Skip to main content

कॅकटसव्ररचे चांदणे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 29/06/2012 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुरुवारच्या मुहुर्तावर ब्रम्हकमळ नावाने ओळखले जाणारे २४ कॅकटस आमच्याइथे फुलले. हे फुलले म्हणजे सण असल्यासारखे आम्ही सगळे बाहेर असतो फुलांना पहात. बाहेर ह्या फुलांच्या सुगंधाने वातावरणही धुंद केलेले असते.

नेमक काय कराल?

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 28/06/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनंदन, शुभेच्छाबद्दल सर्व वाचकांचे धन्यवाद. हा कार्यक्रम ३ वर्षापुर्वी सुरु झाला. आर्थिक परिस्थितीचा बाउ न करता १० वी तील यश १२वी आणि स्पर्धात्मक परिक्षेत टीकवण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भरारी साठी शिष्यवृत्ती देणे हा मुळ उद्देश. हा कार्यक्रम फक्त मुंबई पुरता मर्यादित होता. परा आणि प्रसन्न केसकर ह्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम पुण्यात पोचला. मग प्रश्न आला जर का पुण्यात पोचु शकतो तर सर्व महाराष्ट्रात का नाही. पण मुंबई मधे बसुन चंद्रपुर मधल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी शक्य नाही. ह्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यात कार्यकर्त्यांची फळी

प्रणाम अनाम वीरांना...

लेखक सुधांशुनूलकर यांनी गुरुवार, 28/06/2012 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: || शुक्रवारी (२२ जून) मंत्रालयाला भीषण आग लागली. ती विझवायला अनेकांनी जिवाचं रान केलं आणि स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता मंत्रालयाच्या कर्मचार्‍‍यांचे आणि अभ्यागतांचे प्राण वाचवले. काही जण यात जखमी झाले. मात्र, नेहमीप्रमाणे हे वीर अनामच राहिले. त्यांच्या शौर्याची कुठेही दखल नाही, कौतुक नाही.

आता तू येशील....

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 28/06/2012 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आता तू येशील...हळूच गालात हसशील उगाच "फुरंगटून" मग शेजारी बसशील लडिवाळ रागवताना पाठमोरी बसशील हळूच चाफा माळताना अलगद लाजशील बराच वेळ शब्दांविना खूप काही बोलशील जमिनीकडे पाहता पाहता एकटीच हसशील गार वारा तुझ्या कुंतलाशी झुलेल उडणार्‍या बटांमध्ये जीव माझा भूलेल हातात हात गुंफताना नशीब जुळवू पाहशील गुंतलेल्या रेषात मग आयुष्य शोधशील बोलके तुझे डोळे जेव्हा माझ्या डोळा भिडतील चटकन लहानाची... मोठी मग होशील वास्तवाची जाण होता हात अलगद सोडवशील मग चेहरा लपवता लपवता डोळे ओलावशील बराच वेळ शांत बसून हळूच हसशील लाजर्‍या डोळ्यांनी मग निरोप माझा घेशील पाठमोरी सुद्धा मग किती छान दिसशील हाय...
काव्यरस

(आंतरजालावरची अमावास्या व --)

लेखक मोहनराव यांनी गुरुवार, 28/06/2012 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे काही दिवसापुर्वी आमच्या आंतरजालावर असण्यार्या मिसळपाव संकेतस्थळावर दोन चार घटिका काढण्याचा योग आला तिथे एका आयडीचा सदस्यं कालावधी साधारण 10 आठवडे असावा, प्रक्रुती चांगली पण आंतरजालावर आल्यावर लगेचच यांना धागा काढायसाठी हात शिवशिवायचा का ते माहित नाही(रोज एक धागा दिसणारच ;)),मी काही जुन्या सदस्यांना विचारल्यावर ते म्हणाले की - सकाळी सकाळी मिपा उघड्ल्यावर असे करतो ,ईतर वेळी अगदी नार्मल असतो आम्ही सांगुन पाहिले पण फरक नाही मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी मिपावर का होतात ?

भरलेली खानदेशी मिरची

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 28/06/2012 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स (एका जुन्या मित्राची आठवण झाली) ही पाकृ माझ्या आजीने सांगितलेली आहे. तिच्या हातच्या जेवणाची फार आठवण होत होती म्हणून रेसेपी मागवुन घेतली आणि ती तुम्हालाही सांगावी असे वाटले.. एकदा नक्की करुन पहा. :) घ्या मग साहित्य काही लोकांनी ;) साहित्यापासून सगळं निगुतीने करण्याचा ट्रेंड सुरु केला आहे, तो पेशंस माझ्यात नाही म्हणून डायरेक्ट शेवटचाच फोटु टाकणार आहे. साहित्य ४-५ खानदेशी किंवा जाड/ मोठ्या मिरच्या ही मिरची कमी तिखट असते.

प्रयास

लेखक अमृत यांनी गुरुवार, 28/06/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचे खरे नाव वैभव आम्ही त्याला प्रेमाने 'सोन्टुल' म्हणतो. गोड निरगस चेहर्‍याचा सदा हसतमुख छोकरा, पण दुर्दैवाने जन्मतः मुकबधिर. वैभव आमचे दुसरे आणि शेवटचे अपत्य. मोठा मुलगा सर्वसामान्य अव्यंग. आम्हा उभयता पती पत्नीच्या तिसर्‍या पिढीपर्यंत कुणी मुकबधीर नव्हते. त्यामुळी अनुवंशिकता म्हणता येणार नाही. मात्र तो गर्भात असताना त्याच्या आईने दोन मुलांत अंतर असावे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करण्यासाठी अ‍ॅलोपॅथिक गोळ्या घेतल्या होत्या. औषधीस दाद न देता तो आमच्या कुटुंबात दाखल झाला. बाळंतपण सुलभतेने न होता विलंबामुळे सिझेरीन पद्धतीने करण्यात आले.

परीक्षा व --

लेखक sagarpdy यांनी गुरुवार, 28/06/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे काही दिवसापुर्वी आमच्या पुण्याजवळ असणाऱ्या नातेवाईकांकडे दोन चार दिवस राहाण्याचा योग आला त्यांच्या मुलाचे वय साधारण बारा चौदा वर्ष असावे ,प्रक्रुती चांगली पण अचानक काही दिवशी याला ताप यायचा का आणायचा. माहित नाही,मी त्याच्या आईना विचारल्यावर त्या म्हणाल्या की - फक्त शाळेच्या परीक्षा अथवा निकाल जवळ आला कि असा करतो, ईतर दिवशी अगदी नार्मल असतो आम्ही डा.कडे दाखवले पण फरक नाही. मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी ठराविक दिवशी का होतात ? त्यावर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?