कितीक दिवस हे
कितीक दिवस हे दुरुन दुरुन पहाणे
मनातिल गुपीते सारीत सारीत बोलणे
सोंग हे पांघरुन
गुज मनी दडवून
उगीच उगीच हासणे
कितीक दिवस हे...
हले ना ओठ जरी भाषेचा आड काही लपत्ये
श्वासांची माळ तुझी कुणाचे नाव उरी जपत्ये,जपत्ये,जपत्ये
कसल्याशा कळेला दाबीत दाबीत जगणे
कितीक दिवस हे...
सुनेसे गाव जसे, मनात भाव तसे दाटले
भवती भिड जरी,एकटा जीव असे भासले,भासले,भासले
आपुल्याच जीवाला जाळीत जाळीत रहाणे
कितीक दिवस हे...
फुटु दे बांध आता, मुखाचे बंध से सुटू दे
भारला सूर उरी, जाऊ दे पार नभी भिडू दे, भिडू दे, भिडू दे
हवे हवे असताना टाळीत टाळीत वागणे
कितीक दिवस हे...
गीत -- कौस्तुभ आपटे
हे गाणे खालील लिंकवर ऐकू शक
काव्यरस
मिसळपाव