Skip to main content

देव भूमी......भाग-०१

लेखक मॅक यांनी शुक्रवार, 05/12/2014 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
तस पाहिले तर केरळ बाबत ख़ुप लोकानी आज पर्यत लिहल आसेल पण ..... तरीही मी एक प्रयत्न करतोय...पहा अआवडला तर जरूर सागा...... पदवीच्या शेवच्या वर्षाला असताना खोली घेऊन रहात होतो. वर्ष होत 2006..... तीन रूम पार्टनर आणि एक मी. कुणीतरी बातमी आणली कराडला पुस्तक प्रदर्शन भरलय... झालं.... ;लगेच रविवारी कराड... माझी तशी काही इच्छा नव्हती जायची पण रूमवर बसून तरी काय करणार म्हणून मी पण गेलो..... प्रदर्शन खुपच छान आणि मोठं होत.... बाकी तिघांनी बरीच पुस्तक खरेदी केली मी काही घेतलं नव्हतं.... पण अगदी शेवच्या दालनात आल्यावर एक पुस्तक नजरेस पडलं....

भाषा तुझी-ती-माझी

लेखक शिरीष फडके यांनी शुक्रवार, 05/12/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा तुझी-ती-माझी एका गावातील एक शिक्षक. एके दिवशी शाळा आटपून घरी येतो तर दरवाज्यात / पुढयात एक पत्र. आपल्याला कोण आणि का पत्र लिहिल? आपल्या तर मागे-पुढे कुणी नाही मग चुकुन आपल्या घरात पत्र पोस्टमन काकांनी टाकलं की काय? पण असं कसं होईल? काकांना तर अख्या गावातला कोपरा न कोपरा माहीत आहे मग ते चुकीच्या पत्त्यावर कसे बरे देतील? अशी प्रश्नांची मालिका डोक्यात चालू असताना बाहेर वीज कडाडली आणि तो प्रश्नांच्या जंजाळातून बाहेर आला. जणू काही त्याच्या डोक्यातील वाढत्या प्रश्नांची मालिका खंडित करण्यासाठीच ती वीज कडाडली होती.

फोडणीचे खमंग डोसे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 05/12/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिठ १ वाटी तांदळाचे पिठ अर्धी वाटी रवा पाऊणवाटी दही फोडणीसाठी : १ चमचा राई/मोहरी १ चमचा जीरं २ मिरच्यांचे तुकडे थोड कढीपत्ता फोडणीच्या गरजेनुसार तेल

दाभोळ जेटीवर कोकण क्रुज फेस्टीवलचे आयोजन

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 05/12/2014 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ फेरीबोट जेटीवर २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘कोकण क्रुज फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील क्रुज संस्कृती कोकणच्या भूमिवर अनुभवण्याची संधी दाभोळ क्रुजवर मिळणार आहे. या महोत्सवात ५० मिनिटांचा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार असून, यामध्ये गोवन फोक डान्स, पोर्तुगीज डान्स, कोळीडान्स, मराठमोळी लावणी तसेच बच्चे कंपनीकरीता खास डान्सचे आयोजन करण्यात आले आहे. ferry

आपटा - गुळसुंदा - कर्नाळा (+फोटो)

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 04/12/2014 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिप्सचा कर्नाळा भटकंती लेख वाचून तिकडे पुन्हा जावेसे वाटू लागले. विचार केला कोकण रेल्वेने जाताना रसायनी,आपटा स्टेशनच्या पश्र्चिमेस कर्नाळ्याचा सुळका दिसतो तर तिकडून जावे. १)ठाकरवाडीतला जैतू आणि कर्नाळा २) ३)पाताळगंगा नदी ४)नदीकाठचे सिध्देश्वर,गुळसुंदा ५)लाल सावरीचे फुल ६)पांढरी सावर कमी आढळते ७)रानफुले सकाळच्या दिवा सावंतवाडी रेल्वेला फार गर्दी असते म्हणून ९.१०च्या दिवा रोहाने जायचे ठरवले. डोँबिवलीहून लोकलने दिवा स्टेशनला उतरण्यापेक्षा विशाळगडाची खिंड लढवणे सोपे असावे. पुढचा प्रवास छान झाला. बरेच प्रवासी नावड्याला उतरून गेले.

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 04/12/2014 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता. पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे. श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व. आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा? किती वाजता करायचा? खायला-प्यायला काय आणायचे? इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच. तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो. (तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

टेक्श्चर

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 04/12/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
कापडाच्या दुकानात एक कापड आवडलं पण घेतलं नाही दुकानदाराला सांगितलं धागा छान आहे रंग उत्तम आहे नक्षीही सुरेख आहे फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही नंतर विचार केला, तेंव्हा काही माणसं डोळ्यासमोर तरळली; त्यांचही असंच आहे....
काव्यरस

युरेका

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 04/12/2014 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूटन पास्कल Bohr सारे शाळेमध्ये भेटले होते काही कळले काही घोकले तर काही बिनधास्त ठोकले होते .

शांततेनंतरचं वादळ - Thunder down under

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 04/12/2014 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"We must dig in and get through to tea. And we must play on." भावुक झालेला ऑझी कर्णधार मायकेल क्लार्क आपल्या धाकट्या भावासारख्या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा फक्त मॅक्सविलच्या शाळेत उपस्थित ऑझी पंतप्रधान, आजी-माजी क्रिकेटपटू, ह्यूज कुटुंबीय आणि चाहत्यांचेच नाही तर क्रिकेट आवडणार्‍या / नावडणार्‍या जगभरातल्या कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावले असतील. २५ नोव्हेंबरपासून सगळं क्रिकेटविश्व हादरलंच होतं. कारणही तसच आक्रीत. आत्तापर्यंत असे शेकडो बाऊन्सर्स टोलवलेला आणि झेललेला फिल ह्यूज सिडनीच्या मैदानावरच एका विचित्र अपघाताने कोसळला.