Skip to main content

युद्ध आणि छोटेसे देश...... [ खलील जिब्रान ]

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 20/03/2015 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
एका कुरणात एक कोकरू आपल्या आईबरोबर चरत होते. त्याचवेळी एक गरुड, उंच आकाशातून वखवखलेल्या नजरेने त्या कोकराभोवती घिरट्या घालू लागला. गरुड खाली झेपावून कोकरावर झडप घालणार, इतक्यात आकाशात दुसरा एक गरुड हावरट पणे गिरक्या घेऊ लागला. त्याचीही नजर त्या कोकरावर अन त्याच्या आईवर! ते पाहून पहिला गरुड खवळला. त्या दोन पक्षीराजांमध्ये जमिनीवरील कोकरासाठी आकाशातच युद्ध सुरु झाले. त्यांच्या कर्कश आवाजाने आसमंत भरून गेला. कोकराच्या आईने वर पाहिले.

स्मशान शांततेची शिकवण

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शुक्रवार, 20/03/2015 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
अरे, वर्गात कितीरेही गडबड सगळे शांत बसा बघू प्रश्न विचारु नका उत्तरे शोधू नका चर्चा करु नका सगळे पास होणार आहात तुम्ही आपो‌आप परिक्षेशिवाय पुढच्या वर्गात जाणार आहात काय म्हणता?
काव्यरस

व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग ४

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 20/03/2015 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १, भाग २, भाग ३ डॅन्युब नदी आणि तिच्या दोन तीरांवर वसलेले आणि रात्री चमचमणारे बुडापेस्ट बघून आता दुसऱ्या दिवशी बुडा किल्ला बघण्याची उत्सुकता होती. हंगेरीतील राजघराण्याचे वैभव असलेला हा किल्ला तेराव्या शतकापासून तर आजतागायत दिमाखात उभा आहे.

भाडेकरु

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 20/03/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
भाडेकरु हा कोणीही असला तरी भाडेकरुसारखाच वागणार. त्यात पुणेरी भाडेकरु असेल तर मग बोलायची सोयच नाही. जुन्या वाड्याच्या लाकडांमधून ढेकूण बाहेर काढणे जितके अवघड तितकेच जुन्या भाडेकरुला घरातून हुसकावून लावणे महाकठीण. स्वतःचे कितीही नुकसान झाले तरी चालेल. सामयिक संडास, अपुरा प्रकाश या अडचणी सोसेल. घरमालकाशी पिढ्यानपिढ्या भांडत राहील. पण भाड्याची जागा तो सोडणार नाही. अगदी फेव्हिकॉलचा मजबूत जोड. एक निराधार तरुण स्त्री आपल्या लहानगीला घेऊन पुण्यात आली. एका भल्या घरमालकाने आपल्याकडच्या ४ खोल्या तिला भाड्याने दिल्या. स्थिर स्थावर होशील तेव्हा भाडे दे असेही सांगितले. पुढे तिची स्थिती थोडी सुधारली.

पंचांग कोनते घ्यावे?

लेखक अव्यक्त यांनी शुक्रवार, 20/03/2015 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्ष सुरू होताय. या वर्षीपासून प्रत्येकाने आवर्जून पंचांग घरात ठेवा. पंचांग हा अत्यंत उपयुक्त माहितीचा खजिना आहे. तुम्ही ज्या गावात राहता, त्याच्या किंवा त्याजवळच्या गावाच्या अक्षांश रेखांशांवर आधारित पंचांग घ्या. कुठल्या नक्षत्रांवर आपण आपली कामं करायची आणि कुठल्यावर कशापासून दूर रहायचं? ...जरा तुम्हीच सांगा ना कुठली नक्षत्रं चांगली आणि कुठली वाईट ते. हे पंचांगात कुठे सापडेल?

