Skip to main content

महागाईचे कारण

लेखक देवांग यांनी सोमवार, 02/02/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस शिक्षकांनी वर्गात सांगितले कि उद्या तुमच्या वर्गाचा ग्रुप फोटो काढायचा आहे तरी सर्वांनी प्रत्येकी ५० रुपये फोटोसाठी आणावेत त्याच वर्गात आपला बाळ्या पण होता, ज्याला लहानपणीच नेता बनायचं किडा चावला होता ...आणि तोच सर्व वर्गाचा नेता होता. जशी त्याने हि सूचना ऐकली ...तशी तास संपल्यावर रागाच्या भरात सर्व विद्यार्थ्यांना म्हणाला कि "हि तर खुली लुट आहे...हे शिक्षक हि शाळा आपल्याला अशीच लुटत राहणार ...मला सांगा कि फोटो प्रिंटआउटला ५० रुपये लागतात का ?...प्रिंटआउट १० रुपयात मिळते ....हि शाळा आपले सर्व शिक्षक राहिलेले ४० रुपये आपआपसात वाटून घेणार.

‘अनासक्त’... मुक्त भावयात्रा -१

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/02/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
a (पुस्तक-परिचय ) शाळेत असताना, कविता नावाच्या रम्य प्रकाराचे, त्यातल्या यमक, वृत्त, छंद, अलंकार नावाच्या हत्यारांनी ‘रसग्रहण’ नावाचे नीरस पोस्टमॉर्टेम करावे लागे. ते इतके डोक्यात गेले होते , की पुढे पुढे काव्य या प्रकारापासून किमान एक हजार किलोमीटर दूर राहण्याची मी दक्षता घेत असे. हा आकस निवळायला बरीच वर्षे लागली. हल्ली हल्लीच एखादी गेय आशयघन कविता पुन्हा मनावर जादू करू लागली आहे.

"बकेट लिस्ट "

लेखक मंदार कात्रे यांनी सोमवार, 02/02/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
कालच "बकेट लिस्ट " हा चित्रपट पाहिला ,त्यावरच्या चर्चेत एका साईट वर एक किस्सा होता - एका वेबसाईटने survey केला ,त्यात 10000 लोकांची मते मागवली होती, की तुम्हाला तुमच्या मृत्युची निश्चित तारीख सांगितल्यास तुम्ही काय कराल ? आश्चर्य म्हणजे 80% लोकांनी आपल्या मृत्युची तारीख जाणून घेण्यात रस नाही ,असे मत नोंदवले ! आपल्यापैकी किती जणांना मृत्युची तारीख जाणून घेणे आवडेल ? व तसे समजल्यास आपल्या जीवनात व जीवनशैलीत कायकाय बदल करावेसे वाटतील?

मन हे माझे

लेखक सुचेता यांनी सोमवार, 02/02/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
सभोवती आसपास कुठंच नसताना तू, माझं मन हे असं तुजभोवती रेखलेलं, उमजेल का कधितरी तुला माझं असं सतत तुझ्या सहवासासाठी घुटमळणं, एका शब्दासाठी, कटा़क्शासाठी तासन तास आसुसणं, परवाच चिडवत होत्या मैत्रिणी, आमच्या खळाळत्या धबधब्याला द्रुष्ट कुणाची लागली? काय त्यांना सांगू तुझं नाव?, छे ! छे !! काहीतरीच काय? स्वतःशीच बोलायच तर होतय बावरायला, खर सांगू ka ? आजकाल हसावसंसुध्दा नाही वाटत.कुणाशी बोलावसंच नाही वाटत, सतत असावं आपल तुझ्या चिंतनात , सुटतात मग आपोआप खोल नि:श्वास, वाटत कधी याबरोबरच जाईल श्वास, खुळी वाटतेय ना कल्पना? आहेच मी अशी वेडी खुळी , तुझ्या विशाल व्यक्तिमत्वापुढे अगदीच बावळी.

मनगटावर मोगर्‍याचे हार आले

लेखक चिमिचांगा यांनी सोमवार, 02/02/2015 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला.

हाँटींग : मी रात टाकली....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 01/02/2015 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.... नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्य्क्रमाच्या ब्रेकनंतर येणार्‍या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो कारण सारेगमच्या सेलिब्रिटी पर्वाचे जुने भाग दाखवत होते. आणि गुप्त्यांच्या 'वंदनाताई' अमृता सुभाषला सांगत होत्या.... "तू गाणं छानच गायलंस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर 'हाँटींग' आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात 'या डोळ्याची दोन पाखरे..." ही होतं.

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २.

डेथ ऐप्लिकेशन

लेखक म्हया बिलंदर यांनी रविवार, 01/02/2015 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर - ह्यालो मी - हं सर बोलाना ? सर - आरं आईक की. . मी - हं सर - त्यो आपला ह्यो हाय का.. गणू ? मी - म्हणजे डॉ. गणेश ना? त्याचं काय? सर - हा त्योच, त्याचा बा म्येलाय तर त्यो गेलाय सुट्टीवर मी - अरेरे. . वाईट झालं. सर - तर त्याला लिहायचय डेथ ऐप्लिकेशन. मी - सर, लीव ऐप्लिकेशन सर - त्येच, मी सुरुवात करून दिलीये फुडच्या दोन ओळी जरा सांगचिल का ? मी - हो सर, काय लिहिलंत? सर - Dear Sir, आता सांग. मी - Dear Sir, I am sorry to inform… सर - Sorry? Sorry कशाला?

मटार - पनीर पुलाव

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 01/02/2015 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
pulao 1 साहित्यः १. मोकळा शीजवलेला भात २. उभे चीरलेले कांदे - २ ३. उभी चीरलेली सीमला मीरची - १ ४. वाफवलेले किंवा फ्रोझन मटार - १/२ वाटि ५. बारीक चीरलेले टोमॅटो - ३ ते ४ ६. पनीर क्युब्स - १ पाकिट ७. पेस्ट - २ चमचे (२ पाकळ्या लसूण, पेरभर आलं, २ हिरव्या मिरच्या, कोथींबीर) ८. बटर क्युब्स - ३ ९. तेल - २ चमचे (म्हणजे बटर जळणार नाहि) १०. गरम मसाला - १/२ चमचा ११. धणे पावडर - १.५ चमचा १२. लाल तिखट - १ चमचा १३.