आदिशक्ती महादेवी
नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं.
सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून.
लज्जागौरी
लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले.
मिसळपाव
“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.
“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!