काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )
आता पुन्हा निवडणुका येणार
तेच उमेदवार हात जोडत येणार
मग आपण खोटं खोटं हसणार
मग मधेच डोक्यात प्रश्न येणार
हे आज इथे कशाला येणार ?
काय रे देवा.…
मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार
मग आम्ही तो गिळणार
मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार
मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार
तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार
त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार
मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार
आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार
मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार
मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार
मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली
काव्यरस
मिसळपाव