मोबाईलमधील वाय फाय कसे वापरावे?
मित्रांनो,
मला (आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांना) मोबाईल मधील वाय-फाय नेमके कसे वापरावे याची माहिती हवी आहे. अलिकडेच मिपावर मोबाईल वरील दोनेक धाग्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. मिपावरील तज्ज्ञ मित्र मला नक्की मदत करतील याची खात्री वाटल्याने हा धागा सुरु करतो आहे.
तर माझी विनंती आहे की मोबाईलमधील वाय-फाय कसे वापरावे? (जे फुकट असते असा माझा समज आहे)
त्यासाठी काय करावे लागते? हा वापर किती सुरक्षित आहे? सुरक्षा जपण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? या व त्याअनुषंगाने अधिक माहिती कोणी देऊ शकेल तर खूप आभारी राहीन.
उदाहरणार्थ माझ्याकडे एन्ड्रॉईड ४ वर आधारित सोनी चा एक्सपेरिआ आहे.
शेतकर्याची आत्मह्त्या (फाशी)
आला सोसाट्याचा वारा
गेले छ्प्पर ऊडुन।
मातीच्या चार भिंती
गेल्या पाण्यात बुडून॥
गोठ्यातील जनावरे
गेली जलप्रवासाला।
शेत जमिनही त्याची
तिचा पिकपात झाला॥
आली सरकारी फौज
गेली पहाणी करुन।
झालेले नुकसान
म्हणे देऊया भरुन॥
पूर्ण झाले वर्ष एक
नाही मदत पोह्चली।
सावकाराच्या कर्जापाई
त्याची कंबर खचली॥
झाला कर्जाचा डोंगर
चिंता मनाला वाटली।
खचले आत्मबळ त्याचे
"फाशी" झाडाला घेतली॥
ओज-शंकराची कहाणी
श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.
भैयाजींचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक शिक्षण सातार्यात झाले.
प्राध्यापक
महाराष्ट्रात गल्लो गल्ली कॉलेजेस चे पेव फुटले आणी प्राध्यापक नावाची एक नवीच जमात लोकांच्या नजरेस यायला लागली,त्या अगोदर बहुसंख्य विद्यार्थी हे ९ वी १० वी पर्यंत च गुचक्या देत बाहेर व्हायचे,हे प्राध्यापक म्हणजे चालता बोलता सरस्वतीचे अवतारच,
बिचार्या प्राध्यापकांना शिक्षणाचा खर्च् भरपुर,वर जिथे ते नोकरी करतात तिथले संस्था चालक हे प्राध्यापकांच्या अर्ध्या वयापर्यंत त्याला अर्धाच पगार देणार्,बिचार्यांच कस काय भागणार.
मग हे कॉलेज मध्ये शिकवण कमी करु लागले आणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी बोलावुन शिकवु लागले(ज्याला आपण क्लासेस वैगरे म्हणतो),प्राध्यापकांचा पगार हा वेतन आयोगाच्या शिफारसी प
भारतात क्रिकेट वर सट्टा अधिकृत झाला पाहिजे,
आय पी एल च्या निमित्ताने आता सट्टेबाज सक्रिय झाल्याची बातमी वाचली ,
सट्टेबाज ,त्यांची कार्य पध्ध्ती पंचतारांकित वर्तुळात नेहमीच पहिली आहे.
सट्टा हा परदेशात म्हणजे युके व जर्मनी मध्ये कायदेशीर आहे , त्याने सरकारला प्रचंड महसूल मिळतो.
एरवी क्रिकेट च्या सामन्यावर भारत हजार ते दोन हजार कोटींचा सट्टा लागतो.
हा अनधिकृत धंदा असल्याने ह्यातून सरकार ला कर मिळत नाही , व ह्यातून मिळणारे उत्पन्न हवाला मार्फत परदेशात जाते किंवा काळा पैसा म्हणून पडून राहतो.
