Skip to main content

ती आणि तो : भाग ४

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 17/03/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
आधिचे भाग : (भाग १)(भाग २)(भाग ३) त्याने तिला नंतर बऱ्याचदा फोन केले, मेसेज केले, पण तिने एकदाही उत्तर दिलं नाही. आणि तिने फोन उचलला असता तरीही बोलायचं काय, हे त्यालाही माहित नव्हतं. त्याला फक्त बोलावं वाटत होतं तिच्याशी. त्याने काही निर्णय घेतलाच नव्हता. त्याचा संभ्रम पाहून तिनेच चिडून त्याला मोकळं करून टाकलं होतं. त्याला मोकळं व्हायचं होतं कि नव्हतं हेहि त्याला माहित नव्हतं. तिच्या उत्तर न देण्यामुळे त्याचे फोन मेसेज कमी होत होत बंदच झाले.

ती आणि तो : भाग ३

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 17/03/2015 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
आधिचे भाग : (भाग १)(भाग २) काही दिवस असेच गेले. तिने आता ऑफिसला जायला सुरुवात केली होती. जाताना येताना, ऑफिसमध्ये सगळ्यांच्या बदललेल्या नजरा तिच्या लक्षात येत होत्या. काहीजण सहानुभूतीने वागत होते. काही जण तुच्छता दाखवत होते. त्यात काही स्त्रियापण होत्या. अगदी मोजके काहीजण काही झालं नाही असं दाखवून तिच्याशी आधीसारखं वागायचा प्रयत्न करत होते. ती तो, तिचे घरचे यापैकी कोणीही बाहेरच्यांना खरं काहीही सांगितलेलं नसलं तरी सगळ्यांनाच सर्व काही कळलेलं होतं. कसं काय कोणास ठाऊक.

ती आणि तो : भाग २

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 17/03/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग १) तिला शुद्ध आली तेव्हा त्यांनी तिला जवळ घेतलं. ती रडायची थांबत नव्हती. तिला पुन्हा झोपवलं. आणि दुसऱ्या दिवशी घरी घेऊन गेले. काही जवळचे लोक रात्रीच हॉस्पिटलमध्ये येउन गेले. पण त्यांना आणि बाकी सगळ्यांनाच असं सांगितलं कि तिचा एक अपघात झाला. आणि तिला शुद्ध नव्हती म्हणून लवकर समजलं नाही. तिच्या अवस्थेकडे पाहून लोकांना शंका तर येत होती. पण कोणी उघडपणे बोलून दाखवलं नाही. पण जेव्हा घरी पोलिस येउन गेले तेव्हा त्यांच्या शंकांवर शिक्कामोर्तबच झालं.

ती आणि तो : भाग १

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 17/03/2015 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे १० वाजून गेले होते. तो एक फिल्म बघत बसला होता. आता थोड्यावेळात तिला एक कॉल करायचा, थोडा वेळ गोड गप्पा मारायच्या आणि झोपायचं असा त्याचा बेत होता. पण तिच्या आईचाच कॉल आला आणि तो दचकला. आईंचा कॉल आणि तोसुद्धा यावेळी. तसं त्या दोघांबद्दल दोघांच्याही घरी माहित होतं. घरचं वातावरणपण मोकळं होतं. दोघांच्या आईवडिलांनी त्यांच्या नात्याला मंजुरी देऊन टाकली होती. आता त्या दोघांनी तयारी दाखवल्यावर पुढचा कार्यक्रम ठरवायचा होता. आता तिची आई साखरपुड्याची घाई करायला सांगेल कि काय या शंकेने त्याने फोन उचलला. "अरे तुम्ही दोघं सोबत आहात का? हि अजून घरी नाही आली. फोन करून सांगत तरी जा रे.

