दोघी … ( भाग २ )
दोघी … !
भाग २
हळू हळू दोघींची नितळ मैत्री घट्ट होत गेली ऱोजच्या रोज त्यांच्या गप्पा होऊ लागल्या , भेटल्या तर ठीकच नाहीतर फोनवर . आता किरण, काकूंना चक्क
' ए सुलभा' अशी हाक मारत असे . मैत्रीण झाली होती ना !
एके दिवशी अशाच एका संध्याकाळी सुलभा, किरण ची वाट बघत होती नेहमीच्याच टपरी वर . किरण आली तशी जरा नाराज वाटत होती .
" चाल पटकन निघू आपण आज घरी लवकर जायचे आहे " किरण म्हणाली नाराजीने .
" अग हो हो , माहितीये मुलगा येणारे पाहायला तुला . पण इतकी घाई ! आम्हाला नव्हता बुवा माहित एक माणूस इतकं उत्सुक आहे ते कुणालातरी भेटायला !! " सुलभा मिश्किल पणे हसत म्हणाली .
मिसळपाव