भारतात घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा लाऊ शकतो ,
सध्याचे क्रिकेटर व त्यांना सतत स्पर्ध्धेत पळवणारे त्यांचे मालक पाहता ह्यांच्यावर लागणारा सट्टा थांबवणे ज
केळ्याच्या पूर्या
तर मंडळी झाल काय की सहज फिरायला म्हणुन २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात आलो होतो. आता सहकुटुंब अस बाहेर फिरणं काही सोप्प नसत हो. त्यात मुलबाळं बरोबर. मग अस फिरताना बरोबर थोडी फळ ठेवणं साहजिकच आहे नाहे का? तर ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टला मी अशीच एका सुपर मार्केट मध्ये शिरले. कुठं काय, कुठं काय, घेत घेत, आपल नेहमीचं, "गरिबांच फळ" केळी उचलली. आता केळी घेताना आपण ती कायमच घडाने घेतो ना? निदान डझनावर तरी! तशीच आपली उचलली अन चालले कॅश काउंटरकडे . तिथल्या एका हेल्परने मला मध्येच हटकलं अन विचारल, " हे! बाइंग सो मेनी बनानाज? हॅव यु चेक्ड द प्राइस?" च्यामारी! मी मनातल्या मनात त्याच्या सात पिढ्या उद्धरल्या.
अॅन्ड्रोईड: संस्थापक आणि स्थापना
टीपः माझा विडंबनाशिवाय काहीही लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुधारणा अवश्य सुचवा.
२००३ च्या शेवटी शेवटी असाच एक दिवस. स्टीव्ह पर्लमन -एक हुशार, यशस्वी अभियंता आणि भांडवल पुरवठा/ गुंतवणूकदार - याचा दूरध्वनी खणखणला, पलीकडे होता जुना मित्र आणि सहकारी अॅन्डी रुबीन जो तिथून जवळच्याच एका भाड्याच्या जागेत आपली कंपनी चालवत होता.
अॅन्डी: मी कफल्लक झालोय, पैशाची गरज आहे.
स्टीव्ह: कधी पाहिजेत?
अॅन्डी: आत्ताच्या आत्ता!
स्टीव्हने जवळच्याच बँकेत जाऊन १०० डॉलरच्या १०० नोटा काढल्या. ते १०,००० डॉलर एका साध्या पाकिटात घालून तो अॅन्डीच्या ऑफिसात गेला आणि त्याच्या टेबलावर ते पाकीट ठेवले.
गालिर्क सुप इन ब्रेड बाउल
सहित्यः
राऊंड ब्रेड - १
लसुण पाकळ्या - ८-१०
बटाटा - १
चिकन स्टॉक - ३ कप
ब्रेड स्लाईस - २
काळि मिरी पावडर - १/२ चमचा
बेसिल - १/४ चमचा
ओरेगानो - १/४ चमचा
चीज - २ चमचे
बटर - २ चमचे
मिठ चवीनुसार
कृती:
१. लसुण पाकळ्या सोलुन बारीक चिरुन घ्याव्या. बटाट्याचे देखिल काप करुन घ्यावेत.
२. कढईत butter गरम करावे. त्यात चिरलेला लसुण व बटाटा टाकुन परतुन घ्यावे.
३. ते थोडे परतल्यावर त्यात चिकन स्टॉक टाकुन, १०-१५ मिनिटे किंवा बटाटे शिजे पर्यंत सुप उकळु द्यावे.
४. सुपला उकळी आल्यावर त्यात २ ब्रेडच्या स्लाईसचे तुकडे करुन टाकावेत.
५.
नोव्हार्टीस - संशोधन आणि अनुकरण
भारताच्या सुप्रिम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. खटला होता तो नोव्हार्टीस ही नवीन औषधे तयार करणारी कंपनी, त्यांनी लावलेल्या एका महत्वाच्या औषधाचे पेटंट आणि त्याचे भारतात चालू असलेले अनुकरण. वरकरणी विषय कुठल्याही बाजूने सोपा वाटू शकतो, पण तितका तो सोपा नाही असे वाटते.
तर झाले असे: ९० च्या दशकात (९३ साली) नोव्हार्टीस या स्विस कंपनीने ल्युकेमियाच्या विशिष्ठ प्रकारांवर चमत्कार वाटावा असा उपाय ठरणारे औषध शोधून काढले. त्याला जगभरातून पेटंट मिळाले. भारतात २००५ साला पर्यंत औषधांसाठी पेंटंट हा प्रकारच नव्हता. २००५ साली भारताने तसे पेटंट देणे मान्य केले पण ते केवळ १९९५ सालानंतरच्या औषधांसाठीच.
मिसळपाव