Skip to main content

फाटकी चड्डी

लेखक कवटी यांनी बुधवार, 20/06/2012 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
कालच बातमी वाचली. (तुम्ही ही वाचली असेलच. पण प्रथा म्हणून इथे पेस्टत आहे.) बातमी > "कर्जाच्या सापळ्यात सापडलेल्या १७ युरोपीय देशांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निधीसाठी भारत १० अब्ज डॉलरची मदत करणार आहे. भारताबरोबरच ब्रिक गटाचे सदस्य असलेल्या पाच देशांनी या निधीसाठी मदत करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक गटाच्या येथील अनौपचारिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जी-२० देशांच्या शिखर परिषदेआधी ही बैठक झाली. भारताशिवाय चीन, रशिया, ब्राझील व दक्षिण आफ्रिका हे ब्रिक गटाचे इतर सदस्य देश होत.

"आदर्श" आहे माझा महाराष्ट्र?

लेखक जोयबोय यांनी बुधवार, 20/06/2012 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
आदर्श इमारत घोटाळ्यात अडकलेल्यांची सीबीआयला चौकशी करण्याचा अधीकार नाही, इति महाराष्ट्र शासन. म्हणजे आतापर्यंत झालेली चौकशी निरर्थक होती. चौकशीवर झालेला खर्च पण व्यर्थ ठरनार. शासनाला दिड वर्षाने साक्षातकार झाला याला जबाब्दार कोण? विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकरते आणि जनता हे सरकारला जाब का विचारत नाही. "आदर्श" आहे माझा महाराष्ट्र माझा. ़जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

(प्रतिसादांचे........)

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 20/06/2012 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
उदंड झाले वार प्रतिसादांचे किती गेले घातवार प्रतिसादांचे कुस्करणारे, कुजके बोलणारे कसे असे व्यवहार प्रतिसादांचे तू प्रेमाने कुरवाळले कवितेला शब्द शब्द टोचले प्रतिसादांचे मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर उठले बाजार प्रतिसादांचे थडगे माझ्या लाडल्यांचे अन, गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे मोक्ष मिळावा निदान फाट्यावर फोफावले आजार प्रतिसादांचे -- फुकटरंग
काव्यरस

बिअरशॉपची किमया - बेवडा भरकटला - नो प्रोब्लेम.

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 20/06/2012 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालीय सज्जनांनो, आपल्या घरात फ्रिज असतात, पण ब-याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा 'त्यापेक्षा ऑटो बरा, आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशोबाने घरात बिअर आणुन ठेवण्याचे आपण सर्व जण (यात मी नाही आलो) टाळतो. आपल्याला हवी तेंव्हा बिअर न मिळणे व चिल्ड न मिळणे या वेगवेगळ्या समस्या आहेत, आपल्याला वेटर चांगला मिळाला नाही बिअर गरम येते, पण दारुधंद्यातल्या वितरणातील दोषांमुळे हव्या त्या ब्रँडची बिअर न मिळण्याचा अनुभव येतो.

फारीनचे जोक

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 19/06/2012 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी लोकांचे जोक आणि त्यांची विनोदी हाडे (फनी बोन्स) शेयर करूयात... मिपावर हा धागा आधीच अवतरला असेल तर काढून टाकावा ... माजं कान्ट्रिब्युसन ... ******** जपानी डॉक्टरचे मराठी नाव ... टोचु-का-सुई चिनी कुत्राचं नाव ... हे-हुंग्-ते-हुंग. टांझानियन माणसाने गिरगावात स्विमिंग पूल उघडला त्याचे नाव ... या डुंबा डुंबा त्या स्विमिंग पूलचा रखवालदार रशियन असेल तर त्याचे आडनाव ... उभा-का-बस्की ******* म्हणतात स्वर्ग तिथे असतो जिथे .... तुम्हाला अमेरीकन पगार असतो तुम्हाला चायनिज जेवण मिळतं तुमचं ब्रिटिश घर असतं आणि तुमची बायको भारतीय असते. पण नरक तिथे असतो जिथे ...

