लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.
श्रीरंगने खफवर मटावरील एक कमेंट उचलून टाकली त्यातील हे एक वाक्य. श्रीरंगने त्या वाक्याच्या गमतीदार देवनागरीमुळे ते खफवर टाकले असावे. मात्र माझ्या डोक्यात त्या वाक्याने असंख्य दातेरी चाके असलेले यंत्र फीरु लागले.
लाइफ इस तो लिव हॅप्पिली अँड हॅपीनेस कम्ज़ फ्रॉम शेरिंग हॅपीनेस.हे अनेक ठिकाणी अनेकांनी लिहिलेलं वाचायला मिळतं. यातले बरेच जण समाजसुधारक असतात, विचारवंत असतात, समाजाला वंदनीय असे व्यक्तीमत्व असतात. मात्र आयुष्य हे मजेत जगण्यासाठी आहे हे यांना कुणी सांगितलं हा प्रश्न पडतो. की यांना तसं वाटतं म्हणून आपणही तसं मानायचं?
मिसळपाव