचूचा काळ्या आईने नेसला तुझे पाऊल पडता अस्सा होता तो देखावा तुजविना साहवेना आज पुन्हा तो चांदवा - संध्या डिसें २०११ ( पीले पत्तो का मौसम जा चुका है या जावेदसाहेबांच्या मध्यवर्ती कल्पनेवरून हा मुक्त अनुवाद ..)

संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 24/03/2015 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठीका: स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, डेंगी, गॅस्ट्रोपासून इबोलासारख्या संसर्गजन्य आजारांवर भविष्यात नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे आणि आरोग्य विभागाचा इतर खात्यांशी समन्वय साधला जावा, यासाठी महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या संदर्भातील आदेश आरोग्य खात्याला दिले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

अर्थशास्त्र आणि बॅंकिंग

लेखक 'पिंक' पॅंथर्न यांनी मंगळवार, 24/03/2015 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
The Justice Department is ordering bank employees to consider calling the cops on customers who withdraw $5,000 dollars or more.. आणि असा व्यवहार हा संशयास्पद समजला जाणार. आज सकाळी चुकुन वरील बातमी वाचनात आली. माझे अर्थशास्त्र आणि बॅंकिंग क्षेत्रातील ज्ञान तसे अल्पच आहे. पण बातमी अमेरिकेची आहे म्हणुन भुवया उंचावल्या. अर्थात त्यामागे काहीतरी प्रयोजन असणारच. मला पडलेले काही प्रश्न ... माझ्या बॅंक खात्यातुन मी माझेच पैसे मोठ्या रकमेत का काढु शकणार नाही ? आणि जर काढले तर असा व्यवहार संशयास्पद कसा काय होऊ शकतो ? भारतात असा नियम आहे का ?

लागला मला छंद

लेखक शशिका॑त गराडे यांनी मंगळवार, 24/03/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
सखे लागलाय मला छंद तुला तु़झ्या नजरे आड तुला पहाण्याचा तु़झ्या हास्यात माझे हास्य पहाण्यचा तुझ्या डोळ्यांत माझे जग पहाण्याचा

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 24/03/2015 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

गुर्जी

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 24/03/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
विसरलो नाही मी तळव्यावरची जांभळी खूण फोकाचा तो जाड व्यास गणित म्हणजे काय अजून? इतिहासाच्या सनावळी एकाखाली एक शंभर ओळी खाडाखोड केलीत तर जाळ काढेन कानाखाली शुद्धलेखन अलंकार निबंधाचा सॅाल्लिड त्रास वहीवरती लाल भोपळे ओणवे रहा एक तास आम्ल आणि अल्कली सारी अक्कल बुडाली शिवाय होती ठरलेली शिव्यांची लाखोली पाढे जर चुकलात तर पायाखाली तुडवीन कोंबडीचे पाय काढलेत तर वहाणेने बडवीन शीत वारे उष्ण वारे इकडून तिकडे वाहून गेले आमचे सारे बालपण त्यांच्या संगे उडून गेले गुरुजींच्या भितीमुळे आपसूक शिकत गेलो फटके खाल्ले थोडेफार कणखर मात्र बनत गेलो आयुष्यातले स्थैर्य पाच आकडी पगार कुणामुळे मिळाला हा सुखी स

सुखाची परिभाषा - डेसिडेराटा (मॅक्स एह्र्मान)

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 24/03/2015 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी The Real Shine या सुखाचं एक रुप सांगणार्‍या मुक्तकाचं मराठी रुपांतर इथे केलं होतं. आज मॅक्स एह्र्मान याच्या Desiderata (desired things) या भक्तिकाव्यावर आधारित सुखाची दुसरी एक व्याख्या सांगणारं तसंच एक मुक्तक इथे देतो आहे.

मंतरलेली रात्र

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 24/03/2015 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
तूज भेटिची ती रात्र, उशीरानेच जरा उगवली आेढीच्या आतूरतेप्रमाणेच, लवकर मावळलीही युगां प्रमाणे जाणवला, वाट बघण्याचा काळ तो त्यातील गंमत काही औरच, असहाय्य तरीही सुखद तो ठरली वेळ, ठरला काळ, ठरले बाकी सारे काही पण ठरतच न्हवते बोलायचे कोणी आणि काय ते माहीत नाही लाटांच्या सानिध्यात, सुरुवात काहीशी अंधुक झाली संगीतमय त्या प्रसंगी मज पूनवेची भरती आली शर्करेसम तूझे ते आेठ, प्रश्नार्थक गुरफटलेले अन नाजूक तूझ्या त्या देही, जणू चंदन पांघरलेले बोलक्या डोळ्यांस तूझ्या पाहूनी, मी मुका बापूडा मुकलो शब्दसखे सोडूनी गेले, अन मी एकटा पडलो तूझ्या चेहरयावरचे, भाव टिपण्यास मी तत्पर जणू चातक मी आकाशी, पावसाच्या
काव्यरस

या गावाचं काही खरं नाही!

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 23/03/2015 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!' बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?' अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु. सोमवार असूनही रस्त्याला गर्दी बेताची होती, अवघ्या एका तासात घरी आलो.