भीतीच्या भिंती:२. जिवंत असण्याचा पुरावा
(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)
भाग १: एक तास जास्तीचा
‘काबूलला जायचं’ असं ठरल्यावर सगळ्यात आधी खरेदी केली ती दोन पुस्तकांची. एक श्रीमती प्रतिभा रानडे यांचं ‘अफगाण डायरी’ (पूर्वी वाचलं होतं आणि आवडल्यामुळे लक्षात होतं) आणि दुसरं श्री. निळू दामले यांचं ‘अवघड अफगाणिस्तान’.
मिसळपाव