एगलेस चॉकलेट केक
साहित्यः मैदा १५० ग्रॅम, लोणी १०० ग्रॅम्,मिल्कमेड्साठी ( दूध पाऊण ली.+साखर पाऊण वाटी), १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, कोको पावडर अडीच चमचे, ५/६ चमचे साखर लागल्यास, दूध अर्धा कप, तूप.
क्रुती:पाऊण ली. दूध+पाऊण वाटी साखर मंद आचेवर आटवावे. मिश्रण मिल्कमेड सारखे झाल्यावर गार करावे. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यावे. मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, कोको पावडर चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा,बेकींग पावडर नीट मिक्स होईल. तयार मिल्कमेड आणि लोणी परातीत घेऊन फेसावे.फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी.
मिसळपाव
प्रदर्शनाव्यतिरिक्त ओरिगामी शिकण्यासाठी सशुल्क कार्यशाळाही घेण्यात येतील.
