कोपरगावात अनुभवा "तृप्ती"
कोपरगांव माहितिये ? साईबाबांच्या शिर्डी पासून फक्त १७ किमी वर. २ साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध. मी साधारण १९९२ पासून जातोय. मुद्द्याचं म्हणजे : इथे एक भार्री जेवणाची जागा आहे. "तृप्ती भोजनालय ".
आम्ही , म्हणजे मी आणी माझा मित्र अजय , कधी कधी उशीरा पोचलोय तेव्हां आम्ही चक्क बंद केलेलं शटर सुधा उघडायला लावलेलय. दिवस भराचं काम सम्पवायचं आणी तृप्ती मधलं जेवण हाणायचं.
आज सुधा तीच चव, तश्शीच व्यवस्था, तोच आखडू मालक.१९७७ पासून चालू आहे म्हणे. म्हणजे बघा , आपण जर प्रेमानी त्याचं कौतुक करायला गेलो , तर हा मनुष्य बिल्कूल बोलत नाही. फोटो काढायला दिले हेच नशीब.
मिसळपाव
नमस्कार मंडळी,
सर्वांना दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. हि दिवाळि सगळ्यांच्या सगळ्या ईच्छा / आकांक्षा सुफळ सपुर्ण करो.
तर इतके दिवस मीपाचा नीयमीत वाचक होतो आणि इथे प्रकाशित होण्यार्या सर्व गोष्टींचा मनापासुन आनंद घेत होतो आणि राहिन.