Skip to main content

पिपल्स आर्ट : एक चित्रप्रदर्शन वृत्तांत.

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी रविवार, 24/06/2012 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
बसमधून जाताना पीपल आर्ट , डब्लीन चे चित्रप्रदर्शन हया छोटया जाहीतीने माझे लक्ष वेधले आणि ऑफिस चे बाजूला सारून शोधाशोध सुरु केली. गुगल बाबा कधीही निराश करत नाही. त्याने क्षणार्धात वेबसाईट शोधून काढली (http://www.peoplesart.ie/) आणि मग शनिवारीच हे चित्र प्रदर्शन आहे हे समजले , आणि मग जायचा बेत पक्का केला.( खरे तर ते फुकट आहे हे समजले तेंव्हा बेत पक्का झाला). इतर अनेक विषयांप्रमाणे चीत्रकले मधलेही मला काही कळत नाही , पण जावेसे वाटते.

गँग्स ऑफ वासेपूर - गेट वेल सून, अनुराग!

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 23/06/2012 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार असतो. यात म्हणे रुग्ण मधूनच स्वत:च्या मूळ स्वभावाशी एवढा विसंगत वागतो, की "हाच का तो?" असा समोरच्याला प्रश्न पडावा. शिवा, सरकार, सत्या, कंपनी, बनवणारा रामगोपाल वर्मा पुढे RGVकी आग, जेम्स, डिपार्टमेंट बनवेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? हिंदी चित्रसृष्टीत रामू हा या आजाराचं सर्वात ठळक व एकमेव उदाहरण आहे.... असा मझा कालपर्यंतचा भ्रम होता.

इंडीयन रोस्टी

लेखक Keanu यांनी शनिवार, 23/06/2012 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
हा थोडा German Rösti च्या जवळपास जाणारा पदार्थ. त्याचं नक्की नाव माहित नाही , आम्ही याला घरी पिझ्झा म्हणतो. लहान मुलांसाठी थोडा वेगळा प्रकार आणि सिमला मिरची न खाणार्‍यांनीही नक्की करुन पहा.

पुस्तक परिचय - ग्रोईंग अप बिन लादेन

लेखक किलमाऊस्की यांनी शनिवार, 23/06/2012 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
११ सप्टेंबर २००१ - नेहमीप्रमाणे रात्री रिमोट हातात घेऊन चॅनेल सर्फिंग चालू होतं. रिमोटचं Next बटनं दाबता दाबता अचानक एका न्यूज चॅनेलवर हात थबकला. एका उंच बिल्डींगवर एक विमान जोरात धडकतांना दिसत होतं. अतिशयोक्ती वाटेल पण एका क्षणापुरतं तो सीन मला एखाद्या इंग्रजी मारधाडपटातला वाटला. अमेरिकेच्या Twin Tower वर दहशतवादी हल्ला झाला होता. घटना समजायला ५ मिनीटं गेली आणि पुढची ५ मिनीटं धक्क्यातून सावरायला. "असाही हल्ला होऊ शकतो??" हे फारतर चित्रपटांतच मी कल्पना केलं असतं. या घटनेनंतर काही दिवसांनी "अल-कायदा" या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली.

३१ ते १३० पैकी कोणत्याही संख्येचा वर्ग तोंडी काढा!!

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 23/06/2012 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आता या भागात ३१ ते १३० यापैकी कोणत्याही संख्येचा वर्ग तोंडी कसा काढावा हे बघू.यासाठी गरज आहे १ ते ३० या संख्यांचे वर्ग आणि काही पाढे तोंडपाठ असायची गरज आहे.या पध्दतींचा वापर करून अक्षरश: २ ते ५ सेकंदात ३१ ते १३० पैकी कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला काढता येईल. १ ते ३० या संख्यांचे वर्ग अनुक्रमे: १,४,९,१६,२५,३६,४९,६४,१००,१२१,१४४,१६९,१९६,२२५,२५६,२८९,३२४,३६१,४००,४४१,४८४,५२९,५७६,६२५,६७६,७२९,७८४,८४१ आणि ९००. १. जर संख्या ७० ते १०० दरम्यान असेल तर: समजा ९६ चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. १०० आणि ९६ मध्ये फरक आहे ४ चा. तेव्हा ९६ मधून तेवढेच (४) वजा करा.

शेरास सव्वा शेर

लेखक जोयबोय यांनी शनिवार, 23/06/2012 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका सत्याघट्नेवर आधारीत एका गावत गावकर्यांनी महराज श्रीश्रीश्री बाबांचे सत्संग आयोजित करायचे ठरवले. गावकर्यांच्या विनंतीवरुन १० दिवस सत्संगाचे आयोजन केले. त्या सत्संगाला एक सुट्बूट घातलेला भक्त नियमीतपणे हजेरी लावत होता. तो रोज आपल्या मर्सीडीज गाडीने येत असे आणि भक्तीभावाने बाबांची प्रवचने ऐकत असे. सत्संगाच्या शेवटच्या काही दिवसात त्याने एका चेल्याला बाबांना भेट्न्याची इछ्छा व्यक्त केली. चेल्याने थोदे आढेवेढे घेतले.

अंगाई मज गाती..

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 23/06/2012 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंगाई मज गाती इथे ओळखीचेही पक्षी, अनोळखी का होती रंगभूमीची गाणी कसली, रंग असेतो गाती भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती कुशल हातांचा स्पर्श लाभता, विराणशा माळाला फुललेल्या बागेतुन होते, भ्रमरांची या दाटी गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती - संध्या
काव्यरस