मका बटाटा टोस्ट
साहित्य : चार ब्रेड स्लाईस, उकडलेले बटाटे दोन, उकड्लेले मक्याचे दाणे अर्धीवाटी,१ सिमला मिरची बारीक चिरून, मीठ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, आले लसूण पेस्ट १ चमचा, लिंबाचा रस थोडासा, १ चमचा बटर.
एका कढईत थोडेसे बटर घेऊन वितळल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला, नंतर त्यात बारीक चिरलेली सिमला मिरची , कुस्करलेले बटाटे, उकड्लेले मक्याचे दाणे, मीठ, चिली फ्लेक्स, लिंबू रस घालून थोडे ढवळावे व खाली उतरवावे. मिश्रण गार करावे. ब्रेडचा स्लाईस घेऊन त्याला बटर लावावे त्यावर हे मिश्रण घालावे त्यावर किसलेले चीझ घालावे व दुसरा ब्रेड्चा स्लाईस ठेवावा व टोस्टरमध्ये घालून टोस्ट करावा.
मिसळपाव