Skip to main content

व्यायाम आणि प्रथिनांची आवश्यकता

लेखक शैलेंद्रसिंह यांनी रविवार, 16/12/2012 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करण्यासाठी व्यायाम गरजेचाच आहे. त्याला पर्याय नाही. पण त्याच्या सोबतीला योग्य आहार गरजेचा आहे. भारतीय आहारामधे प्रथिनांची खुप कमतरता असते. शाकाहरी असेल तर विचारुच नका. उदाहरण द्यायचं झाल्यास एका अंड्यामधे फक्त ३-४ ग्राम प्रोटीन्स असतात. आणि आपल्या शरीराच्या किलोग्राम वजनाइतके ग्राम प्रथिन आहारात हवीच रोज. म्हणजे तुमचं वजन ८० किलो असेल तर रोज ८० ग्राम प्रथिनं खाणं गरजेचं आहे. प्रथिनांमुळे शरीरातील पेशींची निर्मीती होते. प्रथिनंच शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. दुसरं म्हणजे तुमच्या शरीरातील चरबीचं प्रमाण. पुरुषांसाठी १८-२२% च्या वर असेल लठ्ठ समजले जातात.

बॉम्बे टाईम्स बद्दल आपले काय मत आहे?

लेखक हिरवळ यांनी रविवार, 16/12/2012 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मीपाकर.. मी मीपाची निस्सीम चाहती..जवळ जवळ गेली ४ वर्षे मी जमेल तेव्हा मीपाच्या कट्यावर हजेरी लावत होते, पण कधी अधिक्रुत सदस्य व्हायचा योग येतच नव्हता... आता तो जुळुन आलाय.. बिल्डीन्गीन्च्या जगता मध्ये आणि आपल्या धकधकीचा आयुष्यामध्ये खर्‍या अर्थाने दिसणारा वा अनुभावायला मिळणारा हिरवा रंग आपल्या मनाला ताजेतवाने करुन जातो.. या हिरवाईची मनोमन आवड असणारी मी, म्हणुन माझे नाव "हिरवळ".. खालील सदराद्वारे मी मीपावर लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न करत आहे, त्यामुळे काही चुकभुल झाली असल्यास माफी असावी.. आपल्या सर्वान्च्या घरी Times of india येत असेलच....

मला माहीती हवी आहे लवकर ...प्रदीप मोहीते सांगलीचा

लेखक रणजित चितळे यांनी शनिवार, 15/12/2012 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
सांगलीचा प्रदीप मोहीते ह्यांनी एक हेलीकॉप्टर केले आहे. छोटेसेच आहे पण केले आहे. ते उडणारे नाही पण त्याचा प्रयत्न चांगला आहे. तो फक्त दहावी शिकलेला आहे असे न्युज मध्ये सांगितले. यु ट्युबवर आहे कोणा सांगलीच्या मि पा करांना वा कोणालाही त्याचा पत्ता माहीती असेल तर मला द्यावा ही विनंती. त्याला मदत करायची इच्छा आहे.

नशिबवान

लेखक लाल टोपी यांनी शनिवार, 15/12/2012 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
जेफ्री आर्चरच्या 'अला चार्ट' कथेचा स्वैर अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे...
आर्थर होपगार्ड सैन्यदलाच्या सेवेतुन दिनांक ३ नोव्हंबर, १९४६ रोजी सेवामुक्त झाला आणि महिन्याभरातच तो सैन्यदलात जाण्यापुर्वी काम करीत असलेल्य ईंग्लड मधील कोव्हेंट्री शहराच्या बाहेर असलेल्या ट्रंफ कार कंपनीत दाखल झाला. गेली पांच वर्षे त्याने सैन्यदलासाठी बहादुरीची कामे केली होती आणि त्या कामाचे बक्षीस म्हणुन युध्द संपल्या नंतर काहीतरी चांगली संधी मिळेल अशी आशा मनात ठेऊन तो परतला होता. परतल्या नंतरची वास्तुस्थिती मात्र वेगळीच आहे असे त्याला जाणवले. कारण त्याला अपेक्षीत असा प्रतिसाद कोठुनही मिळत नव्हता.

ऊमदा प्राणी.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 15/12/2012 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
परवा या कार्यक्रमाला गेलो होतो तेथे काढलेली काही फोटो...... टापा व घाबरुन उडणारी माती....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जिवाभावाचे मैतर.....घोड्याशी नीटच वागावे लागते. जर तुम्ही त्याच्या मनातून उतरलात तर तो ऐनवेळेस तुम्हाला अस्मान दाखविल्याशिवाय रहात नाही. माणसाला जनावरांचा माणसाचा लागत नाही इतका लळा लागतो.

