Skip to main content

AN ODE TO मिसळपाव ! द्वितीय पुष्प

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 01/10/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा बोधिवृक्षकारांनो…वृक्षाची जोपासना करणार्यांनो …. सर्व स्वयंभू देवस्थानांनो ….खालसा आणि स्वायत्त संस्थानांनो …. अखंड धुनी पेट्व्यानो…त्यात अविरत तेल ओतणाऱ्यानो …. सतत खल करणार्यांनो …. अविश्रांत गूळ काढणार्यांनो… तळ्यात- मळ्यात खेळणाऱ्यानो… विरोधासाठी विरोध करणाऱ्यानो… खरडफळा भरणाऱ्यानो…कळफलक बडवणार्यांनो…दुर्गभ्रमंती करणार्यांनो… खाद्यचौकशी करणार्यांनो … अनुभवसमृद्ध काकांनो आणि सर्वगुणसंपन्न ताईन्नो…. फक्त किल्ली फिरवणार्यांनो…. सतत खिल्ली उडवणार्यांनो….
काव्यरस

अभिनव विचार संग्रह - (१)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 01/10/2014 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य!

भय इथले संपत नाही (दोन)

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 01/10/2014 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28987 -------------------------- भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे. भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय.

मेणाचा मृत्युंजय भावला

लेखक मारवा यांनी बुधवार, 01/10/2014 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
अरूण कोलटकर हे माझ्या मते मराठीतील महाकवीं पैकी एक आहेत. यांनी ज्या कविता मराठीत लिहीलेल्या आहेत तशा त्यांच्या अगोदर कोणी लिहील्या असतील असे वाटत नाही. त्यांच्या काही कवितांवर अतिशय सुंदर रसग्रहण पुर्वी मिपा वर आलेली आहेत. अनेक अर्थांनी अनोखा असा हा माणुस होता. यांचे कवितेतील अनुभव शैली इमानदारी सारेच काही विलक्षण होते. त्यांची एक विलक्षण कविता जी अतिशय अस्वस्थ करुन जाते तिच्यावीषयी त्याचा अर्थ जसा मला लागतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यापुर्वी एक सांगावेसे वाटते की खालील कविते चे आकलन जर काही संदर्भ माहीत असतील तर सुगम होते. अन्यथा कविता क्लीष्ट वाटु शकते.

वर्धमान ते महावीर - भाग ३

लेखक दशानन यांनी मंगळवार, 30/09/2014 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती.

भय इथले संपत नाही (एक)

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 30/09/2014 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28992 ------------------ कवितेतून नक्की काय म्हणायचंय ते ग्रेस स्वत: कधीही सांगणार नाही. तो फक्त जीवाला सैरभैर करणारी त्याची कविता तुमच्यासमोर ठेवेल आणि प्रत्येक वेळी ती, एखाद्या कॅलिडोस्कोपसारखी असेल. हरेक रसिकाला ती कवितेत, स्वत:चा अर्थ शोधायला भाग पाडेल. आणि ग्रेसच्या कवितेचं वेगळेपण हेच, की समजत नाही म्हणून तुम्ही तिला अंतर देऊ शकणार नाही. एखाद्या विलोभनीय आणि दुष्प्राप्य कामिनीसारखी ती तुम्हाला सतत घेरुन राहील.

गुड बाय ऑर्कुट

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 30/09/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑर्कुटचा शेवटचा दिवस! माझे आणि बर्‍याच भारतीय लोकांचे पहिले जालीय सोशल नेट्वर्किंग. भारतात ऑर्कुटमुळे सोशल नेट्वर्किंग रुजला आणि फोफावला .

वाहनविश्व : भाग २ इतिहास

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी मंगळवार, 30/09/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग : वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना ___________________________________________________________ माणसाच्या उत्त्पत्तीपासुनचं प्रवास हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दोन पायावर चालणार्या, शिकारीमागे धावणार्या, कच्चं मासं, कंदमुळं खाणार्या माणसाला चाकाचा आणि आगीचा शोध लागला आणि आख्खं जगं झपाट्यानी बदलु लागलं. चाकं, चाकांचे हळुहळु विकसित झालेले उपप्रकार (गिअर्स, पुली, कॅम & फॉलोवर्स ई.ई.) आणि त्यापासुन विकसित झालेल्या वेगवेळ्या गतींचा वापर करुन माणसाच्या जगण्यामधे अमुलाग्र बदल होउ लागले.

Lemon Zest cookies (लिंबाच्या सालीची बिस्किटे)

लेखक काव्यान्जलि यांनी मंगळवार, 30/09/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : अमूल बटर (१०० ग्रॅम),साखर (१०० ग्रॅम), मैदा (२०० ग्रॅम), ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर, १ अंड. कृती : बटर आणि साखर एकत्र फेटून घ्या. त्यात अंड मिक्स करून फेटून घ्या. नंतर हळू-हळू मैदा घालून फेटून घ्या. या मिश्रणात ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर घालून एकत्र करून घ्या. हे मिश्रण ४०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. त्यानंतर एका बेकिंग ट्रे ला तूप लाऊन त्यात हे मिश्रण पसरून घ्या . प्री हिट ओव्हन मध्ये १८० डिग्री ला १५ मिनिटे भाजून घ्या.