Skip to main content

बाजारभाव (४-११-२००९)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 10/04/2013 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमध्ये बायका मारत होत्या गप्पा महगाईचा विषय होता साधा आणि सोपा काल बाई जेंव्हा मी मार्केटला गेले भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी एक रुपयाचे लिंबू पाच रुपयाला झाले कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले बारा रु.पाव किलो वांगी व कारले फ्लॉवर कोबी बघुन डोकेच फिरले वीस पंचवीस रुपये किलो होते तेथे गहू तंदुळ म्हणाला मला हातच नका लाऊ शंभर रु.किलो झाली तुरीची डाळ भडकलेले होते हरभरे आणि वाल साखरेचा भाव तर पस्तीसवर गेला तेलाचा डबा पण किती महाग झाला दुध झाले महाग चाळीस रुपये लिटर विचारायलाच नको चीज आणि बटर सगळीकडेच भडकली अशी ही महागाई

अहो चहा घेताय ना? (कथा)

लेखक मी_देव यांनी बुधवार, 10/04/2013 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.” दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली. कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने. विनायक बॅंकेत मॅनेजर होता. मात्र मागील वर्षी त्यानेही नोकरी सोडली होती.

लाल भोपळ्याच्या पुर्‍या (घारगे)

लेखक रेवती यांनी बुधवार, 10/04/2013 07:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: लाल भोपळा, कणीक, तांदूळ पिठी, गूळ, वेलदोडे, हळद, मोहनासाठी व पुर्‍या तळण्यासाठी तेल. कृती: पारंपारिक पद्धतीमध्ये लाल भोपळा किसून घेत. त्यात हळद व तेल घालून मिश्रण शिजवून घेत असत. मी मायक्रोवेव्हचा वापर केल्याने पद्धत थोडी वेगळी आहे. लाल भोपळ्याची मोठी फोड सालासकट मायक्रोवेव्ह सुरक्षित भांड्यात ठेवून त्यावर पाणी शिंपडावे. आता हा भोपळा पाच मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये झाकण ठेवून उकडावा. दोन मिनिटे तसाच ठेवून नंतर भोपळ्याची वरची बाजू खाली करून पुन्हा पाच मिनिटे उकडावा. कोमट झाल्यानंतर गर चमच्याने काढून घेता येईल. तो गर वाटीने मोजून घ्यावा.

गॅलेक्सी Y प्रो वर मराठी कसे लिहावे?

लेखक नानबा यांनी बुधवार, 10/04/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
अँड्रॉईडचा जमाना आल्यापासून त्याचे आकर्षण होतेच, परंतु त्या आधी हातात ब्लॅकबेरी असल्यामुळे क्वेर्टी किबोर्ड वाल्या फोनची सवय होती. त्यामुळे क्वेर्टी किबोर्ड असलेल्या फोनची बरीच शोधाशोध केल्यानंतर सॅमसंग गॅलेक्सी Y प्रो हा फोन सापडला. परंतु यात मराठी अथवा देवनागरी लिपीत लिहीता येत नाही. बाकी अँड्रॉईड फोन्स साठी प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले अनेक देवनागरी फोनेटिक किबोर्ड्स आहेत. पण माझ्या फोन मध्ये डिव्हाईस किबोर्ड असल्याने मला त्या किबोर्डस ना वापरता येत नाही. बरेच प्रयत्न करून झालेत, कस्टम लोकल वापरून सिस्ट्म भाषा हिंदी केली, पण त्यानेसुद्धा काहीही फरक पडला नाही.

तारे तोडण्याची स्पर्धा

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 09/04/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वा

कोकण

लेखक वैशाली१ यांनी मंगळवार, 09/04/2013 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याच्या सिझन मध्ये कोंकणात जावेसे वाटत आहे . तसे मागच्या वर्षी २ वेळा दापोली ला गेले होते. या वर्षी ही दापोली आहेच पण अजून कोणाला चांगली फिरायची जागा माहित असल्यास जाणकारांनी माहिती द्यावी ( कोकणातली ). ठिकाण मुंबई पासून ६-७ तासावर गाडीने जाण्या सारखे हवे आहे. घरगुती राहण्याची सोय अथवा रिसोर्ट माहिती असेल तर सांगावे .

राग दरबारी

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 09/04/2013 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो. पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं. जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक! पण आजकाल माझं मत बदललं आहे. अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो. 'राग दरबारी' ही श्रीलाल शुक्ल यांची कादंबरी वाचताना हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या.

रायआवळ्याचा चटका

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 09/04/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
या उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात कोकणात!! या प्रत्येक फळाला वेगळी चव असते.

प्राध्यापकांचा विजय असो !

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 09/04/2013 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी तर प्राध्यापक मंडळींविषयी आमचा दृष्टिकोन तुम्हाला माहित आहेच. आता हे आमचे नशीब की आम्हाला चांगले प्राध्यापक मिळाले नाहित. आमचे मित्रवर्य(आम्ही मानतो ते मानतात की नाही माहित नाही ;) ) श्रावण मोडक म्हणतात की कसे वागू नये हे तरी त्या प्राध्यापकांनी शिकवलेच ना ! मग त्यांचे उपकार आहेतच हे ! तर हे आम्हाला पटते त्यामुळे कुणी प्राध्यापक दिसला की आम्ही पटकन बाजुला होत त्यांना दंडवत घालतो आणि सटकतो.

एकटा

लेखक राजा सोव्नी यांनी सोमवार, 08/04/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
एकटा उन्ह असो वा पाऊस वारा ,पडती जरी मज अंगावर गारा , नाही मज कोठेही थारा ,उभा एकटा मी बिचारा, पान्त्स्थाना दाखवावी वाट ,कोठे दऱ्या कोठे घाट , पांथस्थ येती,जाती चुकोनये वाट,दाखविण्या वाट उभा मी ताठ, कसा एकटा मी माईल स्टोन ,खायला उठते मज निबिड रान.
काव्यरस