Skip to main content

अत्युच्च साहसी सायकलिंग...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 06/03/2015 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
सायकल चालवणे ही काहींच्या सर्वसामान्य जीवनातली आवश्यकता आहे तर इतरांसाठी आरोग्यदायक व व्यायाम आहे. काहींसाठी ते स्वतःतील धमक आणि त्राण सहन करण्याची सीमा (stamina) सिद्ध करण्याचा आनंददायक खेळ आहे. काही थोड्यांनी या वरवर साध्या व सोप्या वाटणार्‍या आणि केवळ मानवी ताकदीवर चालवल्या जाणार्‍या दोनचाकी वाहनाला आपल्या साहसाची भूक भागविण्यासाठी एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे... तो खेळ, छंद अथवा वेड साहसी सायकलिंग (adventure cycling) या नावाने ओळखला जातो. ह्या खेळाची आवड असणारा काहीसा वेडा असलाच पाहिजे !

वाडा (भाग 2)

लेखक जयंत माळी यांनी शुक्रवार, 06/03/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्या दिवशी सकाळी रामरावांचे लक्ष त्या खोलीकडे गेले तर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी ती खोली उघडली आहे.

व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग ३

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 06/03/2015 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिएन्ना - बुडापेस्ट - भाग १, भाग २ बुडापेस्टला जाण्यासाठी व्हिएन्नाच्या रेल्वे स्थानकावर पोहोचलो आणि गाडीची वाट बघत फलाटावर उभे होतो. आजूबाजूला मोजून एक दोन लोक. संचारबंदी लागू केल्यासारखे वाटत होते अगदी. कदाचित गाडी सुटायच्या वेळेवर येतील असे वाटले. पण ही संख्या काही वाढली नाही. पुन्हा एकदा 'हे राजधानीचे शहर असून इथे काहीच गर्दी कशी नाही, का नसेल, इत्यादीवर वायफळ चर्चा झाली.

माहिती

लेखक आयुष्य यांनी गुरुवार, 05/03/2015 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता फॉन्टफ्रिडम हे एका मराठी देवनागरी फॉन्टमधून दुस-या मराठी देवनागरी फॉन्टमध्ये रुपांतरण करणारे एक उत्तम सॉफ्टवेअर आहे ते इंटरनेट वर फ्रि मध्ये उपलब्ध आहे का? या बाबत माहिती द्यावी. किँवा आपल्यापैकी कोणाकडे असेल तर मला ते सॉफ्टवेअर मिळू शकेल का?

भग्न अवशेष

लेखक कहर यांनी गुरुवार, 05/03/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे राहिले भग्न अवशेष बाकी वदे कोण त्या राउळाची कथा .. पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे न ओळखे परी देवतेची व्यथा ... --- कहर .
काव्यरस

वेड तिच्या प्रीतीचे……

लेखक निनाद जोशी यांनी गुरुवार, 05/03/2015 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
आता जरी का त्यागिले तिने मजला भेटणे रोज माझ्या स्वप्नी येते घेऊन सोबत चांदणे बैसतो काठी नदीच्या घेउनि हातात हात पाहतो डोळे भरुनी साठवतो तिजला मनात चाहूल त्या सूर्योदयाची लागते जेव्हा तिला विरुनी जाते दवामध्ये सोडून मजला एकला का कळेना सुर्य का इतक्या सकाळी उगवतो का कळेना मी सुद्धा असा अचानक उठतो पाहतो तिजला मनी अन स्वप्न हि पाहतो तिचे म्हणून वाटे लागले मज वेड तिच्या प्रीतीचे……

जडण-घडण 20

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 05/03/2015 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
बघण्या-दाखवण्याचे कार्यक्रम उत्साहात सुरू होते. या बाबतीत माझ्या आई-बाबांच्या बरोबरीने इतर नातेवाईकांचा उत्साह बघून मला मौज वाटत होती. मी या बाबतीत तटस्थ राहायचं ठरवलं होतं, त्यामुळे नव्या कामाकडे लक्ष केंद्रित करता येत होतं. नव्या माध्यमात मी रूळू लागले होते. आमच्या संचालक बंगाली बाई, भरपूर उत्साही आणि प्रयोगशील. सतत नाविन्याच्या शोधात. त्यांचं मराठी बोलणं, हा आणखी एक गमतीचा भाग. त्यांच्या बोलण्यात केवळ नपुंसक लिंगाच्या अनुषंगाने उल्लेख यायचे. ते कामत, ते कागद, ते पंखा, ते टिव्ही, ते मधुरा आणि ते स्टोरी. असं बरंच काही.

नुग्गेहळ्ळी

लेखक पॉइंट ब्लँक यांनी गुरुवार, 05/03/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
होयसाळा राज्यघरण्याने दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत दक्षिण भारतात राज्य केले. त्यांनी जवळपास दोनशे मंदिरे बांधली. त्यातील हळेबेद बेलूरची मंदिरे जगप्रसिद्ध आहेत. पण इतर बरीच मंदिरे दुर्लीक्षीत आहेत किंवा मोडकळीला आलेली आहेत. नुग्गेहळ्ळी हे हसन जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. श्रवनबेळगोळा पासून अवघ्या २६ किलोमीटर असूनहि प्रवाश्यांपासून लपून राहिले आहे. ह्या गावात तेराव्या शतकातील दोन सुंदर मंदिरे आहेत - लक्ष्मी नरसिंह आणि सदाशिव .

फोटो ओळखा.

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 05/03/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -