Skip to main content

पराभव...

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 03/11/2012 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी जेव्हा उभा रहातो स्वतः विरुद्ध लढायला.. तेव्हा लक्षावधी विचारांच्या झुंडीच्या झुंडी घेरतात मला निमिषार्धात.. मी एकटा केविलवाणा दुर्बल.. सुळावर चढवलं जातय मला... विचारांचा एक एक बोचरा खीळा ठोकला जातोय माझ्या मेंदुत हृदयात, शरीराच्या प्रत्येक संवेदनशील भागावर प्रचंड अत्याचार...!!

मुली आणि आम्ही

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 02/11/2012 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे.

अभिशाप जीवनाचा

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 02/11/2012 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद) आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला जगणे उदासवाणे, माझे करून गेला नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84
काव्यरस

मसाला मसूर डाळ

लेखक प्रियाकूल यांनी शुक्रवार, 02/11/2012 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
अख्खी मसूर डाळ ५-६ तास भिजवून ठेवा. त्याला मोड आणले तरी चालतील. नंतर ते कोरडे करून घ्या.एका काढीत तेल गरम करून त्यात मसूर तळून घ्या.दाणे दाबून पहा. क्रिस्पी झाले कि काढा.लगेच काळ मीठ आणि जिरेपूड लावून घ्या.प्रत्येक वेळी डाळ तळून काढली कि मीठ आणि जिरपूड लावून घ्या. तरच मीठ आणि जिरेपूड सगळीकडे लागते.आवडत असल्यास तिखट पण घालता येईल .मसाला मसूर डाळ तयार.झटपट अन खमंग.हि डाळ चिवडा,भेळ मध्ये छान लागते. तळताना तेल उडते तेव्हा जरा जपूनच तळा.:)

पांढर्‍या हत्तीच्या हट्टापाई आणखी पांढरा हत्ती!

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 02/11/2012 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या लाडक्या (सुदैवाने आता माजी) राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचे नवे प्रकरण! आपल्या गावच्या, अमरावतीच्या विकासाकरता खास हट्ट करून त्यांनी एक नवी गाडी सुरु केली जी अमरावती ते नागपूर अशी धावते. कागदोपत्री सर्वोच्च असणार्‍या पदावरील व्यक्तीचा हट्ट म्हणू रेल्वे मंत्रालयाने तो पुरवला खरा. पण तो चांगलाच तोट्यात चालतो आहे. मिळकतीच्या अंदाजाच्या जेमतेम ४ टक्के पैसे मिळत आहेत! प्रतिभाताईंनी आपली सुमार कारकीर्द निव्वळ अशिष्ट, वाईट गोष्टींकरताच चर्चेत येईल ही गोष्ट कटाक्षाने पाळली आहे असे दिसते आहे.

वाधल्या दाढी-मिश्या

लेखक खान यांनी गुरुवार, 01/11/2012 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कर मन्दलि, मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे.
काव्यरस

चावडीवरच्या गप्पा – बस डे

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 01/11/2012 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
“काय घारुअण्णा, आज काय मग बसने, मंडईत वाहिनीना घेउन?”, चिंतोपंत एकदम थट्टेखोर हसत. “अरे हो आज बस डे होता नाही का! आज काही बाहेर जायला झालेच नाही. त्यामुळे काय झाले ह्या बस डेचे काही कळलेच नाही”, नारुतात्या. “अहो कसला डोंबलाचा बस डे अन काय, आमच्या हिला पण भारीच हौस.”, घारुअण्णा भयंकर त्राग्याने. “काय झाले?”, इति नारुतात्या. “अरे, चांगले म्हणत होतो की आपली स्कूटर घेउन जाऊ, पण नाही! नवरोबाचे ऐकेल ती बायको कसली.”, घारुअण्णा घुश्श्यात. “अहो, काय झाले ते नेमके सांगाल का, का उगाच त्रागा करताय एवढा.”, इति नारुतात्या. “शिंचा बस डे म्हणे!

व्हॅट भरावा की नाही ?

लेखक चैदजा यांनी गुरुवार, 01/11/2012 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही आमची सदनिका २००९ सालामध्ये माजिवाडा, ठाणे येथे विकत घेतली. विकासक ३% व्हॅट मागत आहे. त्याच्याकडे आम्ही व्हॅट क्र्मांक मगितला. त्याने तो अजुन दिला नाही. ७०% सदनिका धारक ३% व्हॅट भरून आले आहेत. त्यांना पावती वर व्हॅट क्र्मांक दिला नाहि. आंजावर बरेच लेख वाचले. वेलणकरांशी देखिल संपर्कात आहे. तरी अजुन योग्य निर्णय होत नाही. क्रुपया मार्गदर्शन करावे.

त्याचीच.. अटॅचमेंट (नवी बाजू).

लेखक इनिगोय यांनी गुरुवार, 01/11/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतून राहणं चांगलं की गुंतल्यानंतरही वेळ येईल तेव्हा शांतपणे विलग होणं चांगलं यावर जे बोलणं झालं त्यातून त्याची डिटॅचमेंट हे प्रकटन याआधी लिहिलं गेलं. निसर्ग हा इतका जिवंत, इतका व्हर्सटाईल आहे, की प्रत्येकाला तो वेगळा दिसतो, नवं काही देतो. लेखावर आलेल्या प्रतिसादांमधूनही हेच जाणवलं. अनेकांनी त्यांना जाणवलेल्या - पटलेल्या आणि न पटलेल्या - गोष्टी तिथे मांडल्या. ही मूळ चर्चा ज्यांच्याशी झाली, त्यांनाही तो जसा जाणवला तसा..