Skip to main content

सिनेमे आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या आठवणी

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी शुक्रवार, 14/12/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या काही खास आठवणी असतात. आभासी जगतात भटकत असतांना ह्या भन्नाट विषयावर वाचायला मिळाले. ह्या निमित्ताने माझ्या आठवणींना लागलेला पाझर मी येथे रिता करतो. भारतात सिनेमे आवडत नाही अथवा पाहत नाही असा माणूस विरळाच आपण सिनेमे पाहतो म्हणजे काय तर एकतर थेटर माफ करा मल्टिप्लेक्स.

प्रिय सचिन देवा.....................

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 14/12/2012 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
देवा तुला शोधू कुठं .................... नाही टिकत तू क्रीज वर .............. नाही चुकवत तू योर्कर................. नाही चालत बॅट तुझी आता............ निराश होती भक्त! देवा तुला शोधू कुठं? pavilion मध्ये तू सदाच दिसतोस फार कमी क्रीज वर टिकतोस क्रिकेट सोडून जाहिरातीत दिसतोस जास्त परम देवभक्त ही झाला निस्तब्ध ............... देवा तुला शोधू कुठं................................? व्हावे रिटायर आता तरी देवा सकल भक्तजन करीती धावा होत नाहीत पूर्वीसारख्या धावा थकलास आता तू चालली थकत ही बॅट....... देवा तुला शोधू कुठं?

गाज अर्र हल उवा अल अमिरी..(गाजर हलवा)

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 13/12/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १. लाल बुंद गाजरे १ किलो a. स्वच्छ धुवून व कोरडी ठक्क पुसून वरचे वर किसून..(मधला पिवळट पांढरा भाग घेवू नये) २. १ लिटर ताजे निरसे दूध ३. साखर : २- ३ मोठ्या वाट्या... ४. केशर : २-३ चिमट्या ५. बदाम : १०० -१५० ग्राम्स मामरा बदाम ज्यास्त चांगले ६. पिस्ते : १०० ग्राम्स (अफगाणी पिस्ते जे विशेष करून प्रशांत कोर्नेर ठाणे येथे मिळतात) ७. बेदाणे : १०० ग्राम्स (अफगाणी ...वरच्या पिस्त्यान प्रमाणेच) ८. काजू : १०० ग्राम्स/ १५० ग्राम्स मोठे ९. तूप : ५०० ग्राम्स घरी कढवलेले : साजूक (चितळ्यांच्या लोण्याचे असेल तर फारच उत्तम) १०. मोठे जाड बुडाचे पातेले २ ११. तुमची इंग्लिश डिक्शनरी कृती : एका

3d visualisation: making of rainy night (बदलुन)

लेखक स्पा यांनी गुरुवार, 13/12/2012 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
लाईफ ऑफ पाय पहिल्यापासून डोके भिरभिरलेले होते .. चायला जमाना कुठे चाललाय आणि मी कुठे . काहीतरी आपण पण हटके ३डी करायचे असे ,मनाशी वाटत होते . अर्थात मी जे नेहमी काम करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे , हटके , जे मला आनंद देईल असे. विचार करत बसलो मग मागे कधीतरी डोक्यात आलेल्या कथेचा प्लॉट आठवला.

मराठी संकेतस्थळांसाठी यंदाही स्पर्धेचे आयोजन २०१३

लेखक सागर यांनी गुरुवार, 13/12/2012 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे. मुंबई- राज्य मराठी विकास संस्था व सीडॅक मुंबई या संस्थांच्या सहकार्याने यंदाही मराठी सकेतस्थळाची स्पर्धा २०१३ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सरकारी संकेतस्थळ व इतर संकेतस्थळ अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. सरकारी संकेतस्थळाच्या गटासाठी पहिला पुरस्कार १५ हजार रुपये, दुसरा १० हजार आणि तिसरा पुरस्कार ५ हजार रुपयांचा असेल. तर इतर संकेतस्थळासाठी पहिला पुरस्कार ३५ हजार रुपये, दुसरा २० हजार आणि तिसरा १५ हजार रुपयांचा असेल.

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

लेखक चिर्कुट यांनी गुरुवार, 13/12/2012 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा दिवाळीच्या काळात १ आठवड्याच्या सुट्टीवर घरी गेलो होतो. माझे वाढलेले आकारमान पाहुन बरेच टोमणे बसत होते, तरीही फराळ/इतर खाणं हादडणे चालूच होते. :) पण एके दिवशी अचानक लक्षात आलं की माझा मलाच मी उचलत नाहीये.. :( त्यात माझ्या घरी शुगरची हिस्ट्री आहे, त्याची भीती आहेच. मग ठरवलं की आता शेंडी तुटो वा पारंबी, वजन कमी करणारच.. मी असं बोलून दाखवायचा अवकाश की सल्ल्यांचा भडीमार सुरु झाला. 'एक वेळचं जेवण बंद कर', हे खाणं सोड, ते खाणं सोड, असा व्यायाम कर, तसा प्राणायाम कर, नुसतं हैराण करुन सोडलं होतं सगळ्यानी.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 13/12/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.

खूप दिवसांपूर्वी कुठेतरी असं वाचलं होतं की पिकांना वाढीच्या काळात संगीत ऐकवल्यावर त्यांची उत्तम  वाढ होऊन सकस व भरपूर उत्पादन होते. गायींना दोहताना संगीत ऐकवल्यास दूध सरसरीपेक्षा जास्त मिळते. पशु पक्ष्यांप्रमाणेच वनस्पतीनाही जीव असतो हे जीवशास्त्रात वाचले. पण वनस्पतींना ‘आत्मा’ असतो का ? प्राण्यांना जसे शिकवले तर त्यांच्याकडून विविक्षित कृती करवून घेता येतात तसे वनस्पतींचेही असते काय ?  उच्चारित किंवा अनुच्चारित आज्ञा / सूचना / विनंती त्यांना समजते काय ? गोनीदांच्या कादंबऱ्यातून झाडांशी बोलण्याचे प्रसंग खूपदा दिसले आहेत.

कैसे दिन बीते, कैसे बीती रतिया

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 13/12/2012 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
पंडीत रविशंकरजींना श्रद्धांजली वाहण्याच्या निमीतानं त्यांनी स्वरबद्ध केलेलं एक अनोखं गाणं चित्रपट अनुराधा, कवी शैलेंद्र ..हाये.. कैसे दिन बीते कैसे बीती रतिया पिया जाने ना ..हाये.. कैसे दिन बीते कैसे बीती रतिया पिया जाने ना नेहा लगा के मैं पछताई सारी सारी रैना निन्दिया ना आई जान के देखो मेरे जी की बतिया.. पिया जाने ना ..हाये.. कैसे दिन बीते कैसे बीती रतिया पिया जाने ना रुत मतवाली आ के चली जाये मन में ही मेरे मन की रही जाये खिलने को तरसे नन

माळरानी खडकात जेव्हा रुजते बियाणे...

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 13/12/2012 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता. अर्ध्या एकर शेतात पेरलेल्या भुईमुगाच्या विरळ मोडांकडे हताशपणे पाहत रायाजी बसला होता. वीस किलो बी त्याने बाराशे रुपयांचे घेतले होते.अजून जगुनानाचे पैसे दिले नव्हते.