जाडे मीठ.
लहानपणापासून घरात जाडं मीठ पहात आल्यामुळे, लग्नानंतरहि स्वयंपाकात तेच मी वापरू लागले. माझ्या लहानपणी वाण्याकडे जाड्या व बारीक मीठाची अशी दोन पोती असायची. नंतर 'आयोडीनयुक्त' ,सर सर असं पडणारं बारीक मीठ पिशव्यांतून मिळू लागलं आणि पोत्यांत ठेवलेलं बारीक मीठ दिसेनासं झालं.अजुन जाडं मीठ मात्र , पिशव्यांतूनच, मिळतं.मी अजुनहि स्वयंपाकात, शक्य असेल तेथे जाडं मीठच वापरते. मला वाटतं ह्या जाड्या मीठाचा वापर हल्ली कमी झालाय. बर्याच जणांना जाडं मीठ म्हणजे काय हेच माहित नाही.
मिसळपाव