वसंताच्या उंबरठ्यावर..
(या मालीकेचा पहीला धागा http://www.misalpav.com/node/23312)
हा सारा अद्भुत स्वप्नांचा प्रदेश आहे. धुक्याने वेढलेल्या गर्द पर्वतराजींचा. धूसर. जाणीव-नेणिवेच्या सीमारेषेवरचा. स्वप्नाळू डोळ्यांनी स्वतःलाच न्याहाळणारा मुग्ध आसमंत. काळ वसंताच्या पहिल्या चाहुलीचा. वेळ रात्र व दिवस ह्यांच्या मधली. स्थळ-काळाप्रमाणे ‘ती’ देखील कौमार्य-यौवन, निरागसता-आत्मभान ह्यांच्या संधिप्रदेशात उभी. वसंतातल्या तांबुस पिंपळपानाइतकी नाजुक अन् कोवळी.
मिसळपाव