Skip to main content

सय

लेखक चक्कर_बंडा यांनी सोमवार, 21/11/2022 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा आणि दिवाळी दोन सणांच्या मागोमाग बहुदा केव्हातरी ती गेली नक्की कधी ते माहीत नाही पण लक्ष्मीपूजनाला दुपारी हटकून तिची सय येते.... सूर्य अस्ताला जाईपावेतो सबंध घरभर दाटून राहते स्वतःपेक्षा अनेकपट वजन वाहून नेणाऱ्या मुंगीसारखं स्वतःला खेचून बाहेर आणताना पापण्यांमध्ये आपसूक ओल येते नकळतपणे पाझरणारे डोळे संध्याकाळी रोषणाईच्या तेजाने "दिपले" म्हणून इतरांपासून लपवण मग तसं सोपंच जातं... असताना कधीचं जाणवू ही न देता माझ्या मार्गातील काटे वेचणारी ती तिच्यामाघारी तिच्या आठवणीही अबोल काळजी वाहताहेत माझी #चक्कर_बंडा
काव्यरस

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 21/11/2022 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी) ✪ चोरला घाट आणि अद्भुत सह्याद्री! ✪ नज़रों में हो गुजरता हुआ ख्वाबों का कोई काफ़ला... ✪ नदियाँ, पहाड़, झील, झरने, जंगल और वादी ✪ रेडबूलचा किस्सा ✪ लोकांची सोबत- आम्ही तुम्हांला काही न दिल्याशिवाय कसं जाऊ देऊ शकतो? सर्वांना नमस्कार.

(चारोळी विडंबन)-लसं....ग्रहण

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 21/11/2022 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा-चारोळी विडंबन चहात इडली चहात गुलाबजाम चहात जिलेबी आणि आमची चारोळी संपली (उगाच इकडं तीकडं भटकू नये म्हनून वरीजनल चारोळी इथं डकवली आहे,अर्थात वरिजनल चारोळीकारांची इक्क्षमा मागुन) &#128540,&#128540 वरील चारोळी खुपच हुच्च दर्जाची असावी असे वाटते म्हणून दुर्बोध वाटण्याची शक्यता आहे. खोलवर जाऊन पाहिले तर ही चारोळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाटते.

“एक” “शून्य” रोबो!

लेखक भागो यांनी शनिवार, 19/11/2022 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
“एक” “शून्य” रोबो! उपोद्घात Another Universe. Another Time. फार फार वर्षांपूर्वी- किती वर्षांपूर्वी?- कुणालाच माहित नाही की किती वर्षांपूर्वी- काहीही नव्हते. अवकाश नव्हते आणि काल नव्हता. ह्या विश्वाची सुरवात व्हायच्या आधी- काहीही नव्हते, होते फक्त अर्थशून्य. आदि नव्हता अंत नव्हता.. सुख नव्हते दुःख नव्हते. देव नव्हते, दानव नव्हते, धर्म नव्हता, अधर्म नव्हता. नीति अनीति नव्हती त्यामुळे त्याची चाड नव्हती. दिवस नव्हता, प्रकाश नव्हता त्यामुळे रात्र नव्हती आणि अंधार नव्हता. जन्म मृत्यूचे फेरे नव्हते. त्यामुळे यम नव्हता आणि नियम पण नव्हते.

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 17/11/2022 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी) सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना ✪ कुडाळमधील सायकलिस्टसकडून फ्लॅग ऑफ! ✪ अप्रतिम निसर्ग आणि पाऊस ✪ बांद्यामध्ये शाळा आणि सहज ट्रस्टसोबत भेट ✪ माय नेम इज एंथनी... मै साईकिल पे अकेला हूँ! ✪ गोव्याची झलक! ✪ संत गाडगेबाबा वृद्धाश्रम, शान्ती कुटीर वृद्धाश्रम आणि रोटरियन्ससोबत संवाद ✪ मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क ✪ भेटणं आणि बोलणं खूप महत्त्वाचं सर्वांना नमस्कार.

शरत्काल

लेखक नूतन यांनी गुरुवार, 17/11/2022 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद माणिक वर्माच्या गोड आवाजात हे गाणं ऐकताना मन हरवून गेलं पण पुन्हा पुन्हा शरदाचं चांदणं शब्दाशी घुटमळत राहिलं. 'शरदाचं चांदणं' हा वाक्प्रचार आपण सहसा विशेष गोष्टींसाठीच वापरतो. त्याच्या उच्चारानेदेखील मन आनंदात न्हाऊन निघतं. अशा या शरद ऋतू विषयी मला उत्सुकता वाटली आणि त्या अनुषंगाने काही काही वाचत गेले.

रातराणीची जादू

लेखक मालविका यांनी बुधवार, 16/11/2022 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
रातराणीची जादू जवळपास २ वर्षापूर्वी रातराणीची रोप लावली होती. जगतायत की मरतायत अशी करत करत जगली बा एकदाची. या पावसाळ्यात तर अगदी एकास एक करीत फोफावली मस्त. वाढ तर चांगली झाली पण फुलं काही लागेनात. पाणीही नियमित चालू होत. सगळी रोपं बांधावर लावल्याने कुंपण अगदी सुशोभित झालं आहे आता. थंडी पडायला सुरवात झालेय. ४ दिवसापूर्वी रात्री श्रीनिवासशी गप्पा मारत झोपाळ्यावर बसलेली असताना गार वाऱ्याची झुळूक आली. अंगावर शहारा आला. आधीच थंडी, त्यात मी झोके घेत बसलेले आणि वर वारा आला. पण याच झुळुकिबरोबर एक मंद सुगंध आला.

बाळेश्वर मंदिर आणि पेडगावचा किल्ला

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 16/11/2022 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
पेडगावची भग्न मंदिरे: भाग १ पेडगावची भग्न मंदिरे - लक्ष्मीनारायण मंदिर बाळेश्वर मंदिर पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी पुढ्यातच आहे हे भग्न मंदिर, ते आहे बाळेश्वराचं. आजमितीस ह्या मंदिराचे शिखर आणि सभामंडप संपूर्ण उध्वस्त स्थितीत असून फत गर्भगृह शाबूत आहे. जरी हे मंदिर छोटेखानी आणि भग्न असलं तरी दिसायला अत्यंत देखणं आहे. कदाचित भग्न असल्यामुळेच अधिक देखणंही दिसत असावं असं मला वाटतं. हे मंदिर एका अधिष्ठानावर उभारले असून सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे.

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ५

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 14/11/2022 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
image host इव्हॅन तुर्गेनेव्ह (९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३) Turgenev: The Novelist's Novelist एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ५ त्या रात्रभर ,मला झोप आली नाही. अति क्षोभाने ! मी घाबरलो होतो म्हणून नाही. मी भित्रा नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास या द्वंद्वात माझा प्राण जाईल अशी भीती माझ्या मनाला एकदाही स्पर्ष करून गेली नाही. मी फक्त लिझाचाच विचार करत होतो. माझ्या मेलेल्या इच्छा आणि मला काय केले पाहिजे याचा.