Skip to main content

आता वाजणार की हो बारा बारा बारा ............

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 10/12/2012 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
वीसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणार्‍या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल.

कोसला २.०

लेखक पिंपातला उंदीर यांनी सोमवार, 10/12/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात शिकायला आल्यावर होणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाठीमागे लागणार व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेवेलपमेंट नावाच प्रकरण. कुठल्याही ब्राम्हण मध्यमवर्गीय घरातून आलेल्या पोराप्रमाणे माझया पण आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये शाखेवर जाणार्‍या, गर्व से कहो हं हिंदू है वाल्या, आय टि त करीयर करून फॉरिन ला जायची आकांक्षा बाळगणार्‍या आणि जगातील कुठल्याही सर्व चांगल्या गोष्टींबद्दल अपराध गंड बाळगणार्‍या मुलांचा भरणा होता. मी एकंदरच या सगळ्यांनमध्ये मिसफिट होतो. हिंदू असण्याची लाज जरी नसली तरी अभिमान त्याहून पण नव्हता. आय टि मध्ये जायची इच्छा आणि कुवत पण गैरहजर होति.

प्रारब्ध

लेखक शैलेंद्रसिंह यांनी सोमवार, 10/12/2012 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या वेळी चहा पिता पिता दिवसभरचे प्लान्स करत होतो. तेव्हढ्यात बेल वाजली. शेजारच्या नवलेकाकु आत आल्या... "बातमी कळली का?" "कसली बातमी" "अरे ते चौथ्या मजल्यावरचे जोशीकाका वारलेत ना सकाळी सात वाजता" "अच्छा" अच्छा हा उद्गगारवाचक शब्द कुठेही मुर्खासारखा वापरतो आणि मग ओशाळल्यासारखे होते. तशी आमची बिल्डिंग नवीनच होती आणि सगळी नवीन कुटुंबच होती त्यामुळे एकमेकांशी फ़ारशी ओळख नव्हतीच. आम्ही तर दिवसभर ऑफ़िसमधे चकाट्या पिटणारी लोकं आम्हाला तर नावावरुन चेहरा लक्षात येण्याची शक्यताच नव्हती. जोशीकाकांना कधी पाहिले असावे का असा विचार मी करुन लागलो. पण काही चेहरा लक्षात येत नव्हताच.

काय या पुणेकरांचे कौतुक !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 10/12/2012 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याबाहेरच्या लोकांना नेहमी वाटते की पुणेकरांचे एवढे काय कौतुक. यांच्या उकडण्याचेही कौतुक, यांच्या थंडीचेही कौतुक. म्हणजे पुणेरी पेपरमधल्या बातम्या वाचल्या की कळेल. कधी सकाळी पावसाचे अजिबात चिन्ह नसते. पुणेकर छत्री न्यायचा कंटाळा करतात. पण संध्याकाळी ऑफीसमधून घरी यायला निघावे तर बेसावध क्षणी पाउस पुणेकरांना गाठतो आणि भिजवतो. दुसर्‍या दिवशीच्या पेपरमधे भिजलेल्या पुणेकरांचे, झाडाखाली थांबलेल्या, स्कार्फ बांधलेल्या तरुणींचे फोटो आणि बातमीचे हेडींग अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ कधी हा पाऊस प्रचंड कोसळतो. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागतात. झाडे पडतात.

तक्षकयाग : एक सुरेख नाटक.

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी रविवार, 09/12/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो असे म्हणतात ! अनेक संघर्ष एकवटून “तक्षकयाग” हे प्रा.ल. मयेकर यांच्या कसदार लेखणीतून साकारलेले सुरेख नाटक काल पहिले. सहकुटुंब “ मुद्दाम पहावे” अश्या शिफारासीने ही हया नाटकाची ओळख ! महांकाळ व हब्बाल हे दोन समाज एका देशात राहत आहेत राहत आहेत. ओमर (?) नी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी रचली आहे हीच नाटकाची सुरवात ! फाळणी पासून सुरु होणारे नाटक लेखकांच्या मनाचा ठाव घेत घेत पहिल्या अंकात सापते तेंव्हा सेश स्वतंत्र झालेला असतो. दुसऱ्या संकट स्वतंत्र देशाचे नवे राजकारण सुरु होते आणि दहशतदाशी येवून थांबते.

ड्रॅगनच्या देशात ०५ - बायजींगमध्ये फेरफटका, सम्राटाचा बगीचा, शियानच्या दिशेने ऊड्डाण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 09/12/2012 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५...

लायकि अन नालायकि....

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 09/12/2012 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
तो आधिचा लेख वाचून अजून एक धागा काढावा असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.... माझ्या मते लायकी म्हणजे एखाद्या प्रसंगात/परिस्थितीत/ त्यावेळी लागणारी परिपक्वता....ज्या मुळे प्रामुख्याने स्वतःपेक्षा इतरांचा विचार व एकंदरीत लार्जर ग्रुप /समाजाचे हित साधले जाऊ शकतं..आयुष्यातील चांगली मूल्ये जपली जावून अजून तशी चांगली मूल्ये निर्माण होवू शकतील असे बघणे.. "साल्याची लायकीच नाहीये" ...ह्याचा अर्थच मुळी अमुक विषय/परिस्थिती/प्रसंगातल्या आधीच्या घटना समजून न घेता काहीतरी ऑफ द नोट वागणे/बोलणे/करणे इ. आणि समजा चुकून झाला असेल तर माफी मागण्या ऐवेजी दडपून तसेच वागणे ... उदा: १.

<तुम्ही मंगळवादी आहात का?>

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 09/12/2012 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही मंगळ वादी आहात का? ब्रांडेड जन्मपत्रीका...महागडे ज्योतिषी ..अंगठ्या, खडे व अक्सेअसरिज .. उंची नवग्रह शांती ..मंगळ शांती ... लग्न न जमणे , कडक मंगळाच्या मुलीचे मौ मंगळाच्या मुलाशी लग्न इत्यादी..इत्यादी .. मंगळ वाद पूर्वी आमच्या लहान पणी पण होता पण स्वरूप निराळे होते .. पत्रीकेत मंगळ असलेल्या मुलीचे लग्न साध्या मुलाशी लागले तर मुलगा मरतो मात्र मंगळाच्या मुलाचे लग्न साध्या मुलीशी झाले तर शाअंत कली तर काही होत नाही. हल्ली नजर सुरक्षा कवच , स्वर्ग चे ज्योतिषाचार्य वगैरे नव्या टेक्नॉलॉजीज आल्या आहेत.......

ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||

लेखक बाबा पाटील यांनी रविवार, 09/12/2012 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते | खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली || रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली | प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || " कवि गोविंद.... महाराणी ताराराणी बद्दल आणखी काही माहिती असेल तर्,कृपया सांगावी....

पांडुरंग पांडुरंग

लेखक कौस्तुभ आपटे यांनी रविवार, 09/12/2012 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे...
काव्यरस