इन्व्हेस्टमेन्ट बँका नक्की काय करतात?
श्री. मोदक यांच्या आर्सेलर-मित्तल वरील धाग्यात दोन्ही बाजूंच्या दिमतीला इन्व्हेस्टमेन्ट बँकर्सचा फौजफाटा होता असे म्हटले आहे. आता या इन्व्हेस्टमेन्ट बँका म्हणजे नक्की काय आणि त्या काय करतात, साध्या बँकांपेक्षा त्या कशा वेगळ्या असतात या प्रश्नांची उत्तरे या लेखातून द्यायचा प्रयत्न आहे.
कोणत्याही उद्योगाला आपला उद्योग चालवायला पैसे लागतातच. उद्योग चालवायला मालक स्वतःचे पैसे वापरू शकतात किंवा बँकेकडून किंवा अन्य कोणाकडून पैसे उधार घेऊ शकतात. यापैकी मालकांनी स्वतः उद्योगात गुंतवलेल्या पैशाला इक्विटी (equity) म्हणतात तर इतरांकडून उधार घेतलेल्या पैशांना "डेट" (debt) म्हणतात.
मिसळपाव

