निवडणूक २०१४: अनुभव ६: दण्डकारण्य (२)
दण्डकारण्य (१)
काही कारणांमुळे १६ मे पूर्वी "दण्डकारण्य"चे पुढचे भाग लिहायला जमलं नाही. आता त्या अनुभवांबद्दल सविस्तर लिहिणं संदर्भहीन ठरेल. म्हणून हा धावता आढावा.
१० एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघात ५२% मतदान झालं - जे अंदाजापेक्षा जास्त होतं. बस्तर जिल्ह्यात ६७% मतदान झालं तर सुकमा आणि बिजापूरमध्ये प्रत्येकी २५% इतकं ते कमी झालं.
हितगुज नातवाचे
आबा उठा
आबाचा नातू आबाला म्हणाला
आबा उठा . SMS बघा
आज तुमची MARRIAGE ANNEVERSARY
आजीने नवीन कपडे घाला म्हणून सांगितले आहे
आईने त्याला SUPPORT केले आहे
माझ्या आवडीचा केक मी कालच BOOK केला होता तो आता येईल
बाबा OFFICE ला जायच्या आधी तो कापा
आपण लंचला बाहेर जायचे आहे
आई बाबा DISCUSSING . कुठल्या हॉटेलात जायचे ?
आजीला आणि तुम्हाला EVENING फ्री ठेवली आहे --देवळात जाण्यासाठी
NDE बद्दलच्या किरकोळ शंका
एम्ब्रेस्ड बाय लाईट, सेव्ह्ड बाय द लाईट, thi rTee मिनीटस इन हेवन अशा प्रकारच्या पुस्तकांचा फडशा पाडून , तसेच तासन तास 'निअर डेथ एक्सपीरीअन्स"(NDE ) सारख्या साईट्वर घालवून अन त्या प्रकारचे व्हिडीओ पाहून माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्या शंकाकंड्शमनार्थ हा धागाप्रपंच. सगळ्या NDE मध्ये बर्याच सामाईक बाबी आढळल्या. किंबहुना एक स्ट्रक्चरच , एक क्रमच आढळला जो पुढे येईलच व तदनुशंगिक काही शंकादेखील खाली येतील.
सर्वात प्रथम म्हणजे NDEer मृत्युच्या विविक्षित क्षणोपरांत अचानक सीलींगपाशी हवेत तरंगू लागतो. तरंगत असताना खाली स्वत:चा अचेतन मृतदेह ती व्यक्ती पहाते.
अॅकलेशिया कार्डिया-रोग आणि उपचार -२
अॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.
ब्याचलर्स पाकृ: स्टफ्ड थालीपीट विथ टॅन्गी टमॅटो अॅन्ड चीज़...
नाव कसं हुच्च वाटतंय ना पाकृचं? फार काही नाही टॉमेटोची चटणी भरुन केलेलं थालीपीट आहे.
झालं असं की मेस दोन आठवडे बंद असल्याची बातमी आली मग दुपारच्या जेवणाचं काय करायचं याचा विचार करायला लागलो. रात्री टिफीन येतो त्याच्याकडून पहिला आठवडा टिफीन मागवला पण टिफीन एकदाही वेळेवर पोचला नाही दुपारी!! मग त्यानंतरच्या आठवड्यात शेवटी स्वत:च सैंपाकघरात पाऊल टाकायचं ठरवलं आणि काहीतरी वेगळं करायच्या नादात ह्या रेशिपीचा शोध लागला.
नमो लाटेचे साईड ईफेक्ट
नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
भारतीय वकीलातीतला अनुभव
विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो .
मला पासपोर्ट वरील नाव बदलून घायचे होते. नवीन नावाने नवीन पासपोर्ट हवा होता . वकिलाती मध्ये सकाळी १० वाजता फोन केला. वेबसाईट वर १० वाजता ची वेळ दिलेली होती त्यानुसार . आधी कोणी फोन उचलला नहि. फोन घेणाऱ्या व्यक्तीने काय हवे विचारले. पासपोर्ट वरील नाव बदलण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती हवी म्हणून सांगितले . अत्यंत तुसडेपणाने उत्तर दिले कि वेबसाईट वर बघा . तिला सांगितले कि तिथे अर्धवट माहिती आहे .
कल्पना / प्रस्ताव : मिपाकरांनी ट्रेक ला जाण्याबाबत
नमस्कार!
भाईयों और बहनो.....
(सॉरी सॉरी. ते मोदींचं भाषण ऐकलं ना नुकतंच टीव्हीवर... )
हां तर आता मोदी सरकार वगैरे सगळं आलंय. अशी बातमीही आली आहे की ५ जून ला मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. तेंव्हा त्याच्या स्वागताला एखाद्या डोंगरावर नाही गेलं तर मजा काय नाही का! असा विचार मनात आला. गेल्या चार पाच ट्रेक चे वृत्तांत फोटो जेंव्हा मिपावर टाकले तेंव्हा `आम्हाला न नेल्याबद्दल निषेध' वगैरे अनेक शेरे वाचायला लागले. :) तेंव्हा, म्हटलं की या खेपेस त्याची भरपाई करावी.
एक सहज प्लॅन डोक्यात आलाय.
उदयनराजे विक्रमी मतांनी विजयी
क्लिंटन सर यांच्या पडघम मालिकेचे पुर्नवाचन करत असताना माझ्या एका प्रतिसादावर http://misalpav.com/node/27769 काही सदस्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या वाचुन खरच कीव आली. या प्रतिसादावरुन आणि अशाच तत्सम अनुभवांवरुन एकदंरीत विचारांची पातळी, द्वेष, एकांगी विचार, दुसर्याना कमी लेखण्याची आम्हीच श्रेष्ठ वृत्ती पाहुन दु:ख वाटते. विशेषत छत्रपती शिवराय याचां अनादर आणि वरील प्रतिसादात असलेले अंधत्व,दत्तक,बिरूदावली सारखे टोमणे.
असो, ज्या गोष्टी आपण वैयक्तिक बदलवु शकत नाही त्यावर काय करणार.
मिसळपाव