Skip to main content

माझ्या लग्नाची एक गोष्ट...

लेखक ह भ प यांनी गुरुवार, 01/11/2012 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनाच्या कोणत्याही पुर्वानुभवाशिवाय लिहितोय. पण लग्न ठरत असलेल्या एका तरुणाच्या मनातील विचारांचं प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न करतोय. (फार पुर्वी आतंरजालावर एके ठिकाणी प्रकाशित केला होता..)या लेखामध्ये प्रकट केलेल्या घटना व विचारांशी लेखक सहमत असेलच असे नाही.. शिवाय संपुर्ण काल्पनिक.. अन कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहित बहुदा..

माझ्या लग्नाची एक गोष्ट...

साधारण २७ व्या वर्षी करायचं ठरवलं होतं.. दीड वर्षं अगोदर होतंय.. पण मुली बघायला सुरुवात झाली होती. मागच्या वर्षी एप्रील मध्येच.. मी घरापासून लांब राहतो.. चांगलाच लांब.. रेलवेनं घरी यायचं म्हटलं तरी २४ तास लागतातच लागतात.

फलाफील - शवर्मा

लेखक गणपा यांनी गुरुवार, 01/11/2012 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपुर्वेत असताना (तेव्हाच्या)आम्हा बॅचलर लोकांच मधल्या वेळेतलं खाणं म्हणजे शवर्मा(शोरमा). स्वस्त आणि मस्त. तेव्हा व्हेज शवर्माच्या वाटेला जरी फारसा जात नसलो तरी मला फलाफील फार आवडायचे. नुसते फलाफील आणि सोबतीला डीप म्हनुन हमुस बस, एका बैठकीत ७-८ रिचवले की पोटभरू काम व्हायचं.

' एप्रिल फुल ?? '

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 01/11/2012 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांच्या भयानक मस्करीला बळी ठरलो होतो. संध्याकाळच्या बरोब्बर पाचच्या दरम्यान टाईम स्क्वेअरच्या पायर्‍यांवर जाऊन आजूबाजूची मस्ती बघत विसावलो होतो . एप्रिल महिन्याची पहिलीच तारीख. अनायसे आलेला शनिवार. शनिवारि आम्हा भारतीयांचा छोटासा मेळावा ज्याला सोप्प्या इंग्रजीत गेट टुगेदर म्हटल जातं. शनिवार खास असायचा आमच्यासाठी .बीअर चे टिन घेऊन संध्याकाळच्या वेळी न्युयॉर्क शहरातल्या भन्नाट गर्दीत ,आजुबाजुच्या झगमगाटात ,त्याच गर्दीचा एक भाग बनायचो आम्ही.मजा यायची .मस्त ग्रुप होता . सहा वाजत आले, पण कुणाचाच पत्ता नाही. फोनही उचलेनात कुणी. एक सोडला, दुसरा सोडला, 'अरे यार कुणीतरी रीप्लाय करा !

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ : खूब लडी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी

लेखक सारथी यांनी गुरुवार, 01/11/2012 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952 “ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967 “ पुणे ते पानिपत ” भाग ३ : असीरगढ - ओंकारेश्वर – रावरखेडी : http://www.misalpav.com/node/22988 “ पुणे ते पानिपत ” भाग ४ : उज्जैन –बजरंग गड – शिवपुरी :http://www.misalpav.com/node/22997 “ पुणे ते पानिपत ” भाग

२१ डिसेंबरचे प्लॅन्स

लेखक औदुंबर यांनी गुरुवार, 01/11/2012 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रहो, २०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अ‍ॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!

मला भेटलेल्या अफलातून व्यक्ती

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 31/10/2012 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी ३ वर्षापूर्वी कतार ला असताना आमच्या ग्रुप मध्ये राजू मिरचंदानी म्हणून एक टेक्निशियन होता ,वय वर्षे फक्त ६३ ! अतिशय जॉली आणि हसतमुख .अगदी अनोळखी असणाऱ्या व्यक्तीशीही त्याच्या तासनतास गप्पा चालत . इजिप्शियन , फिलिपिनो , थायलंडी , पाकिस्तानी, कतारी, अमेरिकन ,ब्रिटीश कोणीही असो ! ऑफिसर ,म्यानेजर , असो कि झाडूवाला असो ,राजू म्हटलं की सगळ्यांना माहित ! हा राजू मुळचा सिंधी ! फाळणीनंतर वडील मुंबईला स्थाईक झाले . मग राजूचा जन्म .सुमारे १९५० चा ,राजूने इलेक्ट्रीशियन चे शिक्षण घेवून मुंबईत छोट्या-मोठ्या कंपनीत जॉब केले . १९७८ ला सर्वप्रथम कतार ला आलां , लग्न झाले ,पण बायको मुंबईतच!

चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा

लेखक आळश्यांचा राजा यांनी बुधवार, 31/10/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी. प्रकाश झा यांनी काही चांगले चित्रपट अलीकडे दिलेले आहेत. मला आवडलेले म्हणजे अपहरण, गंगाजल. व्यवस्थेचे बर्‍यापैकी ज्ञान त्यात दिसले होते. पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या अधिकार्‍यांना आयजी रँकचे गणवेश चढवणार्‍या आणि पोलीस कमिशनर या पदाच्या अधिकार्‍यांना हास्यास्पद पद्धतीने रंगवणार्‍या हिंदी सिनेसृष्टीकडून फारशा अपेक्षा कधीच नव्हत्या. काही अपवाद आहेत, त्यात झा आहेत असे वाटत असतानाच हा चक्रव्यूह नावाचा वैचारीक गोंधळ बघण्यात आला.

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 31/10/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

दु:ख झाले पाखरू

लेखक जयवी यांनी बुधवार, 31/10/2012 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या वेदनेला पंख हसरे लाभले दु:ख झाले पाखरू अन नाचू गाऊ लागले भिरभिरीची पाखराच्या सवय होऊ लागली वेदनेच्या जाणिवेची गरज भासू लागली दूर झाले मग सुखाच्या पाश सारे तोडले जीव जडला वेदनेवर दु:ख मिरवू लागले. भेटते जेव्हा नव्याने वेदनेला त्या जुन्या जाग येते जीवनाच्या मैफिलीला मग सुन्या जयश्री