असणं!

लेखक वेणू यांनी मंगळवार, 19/06/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं? की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र, त्या हाती सुपूर्द व्हावीत... आपण रिक्त होऊन! बेदरकारपणे स्वतःला आयुष्याच्या आरामखूर्चीत झोकून द्यावं, मिटल्या डोळ्यांनी आता, ते असणं अनुभवावं! नव्याने साठवावं! ते असणं मात्र टिकावं, रेंगाळावं- जगताना पुरून उरावं! कायमच, सुख मिळालं की दु:ख मागे रांगेत उभेच असतात, ह्या नियमाला तोडून...... -वेणू

'बोलक्या बाहुल्या'काराचे हार्दिक अभिनंदन.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 19/06/2012 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी शब्दभ्रमकार श्री. रामदास पाध्ये ह्यांना चीन मध्ये झालेल्या जागतिक शब्दभ्रमकारांच्या मेळाव्यात, २००० शब्दभ्रमकारांच्या शंभराहून अधिक कार्यक्रमातून त्यांनी साकारलेल्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमास THE BEST ENTERTAINING PERFORMANCE म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले. श्री. रामदास पाध्ये आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्यांचे हार्दिक अभिनंदन.

फुलांचे..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 19/06/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
उदंड झाले वार फुलांचे, उघडले न पण दार फुलांचे चुरगळणार्‍या, सुगंध देती कसे असे व्यवहार फुलांचे तुझा हात फिरला कवितेवर शब्द शब्द होणार फुलांचे मिळे न सहवासाचे अत्तर विस्कटले बाजार फुलांचे कत्तल माझ्या बागेची अन् तिला गळाभर हार फुलांचे मोक्ष मिळावा निर्माल्याचा जीवन मी जगणार फुलांचे -- उपटसुंभ

मृत्युघंटा

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 19/06/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
शह देण्यासाठी लांडग्याला झालेली कोल्हयांची युती शेपटाच्या लांब्या कमी पडल्या म्हणुन कापसाचे पुंजके टिंबाला जोडुन दाखवले तरसाने केलेली लांडग्याशी युती आणि हत्तीने घेतलेला लांडग्याचा चावा सहनही होत नाही सांगता येत नाही हत्ती डुलतोय मांस खावुन लांडगा मेला तर हत्तीचा घोडा लांब जायचे तर घोडाच बरा पण हत्ती असणं म्हणे भाग्याचे लक्षण छापकाटा करुन कुत्रे ठरवतील तरसाला मारायचे की स्वतः मरायचे काहीही असो जंगलाची मृत्युघंटा वाजत आहे होवुन जावु द्या खांडववना प्रमाणे अग्नीतांडव कदाचित इंद्रप्रस्थ उभे राहिल दग्धभुमीवर

जनता मागते भीक आहे.

लेखक निश यांनी मंगळवार, 19/06/2012 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनमोहन असताना सगळ काही ठीक आहे सत्ताधार्‍यांना सोनियाचा दिन, जनता मागते भीक आहे. कॉमनवेल्थ घोटाळा करुन कलमाडी सध्या घरी आहेत. पॄथ्वी राजाच राज्य सध्या टोळ लुटण्यात मग्न आहे. प्रणव आता राष्ट्रपती होतील अशी आता आशा आहे. पाऊस पडला तरी पैकाविना शेती कशी ? शेतकरी राजा निराश आहे. नव नविन कर घेण्यात सरकार घेते आघाडी आहे. सोयी सुविद्या पुरविण्यात ह्यांची नेहमीच पिछाडी आहे. सरकार म्हणावे कसे? हा तर देश लुटण्याचा लुटारुंचा खेळ आहे. आता थांबवा हे सगळ कारण झोपलेली जनता जाग व्हायची वेळ आली आहे. झोपलेली जनता जाग व्हायची वेळ आली आहे.