एक संवाद - २

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 19/03/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक संवाद - 1 ती - काय रे ? कुठे होतास इतका वेळ ? ऑन लाईन दिसत नव्हतास… तो - उशीरा आलो आज. ती - ओके, काय विशेष? उशीर का झाला? तो - आता तूपण बायको सारखे प्रश्न विचारायला लागलीस ती - नाही सांगायचं तर नको सांगूस. तो - अरे लाँग ड्राईव ला गेलो होतो ना. ती - ओह्ह. तो - तुला बोलावलं होतं, नाही आलीस. ती - कुठे गेला होतास तो - असं काही ठरवून नव्हतो गेलो ती - म्हणजे ? तो - नाशिकरोड ला चालवत राहिलो ती - ओके, आणि मग तो - एक रिपोर्ट बनवतो आणि देतो तुला मग वाचत बस.

नवीन कॅमेरा घेणे आहे...

लेखक मेघनाद यांनी गुरुवार, 19/03/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा मंडळी, तसा मी आजपर्यंत हौशी छायाचित्रकार आहे. आजपर्यंत जे काही टिपण्यासारख दिसेल ते भ्रमणध्वनी संचातून टिपायचा प्रयत्न केला...आणि मिपा वर प्रदर्शित केला. त्याला संमिश्र प्रतिसाद पण मिळाले. आता मात्र जरा मोठा कॅमेरा म्हणजेच DSLR घेण्याची अतीव इच्छा झाली आहे. तर मग आता मार्गदर्शनासाठी मिपा करांकडे आलो आहे. मी स्वतः अजून एकदाही DSLR वापरला नाहीये पण तांत्रिक माहिती आणि काय आणि कस वापरायाच याची बर्यापैकी माहिती मिळवली आहे. सध्या हौशी आणि सराव करून कुशलता मिळाली कि व्यवसायिक छायाचित्रकार (लग्न आणि इतर छोटे-मोठे कार्यक्रम) म्हणून प्रयत्न करायची फार इच्छा आहे.

भाव तिथे देव

लेखक निनाद जोशी यांनी गुरुवार, 19/03/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
काय हो वर्णावा त्या नराचा स्वभाव घेतला ज्याने देव विकत बाजारी चार मोजले रोकडे अन म्हणे आता धाव तुच मला वाचव संकटा पासून तुला मी रे दिले माझ्याकडले हे धन आता सोडव ह्यातुन मजला देवा अरे वेड्या त्याच्या लेखी तू आहेस कंगाल त्याला पाहिजे जो माल तुझ्याकडे नाही संत सांगती सज्जना मनी असुदेत भाव तोच करेल बचाव स्वता: हून
काव्यरस

स्मारक बांधून काय होतं ?

लेखक चिनार यांनी गुरुवार, 19/03/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पात छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्व. श्री बाळासाहेब ठाकरे ,स्व. श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्मारक बांधण्यासाठी ४००-५०० कोटींची तरतूद करण्यात आली. गुजरात मध्ये सुद्धा स्व. श्री वल्लभभाई पटेल याचं स्मारक बांधण्यात येणार आहे. खर्च जवळपास ४००० कोटी. या स्माराकांद्वारे काय साध्य होते ? जनतेच्या पैशांनी स्मारक बांधणे या महापुरुषांना तरी आवडेल का ? याद्वारे पर्यटनाला थोडीफार मदत होते हे मान्य ! पण पण हेच पैसे योग्य ठिकाणी वापरून पर्यटन आणी अन्य व्यवसाय जास्त वृद्धिंगत करता येणार नाही का ?

एका जत्रेची सत्यकथा ! (ज्यांच्या धार्मिक भावना वगैरे पटकन दुखावल्या जातात त्यांनी हा लेख वाचू नये . )

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 19/03/2015 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एका देवळा मागची गोष्ट . एका छोट्या गावातले हे देऊळ. दरवर्षी इथे जत्रा भरते. तिथे लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी ज्यादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली आहे .त्यात आजकाल अनेक वीवीआयपी भाविक असतात . त्या देवळाची तुलना आता थेट पंढरपूराशी केली जाते . तर या देवळाची किंवा जत्रेची ही सत्यकथा . सुमारे १८५० नंतरचा काळ. (नक्की साल माहित नाही ). ब्रिटीश राजवटीत अनेक छोटेमोठे संस्थानिक होते . त्यातील एका छोट्याश्या संस्थानिकाच्या पदरी एक सरदार होता . आजूबाजूच्या गावातील सारा वसुलीचे काम त्याच्याकडे होते.