Skip to main content

संग्रह

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 20/05/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोण कसला संग्रह करेल सांगता येत नाही पण निवडणूक प्रचार साहित्याचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला होता... आपण तो पहावा आणि आपल्याही याबाबतच्या आठवणी असतील तर इथे लिहाव्यात १५ फेब १९९० . अण्णा जोशींची विधानसभा निवडणूक . कसबा विधानसभा... . अण्णांची यशस्वी लोकस

पहिला पाऊस...

लेखक nasatiuthathev यांनी मंगळवार, 20/05/2014 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस !!!!
पहिला पाऊस खूप जणांना वेड लावतो म्हणे ????? वेड ???? पण कुठले वेड ???? आनंदाचे , उत्साहाचे ,प्रेमाचे चैतन्याचे कि काही आठवणींनी आपल्याला वेड करतो ???कि विरहाने ??? पण मला तर नेहमी एक नवचैतन्य ,नव आशा दाखवत असतो . पहिला पाऊस म्हणजे प्रेम कवींचा हक्काचा विषय !!!! आणि त्या विषयावर प्रत्येक नव्या -जुन्या , उमलणाऱ्या ,विझाणाऱ्या कवीची एक तरी कविता !!!!!!!! पहिला पाऊस आणि विरह यांचे एक अतूट नात आहे.

जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 20/05/2014 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
चाल: बाझीगर ओ बाझीगर चित्रपट : बाझीगर (सदर चित्रपटात शारूक पूर्वार्धात खून करतो… वैगरे वैगरे , तरी पब्लिक त्याला हिरो मानते … या चित्रपटा नंतरच हिरो व विलेन दोघा मधली रेषा पुसट व्हायला लागली . . चू भू दे घे असो तरी या चित्रपटाचा इथे काही संबंध नाही) वो किसन, झालता थकेला, तू खेल अस्सा केला, कोमात गेले पार्टीतले सगले उपवर. जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर ।।ध्रु ।। ओ ग्रोथ बोलके, मत लिया है, वादा अच्छेदिनोका, किया है, दिल्लीकी बाझी जिता, राजधर्मको भूलाकर ।।ध्रु ।। चुपकेसे आंटीलाके हस्ते, तू मेरे टीवीमें समाया, मेहेन्गाईकि चाय पिलाके, सबको दिवाना बनाया .

पार्वतीची व्यथा

लेखक कहर यांनी मंगळवार, 20/05/2014 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
देऊळ कफल्लक , वितळू लागे खांब गाभारी ध्यानस्थ तरीही सांब दुरून पार्वती जपे कसे सौभाग्य रोज उशीवर विरघळलेले थेंब ही आर्त हाक कि वनी लागली आग चिंतेत पार्वती कुठवर जपू विराग उंब-यात पाउल चाहूल सदाशिवाची अर्ध्यावर तुटले स्वप्न... आली का जाग ?

गमभन.ऑर्ग - ऐकू आनंदे

लेखक ॐकार यांनी सोमवार, 19/05/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! लोकांना पैसे खर्च न करता युनिकोड मध्ये टाईप करता यायलाच हवे ह्या निकषावर मी गमभन चकटफु केले त्याला आता जवळपास नऊ वर्षं होत आली. आज हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आलेली असताना - गमभन चे तंत्र कालबाह्य होईल हे नक्की आहे. Physical किबोर्ड नसल्याने त्याला येणार्‍या मर्यादाच नाहीत त्यामुळे हे बदल स्वाभाविक आहेत. पण ह्या सर्वाचा विचार करता एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे मोबाईल किंवा तत्सम डिव्हाइसेसच्या लहान स्क्रीन आणि सारखे scroll करावे लागताना होणारा त्रास.

