Skip to main content

असेच काही उदासवाणे .....

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 30/10/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच. ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही.

मदत हवी आहे...

लेखक पाटव यांनी मंगळवार, 30/10/2012 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकार मित्रहो, अश्विन शुध्द पक्षी प्रतिपदेच्या (घटस्थापनेच्या) मुहुर्तावर आमच्या येथे मुलगी जन्माला आली आहे. आता बारसे करावे लागणार तर नाव ठरवावे लागेल ना! मग इथे मिपावर नाही येणार तर कुठे जाणार? तर मदत हवी आहे मुलीचे नाव ठरवण्यासाठी (नावे ठेवण्यासाठी नाही) नावाबद्दल अपेक्षा १. नाव शक्यतो नव्हे मराठीच हवे २. साधे, सोपे, सुटसुटीत असावे ३. स्वाती नक्षत्र आणि तुळ रास आहे तर टंकताय ना?

विकसनासाठी आयडीयाची कल्पना द्या.

लेखक मितभाषी यांनी सोमवार, 29/10/2012 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आमची ३५ एकर पडीक जमीन आहे. सोबत फोटो जोडले आहेत. सदरच्या जमीनीचे विकसनासाठी आपापल्या आयडीया कळवा. लोकेशन : ही जागा पुणे-नाशिक हायवेवर आहे. पुणे आणि नाशिकच्या मध्यावर आहे (अंदाजे १०० किमी अंतर). पायथ्याशी पाण्याचा स्पॉट आहे. तिथून पाण्याची व्यवस्था करता येईल. धन्यवाद. . .

मराठी गुलामगिरी

लेखक पोप्य्लोन यांनी सोमवार, 29/10/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही . कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित . देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते .

त्याची डिटॅचमेंट

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 29/10/2012 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरार्ध काही दिवसांपूर्वी "अटॅचमेंटमधली वेदना आणि डिटॅचमेंटमधला आनंद" याबद्दल झालेली चर्चा या छोट्याशा स्फूटाला कारणीभूत ठरली. ---------------------------------------------------------------------------- प्रिय, निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का? वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो. 'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं.

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ : शिंदे छत्री - माधव राष्ट्रीय उद्यान - शिवपुरी

लेखक सारथी यांनी सोमवार, 29/10/2012 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952 “ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967 “ पुणे ते पानिपत ” भाग ३ : असीरगढ - ओंकारेश्वर – रावरखेडी : http://www.misalpav.com/node/22988 “ पुणे ते पानिपत ” भाग ४ : उज्जैन –बजरंग गड – शिवपुरी :http://www.misalpav.com/node/22997 आठवा दिवस : १०

रागिणी सुहावनी- किरवाणी

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 28/10/2012 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपले भारतीय संगीत व आयुर्वेद यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असला पाहिजे. भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत . यात उत्तर भारतीय संगीत व कर्नाटक संगीत असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीत एका सप्तकात मूल व विकृत असे मिळून बारा स्वर आहे असेच मानतात.या बारा स्वरांच्या रचनेला काही बन्धने आहेत. नियम आहेत त्याना राग असे म्हणतात. अनेक वर्षांच्या वैचारिक व आस्वादात्मक प्रयोगप्रक्रियेनंतर याचे एक शास्त्र बनले आहे. काय बहुतांशी कानांना रंजक वाटले व काय अरंजक वाटले याचा चिकित्सक शोध घेऊन आजचे राग संगीत बनले आहे.

आमच्या गावातील एक आश्चर्य

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 28/10/2012 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे . लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली. पण गणितात मात्र प्रचंड हुशार!

अरे माझ्या देवा... Oh My God..

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
ओह माय गॉड.. अरे देवा ... असे आपण कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी, कितीतरी गोष्टीत सतत वापरत असतो. आता या मागील किंतु, हेतू, परंतु हा विविधांगी, माणसानुरूप, कालानुरूप बदलत असतो, हा भाग निराळा. अमुक काही झालं , कि हे देवा, अस्सं झालंच कसं? काय करणार देवाची करणी.. याच देवाच्या करणीवर आक्षेप घेणारा असा अभिनय मांडलाय 'परेश रावल' यांनी वरील "ओह माय गॉड" या चित्रपटात. उत्तम सादरीकरण, दिग्दर्शन, सर्वांचा आपापल्या वाटेला अभिनय. पण मूळ खांब म्हणजे परेश रावल. देवाची भूमिका साकारलीय दस्तुरखुद्द 'अक्की" म्हणजे आपला अक्षय कुमार याने. तर हि कथा एक हिंदी नाटक " किशन वि.