एकच मागणे....
तुझी माझी भेट झालेलं प्रत्येक ठिकाण
परत परत जाऊन पाहिलंय मी........
पण निरव आणि निशब्द शांततेशिवाय
आता तिथे काहीच उरलेलं नाही......
तू माझ्याशी तिथे बोललेले मोजकेच शब्दही
त्याच शांततेत कुठेतरी विरून गेले आहेत..
पण विरता विरता माझ्या मनात कायमचे घर करून गेले आहेत..
तिथल्या प्रत्येक गोष्टीकडे तुझे माझे
हरवलेले क्षण मी सतत मागतो....
तुझ्या आठवणीची प्रत्येक रात्र मी
तळमळत एकटाच जागतो..........
आता फक्त एकच मागणे आहे...एकदा तरी तिथेच परत ये.....
हरवलेले माझे क्षण माझ्यापुरते तरी परत दे.......!
मिसळपाव
सामान्य माणसाना अवघड आणि चिड आणणारा विषय विनोदी अंगाने सांगणारा महान परफोर्मर.
विनम्र श्रद्धांजली.