Skip to main content

बस्स इतकेच..

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 10/12/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले बस्स इतकेच.. ---- परवा अलमारी उचकतांना तुझे एक पैंजण हाताला लागले छन्न झालं एकदम आपल्या जोडीदाराअभावी एकाकी,केविलवाणे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला 'त्या' तस्बिरीतले तुझे डोळे आणि त्या डोळ्यातले ते काजळ.. बघता बघता कां कोण जाणे टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने काही ठोके चुकतात

निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

लेखक खेडूत यांनी बुधवार, 10/12/2014 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत.

चारोळ्या

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 10/12/2014 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता. बाटली रिकामी ग्लास घरंगळलेला, टेबलावरचा थेंब केव्हाचाच सुकलेला. ढग विखुरलेले पाऊस थांबलेला, कुंदाळ हवेत मी गारठलेला. काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.

ये रे माझ्या मागल्या........

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 10/12/2014 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं ऐक - बोलिंग घे..... ओव्हरकास्ट आहे". २७५ शनिवार पेठ पुणे ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या मध्ये असललेल्या साधारण ५० X १५० फुटी फर्शीच्या मैदानवर पिवळ्या स्मायलीच्या बॉलनी खेळताना ते ढोपरायेवढं कार्टं आपल्या गुडघ्यायेवढ्या कॅप्टनला सूचना करत होतं. आता त्या शेंबड्या पोराच्या ह्या आगावपणामध्ये त्याच्या (मुद्दामच उल्लेख केलेल्या) राहत्या ठिकाणाने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराइतकाच वाटा होता आजकाल सगळीकडूनच मिळणार्‍या क्रिकेटच्या ज्ञानाचा! लहान असताना रबरी चेंडू प्यांटवर आम्हीदेखील घासला होताच... पण ह्यांचे म्हणजे नेणत्याचे घासणे | "वन लेग स्टंप" गार्ड काय घेतील.....

नात्यांचे महत्त्व आणि सिद्धता

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/12/2014 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
एकाला कमी लेखले तरच दुसरा चांगला सिद्ध होतो हे नात्यांचे गणित चूक आहे. नावडत्या व्यक्तीला कमी लेखले तरच आवडता व्यक्ती श्रेष्ठ होतो असे नाही. पत्नीला कमी लेखले तरच आई विषयीचे प्रेम सिद्ध होते असे नाही. वडिलांना कमी लेखले तरच आईचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. एका अपत्याला कमी लेखले तरच दुसऱ्या अपत्याचा चांगुलपणा सिद्ध होतो असे नाही. सुनेला कमी लेखले तरच लेकीचे महत्त्व राहते असे नाही. पुरुषांना कमी लेखले तरच स्त्रीचे महत्त्व सिद्ध होते असे नाही. भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही. भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही. आपल्याला जे साध्य होत नाही त

नाव

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 10/12/2014 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
कलमनामा – ०८/१२/२०१४ – लेख १० – नाव http://kalamnaama.com/nav/ नाव नावात काय आहे? हे वाक्य शेकस्पिअरचं किंवा हा प्रश्न शेकस्पिअरचा. त्याचा या वाक्यामागील अर्थ असा होता की जर गुलाबाला काही वेगळ्या नावाने संबोधलं तर त्यातून येणारा सुगंध बदलेल का? किंवा त्याचं सौंदर्य कमी होईल का? उत्तर आहे ‘नाही’. मग नावात काय आहे? नाव का असतं? इतिहासातील किंवा वर्तमानातील कित्येक नावं मोठी किंवा महान आहेत म्हणजे नेमकं काय? नाव बदलल्याने नक्की माणूस बदलतो का? एखाद्या नावाशी असलेला संबंध किंवा नातं आणि त्याचं महत्त्व म्हणजे काय?

अत्तरायण..! भाग - २

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 10/12/2014 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
अत्तरायण..! भाग - १ इसीलिये हीना अपना पेहेला प्यार है। वो जिंदगी के आखरी दम तक चलता रहेगा। पुढे चालू..... ==================== २) अत्तरफूल :- काय वाटतं नाव ऐकल्यावर? गोंधळात पडायला होतं ना? पण हे अत्तर ज्याचं आहे..त्या फुलानीच आजवर कित्येकांना गोंधळात टाकलय. कित्येकांचे गोंधळ सोडवलेत,वाढवलेतंही! मी ही पहिल्यांदा गोंधळलोच होतो. (आणि तो गोंधळाचा प्रसंग मला पुन्हा आठवून दिला तो एका गोंधळ्यानीच!) म्हणजे ही केवळ शब्दक्रीडा नव्हे.

माझे पहिलेच प्रवास वर्णन - फिलीपाइन्स

लेखक Madhavi_Bhave यांनी मंगळवार, 09/12/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
(मी फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे, http://www.misalpav.com/node/13573 श्री प्रभाकर पेठकर ह्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार flickr वर upload करून टाकले आहेत. आशा आहे नाहीतर मला कोणीतरी मार्गदर्शन करावे.) हे माझे पहिलेच प्रवास वर्णन आहे. झंप्या ह्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनावरून मला पण स्फूर्ती मिळाली आहे. एस्पिकचा एक्का व इतरांप्रमाणे माझी ओघवती भाषा वगैरे नाही आहे तरी सांभाळून घेणे. मी जानेवारी २०१३ मध्ये फिलीपाइन्सला २-३ दिवसांसाठी office च्या कामासाठी गेले होते. Airport अगदीच सामान्य होता पण देश मात्र प्रथम दर्शनीच प्रेमात पडावे असा.

जडण-घडण 15

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 09/12/2014 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मार्केटमध्ये कंपनीचं चांगलंच नाव झालं होतं. मला आठवतंय, त्या वर्षी दिवाळीसाठी वेगवेगळ्या आकारातल्या १०० पेक्षा जास्त शुभेच्छापत्रांसाठी मी संदेश लेखन केलं. यात आकार वैविध्याबरोबर पॉप अप, विनोदी, कॉर्पोरेट अशा प्रकारांचाही समावेश होता. एकंदर घोडदौड वेगात सुरू होती. मागच्या भागात सांगितलेल्या द्व्यर्थी किंवा काहिसे अश्लील शुभेच्छा संदेश लिहिण्याचं सुचवणाऱ्या त्या प्रसंगानंतर माझी एकंदर प्रतिक्रिया लक्षात घेत तो विषय तिथेच संपला होता. मला त्या वेळी घड्याळं जमवायची आवड होती. पण ही घड्याळं मनगटावर कमी आणि माझ्या डेस्कवर जास्त वेळ दिसायची.