पौष्टिक मेथी धिरडे

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 19/05/2014 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य मेथी धिरडे पीठः ६ वाट्या तांदूळ २ वाट्या तूरडाळ २ वाट्या चणाडाळ २ वाट्या उडीदडाळ २ वाट्या ज्वारी १ वाटी गहू १ वाटी धणे १/२ वाटी मेथीदाणे वरील सर्व जिन्नस न भाजता एकत्र दळून आणा. (प्रमाण आईचे आहे, त्याप्रमाणे मी पिठ दळून आणते व हवे तेव्हा ही धिरडी बनवते) साहित्यः २ वाट्या तयार धिरडे पीठ १०-१५ लसूण ठेचून (भरपुर लसूण घालावा, मेथी+लसूण भन्नाट चव लागते) १/२ टीस्पून हळद १-१/२ टीस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार २ चमचे तेल

राज्यसभेच जटील गणित

लेखक माहितगार यांनी सोमवार, 19/05/2014 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ निवडणूक मोदी-भाजपा-एनडीए घटकांना लोकसभेत मोठ अभूतपुर्व बहुमत (भाजपा २८२ जागा एनडीए ३३६ जागा) आणून पार पडली आणि त्यांची समर्थक मंडळी अर्थातच आनंदात आहेत तर विरोधकांना धक्क्यातून सावरण्यासाठीही काही कालावधी लागेल. लोकसभेत पुर्ण बहुमत आल्यामुळे इतर प्रादेशिक पक्षांसोबत अगदीच घोडेबाजार भरवावा लागणार नाही आणि आर्थीक विकासाच्या आश्वासनांना स्वतःच्या बळावर मोदी सरकार गोष्टी पुढे रेटू शकणार आहे. अर्थात, संसदीय गणितांच्या सर्व खाचा खोचा माहीत नसलेल्या भाजपा-मोदीच्या सर्वसामान्य जनतेतील समर्थकांना हा आनंद जरासा चिमुटभर मीठा सोबत घ्यायला लागणार आहे. लोकसभेत एन.डी.ए.

मोदींच्या विजयाचे परीक्षण

लेखक आनन्दा यांनी सोमवार, 19/05/2014 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४च्या निवडणूकीत नमोंचा न भूतो असा विजय झाला आणि सगळी समीकरणेच बदलली. मोदींचा विजयाने आनंद होत असला, तरी त्या आनंदापेक्षा अश्या एकहाती विजयाबद्दल वाटणारे आश्चर्य हेच जास्त आहे. आणि त्याला पुष्टी देणारे घटक आहेत ते असे - १. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे. २. काँग्रेस ने नमोंविरुद्ध प्रचाराची प्रचंड राळ उठवून्ब दिल्ली होती. त्यलाही मतदारांनी भीक घातली नाही. ३.

कलगीतुरा- भाग ५

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 19/05/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या भागांची लिंक खाली देत आहे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ कलगीतुरा- भाग ३ कलगीतुरा- भाग ४ "त्यादिवशी तू तुझ्या दोस्ताला माझ्याकडे घेऊन आला. त्याचे कमिशन ठरल्यानंतर त्यानी तुला लगेच कटवला. मला म्हटला दिग्याला मी लगेच कटवला कारण तीन तिघाडा काम बिघाडा नको.

हवाईदलातील रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से भाग ३

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 18/05/2014 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो हवाईदलातील रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से भाग 2 वाचलात. आता पुढील भाग ३ वाचा. इतके वर्षांनी हा धागावर यायला सध्या मी हवाईदलातील दिवसांवर वेबसाईसाठी लिहायला सुरू केले आहे हे ही कारण आहे म्हणून... साहसी छायाचा जीवघेणा प्रवास मी नुकताच कानपूरहून पोस्टींगवर चंदीगढला आलो होतो. आधी चंदीगडला पोस्टींग झाले असल्याने शहर, वायुस्टेशन मला नवीन नव्हते. माझा मध्यंतरी विवाह होऊन एक वर्ष पुर्ण झाले होते. घर मिळे पर्यंत मी मेस मधे राहात होतो व क्वार्टर मिळायला अवकाश होणार होता. म्हणून ती तिच्या घरी मुंबईला गेली.