द ब्यूटिफुल गेम
समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट बरं का! हे यूरोपियन्स, आफ्रिकन्स आणि दक्षिण अमेरिकन लोकं होते ना - त्यांनी आपली पुराणं वाचली आणि त्यांना किडा आला समुद्रमंथन करण्याचा. म्हणाले आपण अॅटलान्टिक महासागर ढवळून काढू. झालं! लोकं लागली कामाला. अँडीज कि आल्प्सचा एक पर्वत घेतला, अॅझटेकांच्या केत्झालकोआत देवाची रस्सी केली आणि लागले की समुद्र घुसळायला. आता पाश्चिमात्यच समुद्र तो! त्यातून पहिली आली ती हिरे माणकं नेली आफ्रिकन्सनी. मग आली वाईन - ती फ्रेंच लोकं घेऊन गेली. मग आलं सांंबा नृत्य - ते नेलं ब्राझिलियन्सनी.
सिद्धेश्वर,लक्ष्मीनारायण मंदिर -मांडवगण
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मांडवगण हे नदीच्या प्रवाहात वेढलेले गाव आहे.मांडव्य ऋषींची तपोभूमी आणि समाधी स्थान असल्याने गावाचे नाव मांडवगण आहे.
गाव सिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध मंदिरात प्रवेशद्वारातून आत येताच जुने प्रचंड मोठे वड-कडूनिंबाचे वृक्ष ही तपोभूमी असल्याची ग्वाही देतात.
खंडाळ्याच्या घाटासाठी...
यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.गोळ्या आणि गांधी
विषय : सोलापूर ला विमानसेवा कधी येणार
पिस्तूल दाखवणाऱ्या धर्मराज कडादींना ललित गांधी यांचे आव्हान,
https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/maharashtra-chamber-of…
केतन शहा सोलापूर मंच
कधी जाईल विमान उंच?
काय आले त्यांचे मनी
हे म्हणे पाडा चिमणी
संचालक धर्मराज कडादी
म्हणाले,किसने बात बढादी
रिव्हाल्वर दाखवून,घालीन गोळ्या
घडकीभरली,कोण वाजवील टाळ्
Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला,
Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला, कारमध्ये स्वयंपाकघर
https://www.thehindu.com/life-and-style/fifa-world-cup-qatar-2022-najir…
नाजी नौशी
खूपच हौशी
काढली कार
गेली ती कतार
पाच मुलांची आई
मेस्सीला बघण्याची घाई.
असेल चँम्पीयन मेस्सी
कोई नही नाजी जैस्सी
अर्जेंटिना ची फॅन
अशक्य? शी कॅन !
मला (न) जमलेली पाककला (पोळ्या)
पाककला नावातच कला आहे. ते कौशल्य आहे. ज्याला साधलं त्याला साधल. अन्नपूर्णा देवी ज्याला प्रसन्न झाली त्यांना सलाम. माझ्यावर देवीने प्रसन्न व्हायला जरा वेळ घेतला. म्हणजे अजूनही मी निष्ठेने तिची सेवा करीत नाहीच त्यामुळेच असेल, अजून पूर्ण प्रसन्न नाही झाली. पण निदान माझे स्वतःचे खायचे वांदे होत नाहीत एवढे तिचे आशीर्वाद मात्र लाभले नक्की.
मुळात स्वयंपाकघरात रमणारी मी अजिबात नाही. त्यापेक्षा बाई ठेवून सगळं आयत खायला मिळालं तरी आवडेल मला. स्वयंपाक करण्यापेक्षा मी ढीगभर पुस्तक वाचून काढेन किंवा शेकडो किमी सायकल चालवेन. ते सोपं.
शब्द तू, संगीत तू, तूच गाणे...
शब्द तू, संगीत तू, तूच गाणे
अंतरात निनादती तव तराणे.
बहरलेले झाड तू जे कळ्यांनी
बरसलेले मेघ तू जे सरींनी
सजविले आहे मना तू फुलाने.
रात तू जी भारली चांदण्याने
गीत तू जे गायले पाखराने
रंगल्याले तूच ते ना या नभाने.
तूच दर्या, तू नदी अन् झरा तू
चांदणे तू चांद तू अन् धरा तू
ल्यायलेले रुप तू या धरेने........
काव्यरस
पडघम
अनाम तार्याच्या गर्भीचे
ऊर्जा वादळ लवथवणारे
उधळून देते विस्फोटातून
विकीरणांचे पिसाट वारे
दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
सर्वव्यापी, निर्लेप, अनादि
स्थळकाळाचे चित्र रेखिते
आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते
अज्ञाताचा अदम्य रेटा
परतविण्याचे प्रयत्न माझे
थिटेच ठरती, रोमरोमी मग
कुतूहलाचा पडघम वाजे
काव्यरस
अस्वस्थ मनाचा ‘ताप’
ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. शरीराचे तापमान नियंत्रण आणि ताप येण्याची मूलभूत प्रक्रिया आपण यापूर्वी “गरम आणि ‘ताप’दायक” या लेखात समजावून घेतली आहे.
त्या लेखात संसर्गजन्य आणि अन्य शारीरिक आजारांमध्ये येणाऱ्या तापाचे विवेचन आहे. परंतु त्या व्यतिरिक्त, मानसिक बिघाड हे सुद्धा ताप येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. या प्रकारचा ताप वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यासंबंधी स्वतंत्रपणे काही लिहावे अशी सूचना एका वाचकांनी नुकतीच केली.
मिसळपाव