Skip to main content

दर्जेदार लिखान करण्यासाठी मिपाकरांना प्रेरणा मिळते कुठुन?

लेखक जोयबोय यांनी गुरुवार, 28/06/2012 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर अतिशय दर्जेदार लिखान मिपाकरांनी केलेले आहे. जसे (अर्थात मला आवडलेले) जयंत कुलकर्णींचे इतिहास लेखन, 'परा'ची चित्रपट समिक्षा, हेमांगीकेचे लेख तसेच इतर लेखकांचे लेख ( ज्यांची नाही नावे घेतली त्या सर्व लेखाकांची माफी मागतो तेही तितकेच दर्जेदार आहेत राग मानु नये.) मला प्रश्न असा पडतो कि यांना हे सर्व स्फुर्ते तरी कसे? मला तर परिक्षेत निबंधाच्या प्रश्नाला कायम २ किंवा ३ मार्क्स पडायचे, (सात आठ ओळीच्यावर लिहिताच येत नसायचे) मी सर्व दर्जेदार लेखकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या लिखाणाच्या प्रेरणेमागचे रहस्य (स्वेच्छेने) सांगावे. त्यातुन मझ्यासार्ख्या नवलेखकाला काही प्रेरणा घेता येइल.

बळी........

लेखक निशदे यांनी गुरुवार, 28/06/2012 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले....... === == = == === तशी मला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. शेजारीच राहायची आमच्या. शेजार्‍यांच्या दारात त्यांनी पाळलेल्या कोंबडीच्या लहान लहान पिलांबरोबर खेळायची, त्या पिलांना दाणे भरवायची. तेव्हाच माझ्या मनात हे असले विचार येऊ लागले होते.

मूळ्याचे पराठे

लेखक Pearl यांनी गुरुवार, 28/06/2012 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
मूळा सहसा कोणाला आवडत नाही. मला पण त्याच्या उग्र वासामुळे तो विशेष आवडत नसे. पण एकदा मूळ्याचे पराठे खाल्ले आणि तेव्हापासून मूळ्याचे पराठे माझे फेवरेट झाले. साहित्यः किसलेला मूळा, मीठ, साखर, तिखट, डाळीचे पीठ, कढिलिंब, तेल, जिरे-मोहरी, हिंग, हळद, कणकेचे (गव्हाचे) पीठ कृती : १) रोजच्या पोळीला लागते त्यापेक्षा थोडी सैल कणिक मळून घ्या. मळलेली कणिक झाकून ठेवा. एका सालकाढणीने मूळ्याचं बाहेरचा भाग स्वच्छ करून घ्या.

स्थलान्तर करणार्‍या पक्षाला....

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 28/06/2012 03:34 या दिवशी प्रकाशित केले.
खाली अथांग पाणी, निळाई संपत कोठे आहे? थकल्या पंखाच्या पाखरा, सांग तुझे घर कोठे आहे? समोरचा पाहतो दूरवर, मागचे शिस्तीने रांगी कुठे कधी दिसणार धरित्री, प्रश्न मनीचे मोठे आहे विसरलो केव्हा निघालो, केव्हा टिपिले दाणे चारा हवेचा फक्त खाउनी पिळवटलेली पोटे आहे वादळ वारे घेरुनि येता, विसकटल्या की रांगा थकलेले जीव विसावतिल, आशा ही का खोटी आहे? जे सोडले मागे ते की, जिथे चाललो ते घर अपुले?

अमावस्या व --

लेखक शकु गोवेकर यांनी गुरुवार, 28/06/2012 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे काही दिवसापुर्वी आमच्या मुंबईजवळ असण्यार्या नातेवाईकांकडे दोन चार दिवस राहाण्याचा योग आला त्यांच्या मुलाचे वय साधारण बारा चौदा वर्ष असावे ,प्रक्रुती चांगली पण जेवल्यावर काही दिवशी याला ओकारी यायची का काढायचा माहित नाही,मी त्याच्या आईना विचारल्यावर त्या म्हणाल्या की - फक्त अमावस्या पोर्णींमेला असे करतो ,ईतर दिवशी अगदी नार्मल असतो आम्ही डा.कडे दाखवले पण फरक नाही मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी ठराविक दिवशी का होतात ? त्यावर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?

याहू मेलची बनवेगिरी

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 27/06/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी अनेक जण याहू मेल वापरत असतील. याहूचा सध्या एक प्रॉब्लेम झालेला पहायला मिळतो. याहू मेल आय डी वरून अ‍ॅड्रेसबूकमधील सर्वांना जंकमेल किंवा धोकादायक वेबसाइटची लिंक पाठवली जाते. त्या मेलचे शीर्षक 'वर्क फ्रॉम होम', 'करीअर', 'फ्री एज्युकेशन' 'अर्न फ्रोम होम' असे काहीही असते. मेलमधे एक लिंक दिलेली असते. क्लिक केल्यावर कळते की प्रत्यक्षात खरी हायपर लिन्क दुसरीच आहे. सुरुवातीला असे वाटत असे की कुणीतरी मेल हॅक करतो आहे की काय पण आता असा अंदाज आहे की हा उद्योग स्वतः याहूच पैशे घेऊन करीत असावा. तरीही आलेल्या कोणत्याही मेलमधील लिन्कला क्लिक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी.

मराठी संस्थळांवर व्यनी किती सुरक्षित? (रिंगिंग द बेल)

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 27/06/2012 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज उपक्रम या संस्थळावर मी एका घटनेचा साक्षीदार होतो. ज्यामुळे मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली. एरवी मी प्रशासनाकडे तक्रार केली असती मात्र या घटनेआधी काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे सर्वांना सावध करणे मी माझे कर्तव्य समजतो. सुरवातीपासून सुरवात करतो ज्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य लक्षात यावे १. दिनांक 06/22/2012 रोजी खबरदार या आयडीने इथे आईची जात हा चर्चा विषय सुरू केला.

आमच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 27/06/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमतः , "मिसळलेला काव्यपेमी" ह्यांचा (http://www.misalpav.com/node/22081) लेख वाचला.आज ते ज्या काळातून जात आहेत आणि त्यांना जी अडचण आली, जवळजवळ तशीच अडचण आम्हाला (मी आणि माझी बायको) आली होती.आम्ही त्यातून कसा मार्ग काढला आणि त्याचे काय फायदे झाले , ते अनूभव लिहीत आहे. हा कूठलाही सल्ला नाही आहे किंवा शिफारश पण करत नाही आहे आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे शाळेने काय करावे किंवा पालक सभा घ्यावी का नाही, ह्याचा पण मी उहापोह करत नाही आहे.कुठल्याही , कंपू बरोबर भांडण करू नये.शेवटी, इतर लोक पळून जातात आणि आपण मात्र भरडले जातो.शाळा असो, की कू