फुन्सूक वांग्डू...... गब्बर सिंग.... अजय राठोड... वगैरे वगैरे

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 15/12/2012 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाची शीर्षक वाचून काहीतरी सरमिसळ झाल्यासारखे आहे. चित्रपटातील व्यक्तीरेखा त्यांच्या स्वभावासहीत तुमच्यापर्यन्त पोहोचते अशा फारच कमी व्यक्तीरेखा लिहील्या गेल्या आहेत. अशी एखादी व्यक्तीरेखा चांगल्या कलकाराला मिळाली तर तो त्याचे सोने करतो. थ्री इडियट्स चित्रपटातील अमीर खान ने रंगवलेला फून्सूक वांग्डू. ही व्यक्तीरेखा त्यापैकी एक. चित्रपटात फून्सूक वांग्डू चे जे चित्रण रंगवलेले आहे त्या नुसार. संवेदनशील परंतु अगदी प्रॅक्टीकल. स्वतःच्या मर्यादांचे पूर्ण ज्ञान असलेला तरीही नवनवे प्रयोग करून पहाणारा. प्राध्यापकांच्या ज्ञानाबद्दल आदर असणारा पण पोथीनिष्ठता नाकारणारा.

खमंग वडे

लेखक गौरीबाई गोवेकर यांनी शनिवार, 15/12/2012 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तांदुळ, हरभ-याची डाळ, उडदाची डाळ, हळद मीठ, तेल, हिरव्या मिरच्या, आले कढिपत्ता. प्रथम २ वाट्या तांदुळ, १ वाटी हरभ-याची डाळ, १/२ वाटी उडदाची डाळ हे एकत्र करून मिक्सरवर जाडसर दळून घ्यावे. या जाडसर पिठाला भरडा असे ही म्हणतात.

आवडलेली गाणी : ये मौसम रंगीन समा

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 15/12/2012 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
गाणी वाजवायला शिकताना काही साधीसोपी पण एकदम मूड बदलून टाकणारी गाणी सतत मन वेधून घेत राहिली. या गाण्यात फार काही उच्च नाही पण त्यांच्या साधेपणामुळेच ती गुणगुणाविशी वाटतात. कामात सुद्धा ती बॅकग्राउंडला चालू असतील तर वातावरण लाईट राहतं. पूर्वी मोठ्या स्टुडिओजमधे चित्रपट निर्मितीची वेगवेगळी कामं एकाच ठिकाणी चाललेली असायची. एकदा एक दिग्गज निर्माता स्टुडिओत फेरफटका मारत होता. तो गाण्याच्या रेकॉर्डिंग रूमपाशी थबकला. एक नामचीन संगीतकार तितक्याच प्रतिभावंत गायिकेला गाण्याची चाल बर्‍याच वेळेपासनं समजावून देत होता. निर्मात्यानं त्याला विचारलं `भाई बात क्या है? इतनी देर क्यों लग रही है गाना बिठानेमे?

आता तरी देवा,

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 15/12/2012 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी देवा आम्हा पावशील का? महागाईला आळा तू घालशील का? दिवसेंदिवस हि वाढतच जाई | जगामध्ये हिला कोणी रोखणारा नाही | तू तरी हिला आता रोखशील का? महागाईला आळा तू घालशील का? गरीब श्रीमंतातली दरी वाढतच जाई | पुढारी खिसे भरण्यात मग्न होई | याच्यासाठी काहीतरी करशील का? महागाईला आळा तू घालशील का? पैसेवाले रोज करतात मजा | गरिबांसाठी संसार, आहे एक सजा | गरीबांचा वाली तू होशील का? महागाईला आळा तू घालशील का? रोज होत आहे नवीन घोटाळे | गरिबांचे निघते आहे रोज दिवाळे | त्यांच्यासाठी रोज दिवाळी आणशील का? महागाईला आळा तू घालशील का? महागाईचा असा चालला आहे खेळ | खर्चाचा नि पगाराचा बसेना वो मेळ | ताळमेळ घडवू

गाजराची मिक्स भाजी

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 15/12/2012 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- गाजरे अर्धा कि., कांदे ६-७ मध्यम, बटाटे २ (ऐच्छीक), काजूगर एक वाटी, आले-लसूण पेस्ट (१ इंच आले+१०-१२ लसूण पाकळ्या), खसखस पाव वाटी, पांढरे तीळ पाव वाटी, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट्,तेल पाच चमचे, आमचुर एक छोटा चमचा,मीठ, साखर, ह्ळद, मोहरी, जीरे, कोथिंबिर. क्रुती:- खसखस, तीळ वेगवेगळे भाजुन पावडर करून घ्यावी. आले-लसूण पेस्ट करावी. गाजराचे छोटे लांबट तुकडे करावे. कांदे पातळ उभे चिरावे. काजुगर कोमट पाण्यात भिजवावे. बटाटे गाजराप्रमाणेच लांबट चिरावे. कोथिबिर धुऊन बारीक चिरावी. कढईत तेल गरम करावे. मोहरी, जीरे घालावे. मोहरी तडतडली की कांदा घालावा. पाच मिनिटे परतावा.