* अभिनव मोडी लिपी स्पर्धा *

लेखक समिर२० यांनी मंगळवार, 17/03/2015 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मित्र श्री परेश जोशी आणि मोडी लिपीचा प्रसार करणारे त्यांचे सहकारी यांनी येत्या महाराष्ट्र दिनी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे: * अभिनव मोडी लिपी स्पर्धा * ... एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्राच्या चार शहरात ... (१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा " (२) " शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा " महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०१५ या दिवशी एकाच वेळी मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांमध्ये मोडी लिपीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

First Things First

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 17/03/2015 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
A Real Shine हे आंतर्जालावर खूप वर्षांपूर्वी वाचलेलं मुक्तक आज पुन्हा एकदा सापडलं, आणि त्याचं मराठी मुक्त-रुपांतर करावंसं वाटलं: दिवस उजाडला की घड्याळ-काटा धावतांना दिसतो असं वाटतं, की वेळ कधीच पुरेसा का नसतो काम असतं खूप!

टेंडर (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 17/03/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्यान साहेब खुशीत होते. फायद्याचं कलम असणार हे सगळ्यांनी ओळखलं. सायबांनी बेल मारली - केबिनमधे सगळे शिपाई जमले. ''आपल्या संस्थेत स्वच्छ्ता चांगली होत नाई. तुमची टाळाटाळ असतेच, त्यातून आपली संस्था जुनी. खोल्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे आपण शासनाला प्रस्ताव दिलावता - व्ह्याक्यूम क्लिनर्सची गरज आहे. त्याप्रमाणे लगेचच टेंडर पास हून पाच यंत्रं आलीयत . . सगळ्यांनी नीट बघा कशी वापरायची. सोमवारपासनं संस्था एकदम चकाचक दिसायला पायजेल !''. *** महिना निघून गेला रुटीन सुरु ऱ्हायलं- घाण तशीच! सायबानं घेतलंन सगळ्याना .

असा मी अबबमी - ४

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 17/03/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ "आज पयला मी. सगळे स्क्रीनवर दिसतायत. ऐकू पण येत असेल असे पकडून चालतो. आजही मी शुद्ध मराठीतून बोलणार. एखादा शब्द चुकीचा असेल तर लगेच दुरुस्त करून सांगा. मनसेच्या मुली तर आल्या नाहीत ना? अबबतंत्राच्या सावकाश विकसित होणार्‍या व्याख्येवरून ध्यानात येते की या एवढ्या सूक्ष्मस्तराच्या विश्वात पुंजयांत्रिकी म्हणजे क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट्स फारच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मग व्याख्या नंतर बदलली.

आज अवसेची रात आहे..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 16/03/2015 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ही कविता...... ज्यांचे नवरे कुणालाही न कळवता वर्षानुवर्ष परागंदा झालेले आहे....... आणि केवळ त्यांच्या मरणाची खबर नाही या एका आशेवर त्यांची वाट पहाणार्‍या त्यांच्या बायकांना समर्पित..... गेला दिस वेशीपार ना चांदण्याला जाग आहे सख्या ये बिगीने घरा आज अवसेची रात आहे.................. भोवतालच्या सावल्या गेल्या परतुनी घरा मागे उरली एकटी मीच माझ्या संगतीला भिवलेल्या माझ्या मना तुझ्या आठवांची साथ आहे सख्या ये बिगीने घरा आज अवसेची रात आहे.................. वारा सुटला मोकाट नावे साद मला घाली तुला पाहता ना घरे वैरी अंगचटीस लागी घडु नये काही भलते अघोरी त्याचा चाळा आहे सख्या ये बिगीने घ

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३५ (विवाह विशेष...-२)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 16/03/2015 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मागुन येऊन मग मला अचानक काकूनीच जागं केलन. "अरे आत्मू..आता जरा ध्यानातून बाहेर ये...आणि तुझ्यासाठी जे ध्यान तिकडे आत डोळे-लावून बसलय ना? त्याच्यासाठीच्या तयारीला लाग..जा .. आवरायला घे त्या शेजारच्या घरात जाऊन... जा!" असं म्हणून तिनी मला संथेतून-पौरोहित्यात आणलन... पुढे चालू... ============================ वस्तुतः आमची मित्रमंडळी आणि मी स्वतः देखिल,या आदल्या दिवशी वांङनिश्चय वगैरे करण्याच्या विरोधी होतो.