Skip to main content

प्रोटीन पॅक्ड तिखट आप्पे

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 30/01/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः ३ वाट्या तांदूळ १ वाटी उडदाची डाळ ३/४ वाटी मूग डाळ १/२ वाटी तूरीची डाळ १/२ वाटी चणा डाळ १/४ वाटी जाड पोहे ४-५ हिरव्या मिरच्या १ छोटा कांदा कढीपत्ता कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ

टोपणनाव

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 30/01/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात.

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 30/01/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 30/01/2015 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट

कृष्णमयी मीरा !!!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/01/2015 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत आपल्याकडे अनेक संत महात्मे होवून गेले. या सगळ्यांनी मराठीतील भक्तीसाहित्य समृद्ध केलेले आहे. पण मराठी भाषेच्या पलिकडे जावुन जर पाहिले तर इतर भाषांतही त्या त्या प्रांतातील संत महात्म्यांनी प्रचंड साहित्य निर्मीती केलेली आहे. मग ते संत तुलसीदासांचे 'तुलसी रामायण' असो, सुरदासाचे काव्य असो, कबीर्-रहिमचे दोहे असोत वा मीरेची पदे असोत. या सगळ्यांनीच भारतीय भक्ती साहित्याला एका विलक्षण उंचीवर नेवुन ठेवलेले आहे. मला स्वतःला मात्र यापैकी संत कबीर आणि संत मीराबाई यांच्याबद्दल एक विलक्षण आकर्षण आहे.

How to make Weighted Blanket - जड पांघरूण बनवा

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी शुक्रवार, 30/01/2015 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोएसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम. :) हळूहळू ऑटीझमबद्दल वाचताना, सेन्सरी disorder कळली. व हाय एनर्जी सेन्सरी मुलांना शांत करण्यासाठी जराशी जड पांघरूण किंवा जड जाकेट इत्यादींचा वापर होतो हे हि वाचनात आले. proprioceptive तसेच tactile सेन्सेस ना उपयुक्त इनपुट देण्यासाठी तसेच डीप प्रेशरसाठी याचा चांगला फायदा होतो.

मुळ्याची पालेभाजी

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 30/01/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर बरेच जण पाकृ टाकतात. मग "आम्हीच का मागे रहावे ?" असे आम्हाला सारखे वाटत राहिले तर त्यात नवल काय ? याच मेंदूभृंगाने छळल्यामुळेच केवळ घरात नेहमी आवडीने केली जाणारी आमच्या आवडीची मुळ्याची पालेभाजी जरूर सर्व त्या साभार अनुमत्या-परवानग्या घेऊन टाकत आहे. यात धाग्यात आमचा हक्क फक्त भारवाही हमालाचा आहे असे आम्ही अगोदरच झायीर करत आहोत, गैरसमज नसावा.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 29/01/2015 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मग मी,गुरुजी आणि बाकिचे सर्व विद्यार्थी, तो परिक्षे आधीचा महिना-फुल्ल तयारी करून..परिक्षा द्यायला निघालो- ते महाराष्ट्राच्या एका महान शहरात...म्हणजे कुठे???? तर ................." पुढे चालू... ============================== म्हणजे कुठे???? तर होय हो!..तुमचे पुणे - "ते विद्येचे माहेरघर-पुणे !ते मंडईचे पुणे..ते गणपति मारुतिंचे पुणे!.. ते शनिवारवाडा आणि लालमहालाचे पुणे!" काय आहे ना? आमचा काका नेहमी म्हणायचा, "या पुण्याची तारिफ नाहि केली ना?

कोण जिंकणार दिल्ली?

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 29/01/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्‍यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते.