Skip to main content

रूसली ही पोर ..

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 07/03/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोर ( कविता) रूसली म्हणून खरडलेय काहीतरी .. कविता कुठूनी उतार नाही कुठूनी चढाव नाही रूसली ही पोर तिच्या भावनांना वाव नाही तोच तोच दिवस रोज विसाव्याची बात नाही गंधाळिल्या मोग-याची पुन्हा तशी रात नाही साचलेल्या पाण्याला या कुठूनी प्रवाह नाही रूसली ही पोर तिच्या भावनांना वाव नाही उन्हाने जो गेला पारा आरशाला भाव नाही आठवांची सांज होई आसवांचा ठाव नाही खुलले ना शेर अता गझलेला दाद नाही हरविले शब्द तिचे तिची तिला याद नाही याद नाही दाद नाही कवितेला नांव नाही रूसली ही पोर तिच्या भावनांना
काव्यरस

क्षमा परमो धर्म: - राजा कुशनाभच्या मुलींची कथा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/03/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्षमा दानं क्षमा सत्यं क्षमा यज्ञाश्च पुत्रिकाः I क्षमा यशः क्षमा धर्मः क्षमया विष्ठितं जगत्II (वाल्मीकि रामायण बाल कांड ३३/८) क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे. क्षमेवरच हे सर्व जगत् टिकून आहे." ॥ ८ रामधारी सिंह यांनी आपल्या कवितेत लिहिले आहे: क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो उसको क्या जो दंतहीन विषरहित, विनीत, सरल हो। क्षमा हे माणसाचे भूषण आहे. दुर्बल माणूस अन्याय सहन करतो, तो क्षमा करू शकत नाही. किंवा त्यांनी केलेल्या क्षमेला कोणी महत्व ही देत नाही.

कातरवेळ......

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 06/03/2015 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
ती येताना कधीच रिकामी येत नाही अगदीच काही नाही तर........... आठवणीचं गाठोडं सोबत घेउन येते काही आठवणी असतात नाजुक अगदी शेवरीच्या कापसासारख्या.. तर काही अगदी नकोश्या कुमारिकेच्या गर्भारपणासारख्या... अश्याच आठवणींच्या कोंडाळ्यात माझ्या अस्तित्वापासून मलाच हिरावणारी...........................कातरवेळ एक ना एक दिवस तो आपला होईल या आशेवर तिने त्याचा पार क्षितिजापलिकडे पाठ्पुरावा केलाय कधी लपुन तर कधी जाणिवपूर्वक मागावर असलेल्या तिच्या चाहत्याला मात्र हुलकावणी देत पुरता हिरमोड केलाय ना तो झाला कधी तिचा........... ना कधी ती कुणाची झाली......... आयुष्याच्या एकाकीपणांत अडकलेली हुबेहुब माझ्या प्रतिबिंबा

दिगंबर - फसलेला संन्याशी अन थकलेला संसारी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 06/03/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
'स्वामी दया करा. आता या वयात हे करायला सांगू नकात. कळत नव्हतं, तेव्हापासून तुमच्या पंखाखाली घेतलंत मला! चार चांगल्या गोष्टी शिकवल्या! ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत. येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत. चार घरी अनवाणी पायांनी भिक्षा मागायला शिकवलीत. प्रसंगी, स्वतः रांधून एकटच जेवायला शिकवलंत. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत, पण आता हे करायला सांगू नकात! तुम्ही युगांडात म्हणालात, मी युगांडात गेलो. तुम्ही रवांडात म्हणालात, मी रवांडात गेलो. तुम्ही टांझानियात म्हणालात, मी तिथेही गेलो. तुम्ही पोरांना शिकव म्हणालात, मी शिकवलं. तुम्ही आजार्यांची सेवा कर म्हणालात, मी केली. तुम्ही '

आमच्या विवाहाची कहाणी - २

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 06/03/2015 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
दहा जुलै ला घरी यायचे होते त्या अगोदर दोन आठवडे एक मध्यम वयीन सदगृहस्थ संध्याकाळी माझा पत्ता शोधत आमच्या मेस मध्ये आले. ते सांगली जवळच्या एका शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या शाळेतील एक शिक्षिका त्यांचे यजमान दारू च्या आहारी गेल्यामुळे विभक्त झाल्या होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी लग्नाची होती. रोहिणी या मासिकातील जाहिरात वाचून त्या बाईंच्या विनंती वरून ते आले होते. मुलगी उत्तम शैक्षणिक करीयरची आणि सांगलीहून डॉक्टर झालेली होती. आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे या कारणास्तव मुलीला नंतर नकार देतात आणि तिची परिस्थिती वाईट होते या कारणास्तव ते अगोदर त्याची चाचपणी करण्यासाठी आले होते.

ऑरेंज तिरामिसु

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 06/03/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
तिरामिसु हे एक सर्वांचे आवडते इटालियन डेझर्ट.. तिरामिसु चा अर्थ 'पिक मी अप' ..आणि खरंचच तिरामिसु पाहिले की त्याला पिक करायचा अनिवार मोह (वाढत्या वजनाची,साखरेची तमा न बाळगता )होतोच, ह्या वेळी नेहमीच्या तिरामिसुत थोडा बदल केला आणि एक अफलातून तिरामिसु व्हर्जन जन्माला आले..

विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 06/03/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?) इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले. तरी विद्वान म्हणवून घेण्यासाठी काय करावे ?